शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: घरातील गुप्तधन काढून देतो असे सांगून महिलेला घातला ४१ लाखाला गंडा, साताऱ्यातील तिघांवर गुन्हा दाखल

By अरुण आडिवरेकर | Updated: August 30, 2023 16:36 IST

हर्षल शिराेडकर खेड : मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलेला ती राहत असलेल्या घरातील गुप्तधन तांत्रिक पूजा, होम हवन करून ...

हर्षल शिराेडकरखेड : मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलेला ती राहत असलेल्या घरातील गुप्तधन तांत्रिक पूजा, होम हवन करून काढून देतो असे सांगून तब्बल ४१ लाखाला गंडा घातल्याचा प्रकार समाेर आला आहे. हा प्रकार १ मार्च २०२२ ते १७ ऑगस्ट २०२३ या कालावधीत खेड तालुक्यातील भरणे येथे घडला आहे. याप्रकरणी साताऱ्यातील भाेंदूबाबासह त्याच्या इतर दाेन साथीदारांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भोंदूबाबा प्रसाद हरीभाऊ जाधव (४७, रा. गिरेवाडी, ता. पाटण जि. सातारा), विवेक यशवंत कदम (४८, रा. करंजवडे ता. पाटण, जि सातारा), ओंकार विकास कदम (२३, रा. करंजवडे ता पाटण जि. सातारा) अशी तिघांची नावे आहेत. या प्रकरणी विठाबाई आण्णाप्पा पवार (४८, रा. गणेशनगर-भरणेनाका, ता. खेड जि. रत्नागिरी) यांनी फिर्याद दिली आहे.विठाबाई पवार या माेलमजुरी करुन आपला उदरनिर्वाह करतात. त्या राहत असलेल्या घरात गुप्तधन असून, यासाठी तांत्रिक पूजा, धार्मिक विधी व जादूटोणाचे उपाय करुन हे गुप्तधन काढून देताे, असे भाेंदूबाबत प्रसाद जाधव याने त्यांना सांगितले. त्यासाठी घरात तंत्रमंत्र वाचून, पूजापाठ करुन तसेच होमहवन आणि इतर धार्मिक विधीसाठी करण्यासाठी पैसे लागतील असेही त्याने सांगितले. त्यासाठी त्याने विठाबाई पवार व त्यांच्या नातेवाईकांकडून वेळाेवेळी एकूण ४० लाख ६५ हजार रुपये घेतले.

त्यानंतर विठाबाई यांचा मुलगा रोहित यांच्या ग्रहशांती करण्यासाठी या भोंदूबाबाने २५ हजार रुपये वेगळे मागून घेतले. भाेंदूबाबा प्रसाद जाधव आणि त्यांच्या दाेन साथीदारांनी तब्बल ४० लाख ९० हजार रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी खेड पाेलिस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारीblack moneyब्लॅक मनी