एसीबीकडून राजन साळवी अन् कुटुंबियांची ४ तास चौकशी; उद्याही हजर राहण्याच्या सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2024 19:00 IST2024-03-05T18:59:14+5:302024-03-05T19:00:02+5:30
आमदार राजन साळवी यांच्या व्यवसाय आणि मालमत्तेसंदर्भात चौकशी झाली आहे.

एसीबीकडून राजन साळवी अन् कुटुंबियांची ४ तास चौकशी; उद्याही हजर राहण्याच्या सूचना
ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची आज दुसऱ्या दिवशी देखील चार तास चौकशी झाली. आमदार राजन साळवी यांची देखील एसीबीच्या पोलीस अधीक्षकांकडून चौकशी करण्यात आली आहे.
आमदार राजन साळवी यांच्या व्यवसाय आणि मालमत्तेसंदर्भात चौकशी झाली आहे. आमदार राजन साळवी यांची पत्नी अनुजा साळवी, मुलगा शुभम साळवी हे देखील आज एसीबी कार्यालयात हजर होते. उद्या देखील राजन साळवी यांच्या कुटुंबाला एक ते चार या वेळात एसीबी कार्यालयात पुन्हा हजर राहावे लागणार आहे. चार तासाच्या चौकशीत राजन साळवी यांचा जबाब गेला नोंदवण्यात आला. मी व माझ्या कुटुंबांकडून एसीबी चौकशीत पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचे राजन साळवी यांनी यावेळी सांगितले आहे.