रत्नागिरीत कोरोनाचे ४ सक्रिय रुग्ण, कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2022 18:25 IST2022-11-25T18:24:35+5:302022-11-25T18:25:29+5:30

दिवसभरात ९७ लोकांची कोरोना चाचणी घेण्यात आली

4 active patients of Corona in Ratnagiri | रत्नागिरीत कोरोनाचे ४ सक्रिय रुग्ण, कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल

रत्नागिरीत कोरोनाचे ४ सक्रिय रुग्ण, कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल

रत्नागिरी : जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात एकही बाधित रुग्ण सापडलेला नाही, तर एक रुग्ण कोरोनामुक्त झाला. सध्या चार सक्रिय रुग्ण आहेत. चिपळूण तालुक्यात एक आणि रत्नागिरीत तीन सक्रिय रुग्ण आहेत.

जिल्हा पुन्हा कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. दिवसभरात ९७ लोकांची कोरोना चाचणी घेण्यात आली. सर्वजणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे बाधित रुग्णांची एकूण संख्या ८५,८४० आहे,  संगमेश्वर तालुक्यातील एक रुग्ण बरा झाला. आतापर्यंत एकूण ८३,२९१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.३ टक्के आहे. कोरोनाने २,५४५ रुग्णांचा बळी घेतला आहे.

Web Title: 4 active patients of Corona in Ratnagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.