शहरी बस अपघातात २९ मुलांसह ३१ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2019 13:35 IST2019-07-05T13:34:43+5:302019-07-05T13:35:52+5:30
शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी शहरी बस उलटून ३१जण जखमी झाले. त्यात २९ विद्यार्थी आणि चालकवाहकाचा समावेश

शहरी बस अपघातात २९ मुलांसह ३१ जखमी
रत्नागिरी : शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी शहरी बस उलटून ३१जण जखमी झाले. त्यात २९ विद्यार्थी आणि चालकवाहकाचा समावेश आहे. शुक्रवारी सकाळी ६.२० वाजण्याच्या सुमारास कासारवेली-रत्नागिरी ही शहरी बस रत्नागिरीच्या झाडगाव औद्योगिक वसाहत परिसरात रस्ता सोडून उलटली. या बसमधून नेहमी रत्नागिरीतील आयडियल स्कूलचे विद्यार्थी प्रवास करतात. आर. एम. शिरगावकर व वाय. आर. आंबेकर या चालकवाहकांसह बसमधील ३१ मुले यात जखमी झाली आहेत. चार मुलांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. एका मुलाला अधिक दुखापत झाल्याने त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात सर्वांवर उपचार सुरू आहेत.