शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
2
Top Marathi News LIVE Updates: बारामती पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; पश्चिम बंगाल, तामिळनाडूतही मतदारराजा देणार कौल
3
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
4
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
5
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
6
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
7
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
8
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
9
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
10
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
11
महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले
12
"रिद्धी खूप खूश झाली अन्..." राकेश बापटने सांगितली एक्स वाईफची कशी होती प्रतिक्रिया
13
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
14
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
15
‘पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान’, एकनाथ शिंदेंची खर्गेंवर टीका
16
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
17
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
18
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
19
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
20
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
Daily Top 2Weekly Top 5

२२ कर्मचारी, अधिकाऱ्यांचे निलंबन

By admin | Updated: January 16, 2015 23:42 IST

जिल्हा परिषद : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची माहिती

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या कामकाजामध्ये शिस्त यावी, यासाठी वर्षभरात २२ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली गेली. त्यामध्ये ७ वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस आरोग्य विभागाकडे केल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी सांगितले.काळम-पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार स्विकारल्यावर, एक वर्षाचा कालावधी उद्या दि़ १७ जानेवारी रोजी पूर्ण होत असल्याने, आपल्या कार्याची माहिती काळम-पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली़ ते म्हणाले, आपण एकाही कर्मचारी किंवा अधिकाऱ्यावर जाणीवपूर्वक कारवाई केलेली नसून, जिल्हा परिषदेच्या कामकाजामध्ये शिस्त यावी, यासाठीच कारवाईचा बडगा उगारावा लागला़ त्यामुळे काही वेळा अनेकांचा दबावही आला़ मात्र, आपण त्याला न जुमानता कारवाई केली़ यापुढेही शिस्तभंग आणि कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला़ त्याचवेळी चांगले काम करणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांचे कौतुकही केले आहे़ शिस्तभंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह कर्मचारी संघटनेलाही वारंवार माहिती देण्यात आली आहे़ त्यामुळे एकदा घेतलेला निर्णय आपण कधीही बदललेला नाही़ निर्णय बदलणे म्हणजे कमकुवतपणाचे लक्षण असल्याचे त्यांनी सांगितले़ एक वर्षाच्या कालावधीत २२ कर्मचारी व अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली़ त्यामध्ये ७ वैद्यकीय व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचा समावेश आहे़ डॉ़ बी़ बी़ गाढवे (तालुका आरोग्य अधिकारी, चिपळूण), डॉ़ आऱ बी़ सोनवणे (वैद्यकीय अधिकारी, धारतळे, राजापूर), डॉ़ एस़ बी़ बचुटे (वैद्यकीय अधिकारी, फुरुस, चिपळूण) या तिघांवर निलंबनाची कारवाई केली. डॉ़ एस़ वाय़ यादव (वैद्यकीय अधिकारी, कोतवडे, रत्नागिरी) यांच्यावर बदलीची, डॉ़ एस़ बी़ घोगरे (वैद्यकीय अधिकारी, रामपूर, ता़ चिपळूण) यांच्यावर शिस्तभंगाची, डॉ़ एस़ आऱ पाचलेगावकर (वैद्यकीय अधिकारी, कोरेगाव़, ता़ खेड) आणि डॉ़ एऩ एल़ धुमाळ (वैद्यकीय अधिकारी, वावे, ता़ खेड) यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी शिफारस आरोग्य विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे करण्यात आली आहे. इतर कर्मचारी, अधिकाऱ्यांनी धडा घ्यावा, असेही यावेळी स्पष्ट केले़ वस्तीशाळा निमशिक्षकांचाही प्रश्न सोडवण्यात यश आले़ जन्म-मृत्यू नोंदीच्या कामांना गती देऊन कामे केल्याचे त्यांनी सांगितले़ (वार्ताहर)