शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गुहागरातील बाेऱ्या समुद्रकिनारी सापडले २१ किलो चरस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2023 14:24 IST

गुहागर ( रत्नागिरी ) : दापाेली तालुक्यातील किनाऱ्यावर माेठ्या प्रमाणात चरसची पाकिटे सापडलेली असतानाच आता गुहागर तालुक्यातील बोऱ्या समुद्रकिनारी ...

गुहागर (रत्नागिरी) : दापाेली तालुक्यातील किनाऱ्यावर माेठ्या प्रमाणात चरसची पाकिटे सापडलेली असतानाच आता गुहागर तालुक्यातील बोऱ्या समुद्रकिनारी सीमा शुल्क विभागाला २ बेवारस गोणी सापडल्या आहेत. त्यामध्ये चरसाची १८ पाकिटे असून, त्यांचे वजन २१ किलो ८५ ग्रॅम इतके आहे. हा साठा १९ ऑगस्ट राेजी हाती लागला.दापोली तालुक्यातील कर्दे ते लाडघरदरम्यान समुद्रकिनाऱ्यावर १४ ऑगस्ट राेजी बेवारस स्थितीत १० पाकिटे पाेलिसांना मिळाली हाेती. ही पाकिटे जप्त करून माहिती घेतली असता त्यामध्ये ११.८८ किलो अफगाणी चरस आढळला हाेता. त्यानंतर सीमा शुल्क विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दापोलीतील विविध समुद्रकिनाऱ्यांवर गस्त घालण्यास सुरुवात केली.त्यानंतर १५ ऑगस्टला ३४.९१ किलो, १६ ऑगस्टला केळशी समुद्रकिनाऱ्यावर २७.९९ किलो, कोळथरे येथील समुद्रकिनाऱ्यावर १३.०४ किलो, १७ ऑगस्टला मुरूड (ता. दापोली) येथील समुद्रकिनाऱ्यावर १४.४१ किलो, तर त्याच दिवशी बुरोंडी ते दाभोळ किनाऱ्यादरम्यान तब्बल १००.९५ किलो चरस सापडले.दापाेली तालुक्यात माेठ्या प्रमाणात चरस सापडले असतानाच गुहागरातही चरसची पाकिटे सापडली आहेत. तालुक्यातील बाेऱ्या समुद्रकिनारी सीमा शुल्क विभागाला १९ ऑगस्टला २१.८५ किलो चरस जप्त केले आहे.सीमा शुल्क विभागाचे बोऱ्या क्षेत्राचे अधीक्षक जयकुमार म्हणाले की, रत्नागिरीतील समुद्रकिनाऱ्यावर एकूण १७ गोणी सापडल्या आहेत. त्यामध्ये निळ्या रंगाची पाकिटे होती. बोऱ्या येथे २ गोणी आढळल्या. त्यामध्ये १८ निळ्या रंगाची पाकिटे होती. आजपर्यंत दापोली आणि गुहागर तालुक्यातील ७ समुद्रकिनाऱ्यांवरून २२२.०३ किलो चरस जप्त करण्यात आले आहे. सीमा शुल्क विभागाकडून रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर गस्त घातली जात आहे, असे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस