शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri ZP Election 2026: जिल्हा परिषदेसाठी २०२; पंचायत समितीसाठी ४३१ उमेदवार रिंगणात; आता प्रतीक्षा माघारीची

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 17:00 IST

निवडणूक रिंगणात कोण रहाणार, कुणाची माघार २७ रोजी स्पष्ट होणार

रत्नागिरी : जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी दाखल झालेल्या अर्जांची छाननी नऊ तालुक्यांमध्ये करण्यात आली. या छाननीत जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ५६ गटांसाठी आलेल्या एकूण २२४ अर्जांपैकी २०२ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. तर पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आलेल्या एकूण ४४४ अर्जांपैकी ४३१ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. २७ रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असून या दिवशी कोण माघार घेणार आणि कोण निवडणूक लढविणार, हे निश्चित होणार आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील ५६ गट आणि ११२ गणांची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली आहे. ५ फेब्रुवारीला मतदान आणि ७ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. १६ ते २१ जानेवारी या कालावधीत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत होती. मुदतीअंती जिल्हा परिषदेच्या ५६ गटांसाठी २२६ अर्ज आणि पंचायत समितीच्या ११२ गणांसाठी ४४४ अर्ज दाखल झाले होते. या दोन्ही निवडणुकीसाठी अर्ज करताना काही उमेदवारांनी एकापेक्षा अधिक अर्ज भरले होते. मात्र, गुरुवारी छाननीवेळी एक अर्ज ग्राह्य धरून उर्वरित अर्ज अवैध ठरविण्यात आले. तसेच काहींच्या अर्जात त्रुटी असल्याने अशा उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले.त्यामुळे जिल्ह्यात ५६ गणांसाठी २०२ उमेदवार जिल्हा परिषदेच्या निवडणूक रिंगणात आहेत. यात १०७ पुरुष, तर ९५ महिला आहेत. तसेच ११२ गणांमध्ये ४३१ उमेदवार पंचायत समितीची निवडणूक लढविणार आहेत. यात २४३ पुरुष आणि १८८ महिला उमेदवार आहेत.२५ रोजी रविवार आणि २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताकदिन असल्याने सुटी आहे. त्यामुळे अर्ज माघारी घेण्याची २७ जानेवारी अंतिम तारीख आहे. त्यामुळे या वैध ठरलेल्या उमेदवारांमधून किती उमेदवार अर्ज माघारी घेणार आणि किती रिंगणात राहणार, हे या दिवशी स्पष्ट होणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ratnagiri ZP Election: Candidates Validated, Withdrawal Deadline Awaited

Web Summary : Ratnagiri Zilla Parishad election sees 202 candidates validated for 56 seats. Panchayat Samiti has 431 candidates for 112 seats. The withdrawal deadline on January 27th will finalize the contenders.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६Ratnagiriरत्नागिरीpanchayat samitiपंचायत समिती