शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
4
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
5
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
6
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

चिपळुणात १६ कोटीची कामे होणार सुरु, काहींच्या निविदा, काहींना तांत्रिक मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 3:56 PM

चिपळूण नगर परिषदेकडून या वर्षात १६ कोटी रुपयांची विकासकामे केली जाणार आहेत. काही कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्या असून काहींना तांत्रिक मंजुरी मिळाली आहे. स्वामीमठ ते महाराष्ट्र हायस्कूल रस्त्याचे लवकरच भूमिपूजन होणार आहे. प्रत्येक नगरसेवकांच्या प्रभागात लाखो रुपयांची कामे होत आहेत.

ठळक मुद्देचिपळुणात १६ कोटीची कामे होणार सुरुकाहींच्या निविदा, काहींना तांत्रिक मंजुरी

चिपळूण : नगर परिषदेकडून या वर्षात १६ कोटी रुपयांची विकासकामे केली जाणार आहेत. काही कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्या असून काहींना तांत्रिक मंजुरी मिळाली आहे. स्वामीमठ ते महाराष्ट्र हायस्कूल रस्त्याचे लवकरच भूमिपूजन होणार आहे. प्रत्येक नगरसेवकांच्या प्रभागात लाखो रुपयांची कामे होत आहेत.गटारे, पाखाड्या, रस्ते डांबरीकरण, संरक्षण भिंती, शाळा दुरुस्ती, आरसीसी नाले, धोबीघाट, रस्ते, बीबीएम, कारपेट सिलकोट करणे, सार्वजनिक शौचालये, कंपाऊंड वॉल बांधणे आदी कामांच्या निविदा प्रक्रिया पार पडल्या आहेत. तर काही कामांना तांत्रिक मंजुरी मिळाली असून काही कामे तांत्रिक मंजुरीसाठी पाठविण्यात आली आहेत.

१६ कोटींच्या विकासकामात नगरसेवक करामत मिठागरी, संजीवनी शिगवण यांच्या प्रभागात ५० लाख १० हजार, सीमा रानडे, रसिका देवळेकर यांच्या प्रभागात ६७ लाख १४ हजार, राजेश केळस्कर, फैरोजा मोडक यांच्या प्रभागात ३ लाख ८० हजार, जयश्री चितळे, शशिकांत मोदी यांच्या प्रभागात १८ लाख २९ हजार, बिलाल पालकर, शिवानी पवार यांच्या प्रभागात ३० लाख ३२ हजार, मनोज शिंदे, स्वाती दांडेकर यांच्या प्रभागात ७१ लाख ४५ हजार, सफा गोठे, कबीर काद्री यांच्या प्रभागात ३३ लाख ४९ हजार, सुषमा कासेकर, भगवान बुरटे यांच्या प्रभागात २९ लाख ८६हजार, सुरैय्या फकीर, आशिष खातू यांच्या प्रभागात ४९ लाख १४ हजार, सुधीर शिंदे, वर्षा जागुष्टे यांच्या प्रभागात १३ लाख ५३ हजार, निशिकांत भोजने, नुपूर बाचिम यांच्या प्रभागात १ कोटी ३० लाख, संजीवनी घेवडेकर, उमेश सकपाळ यांच्या प्रभागात ७७ लाख ६३ हजार, सई चव्हाण, मोहन मिरगल यांच्या प्रभागात ७२ लाख ७२ हजार रुपयांची विकासकामे होणार आहे.या कामांबरोबरच ५ लाख रुपये खर्च करुन विजापूर मार्ग ते खेर्डी पंप हाऊस रस्ता, २ लाख ९६ हजार रुपये खर्च करुन खेर्डी दत्तमंदिराजवळील पाण्याच्या टाकीकडे जाणारा रस्ता व गटार, ५४ लाख ६२ हजार खर्च करुन मच्छी व मटन मार्केटची उर्वरित कामे, ४६ लाख ४० हजारांची भाजी मंडईवर शेड, ५ कोटी ७७ लाखांचे अंतर्गत हॉटमिक्सचे रस्ते केले जाणार आहेत.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाRatnagiriरत्नागिरी