गोवळकोट रोड येथे १३ वर्षाच्या मुलाची आत्महत्या, कारण अस्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 18:49 IST2022-06-08T18:49:37+5:302022-06-08T18:49:56+5:30
इस्माईलने गळफास लावून घेतल्याचे उघडकीस येताच सर्वांना धक्का बसला

गोवळकोट रोड येथे १३ वर्षाच्या मुलाची आत्महत्या, कारण अस्पष्ट
चिपळूण : शहरातील गोवळकोट रोड येथील आफ्रिन पार्क नजीकच्या एका गृहसंकुलातील रहिवासी असलेल्या १३ वर्षाच्या मुलाने घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली. इस्माईल सुहेल काझी असे या मुलाचे नाव आहे. ही घटना काल मंगळवारी उशिरा उघडकीस आली.
इस्माईलचे वडील परदेशी असतात, तर गोवळकोट रोड येथील घरामध्ये तो, त्याची आई आणि आजी राहते, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. मंगळवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास इस्माईलने गळफास लावून घेतल्याचे उघडकीस येताच, सर्वांच्याच पायाखालची वाळू सरकली.
नातेवाईक व स्थानिक नागरिकांनी त्याला तत्काळ शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डाॅक्टरांनी त्याला मृत घोषित केले. चिपळूण पोलीस स्थानकातील पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.