पाण्याच्या टाकीत पडून १२ वर्षीय मुलाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 03:08 PM2020-09-22T15:08:27+5:302020-09-22T15:09:34+5:30

लांजा शहरातील सार्दळवाडी येथील १२ वर्षीय मुलगा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी मृत्यू ओढवल्याची घटना सोमवारी सायंकाळी ५.४५ वाजता दरम्याने घडली आहे.

12-year-old boy dies after falling into water tank | पाण्याच्या टाकीत पडून १२ वर्षीय मुलाचा मृत्यू

पाण्याच्या टाकीत पडून १२ वर्षीय मुलाचा मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देपाण्याच्या टाकीत पडून १२ वर्षीय मुलाचा मृत्यूउशीर झाल्याने पाण्यात गुदमरून दुर्दैवी मृत्यू

लांजा : शहरातील सार्दळवाडी येथील १२ वर्षीय मुलगा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी मृत्यू ओढवल्याची घटना सोमवारी सायंकाळी ५.४५ वाजता दरम्याने घडली आहे.

सार्दळवाडी येथील शिवराज रविशंकर कोपरे ( १२ ) हा गतीमंद मुलगा सायंकाळी पावसातून घरातील मंडळींची नजर चुकवून घराच्या मागील बाजूला खेळत तो गेला. त्याठिकाणी पावसाच्या पाण्याने भरलेल्या टाकीमध्ये तो सायंकाळी ५.४५ वाजण्याच्या दरम्याने टाकीत पडला.

मुलगा घरामध्ये दिसत नसल्याने घरच्यांनी त्याचा शोध सुरु केला. त्याचवेळी पाण्याच्या भरलेल्या टाकीजवळ जाऊन पाहिले असता त्याने घातलेली चप्पल पाण्यावर तरंगताना दिसली.

त्यानंतर त्याचा पाण्याच्या टाकीत शोध घेण्यात आला. खूप उशीर झाल्याने त्याचा पाण्यात गुदमरून त्याचा दुर्दैवी मृत्यू ओढवला. लांजा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले

Web Title: 12-year-old boy dies after falling into water tank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.