शहरं
Join us  
Trending Stories
1
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
2
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
3
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
6
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
7
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
8
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
9
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
10
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
11
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
12
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
13
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
14
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
15
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
16
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
17
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
18
"काँग्रेस सगळ्या निवडणुका लढायला पुढे जाते, पण निकाल लागल्यानंतर कळतं...", संजय राऊत यांचा टोला
19
HDFC बँकेच्या दुबई शाखेत मोठा गैरव्यवहार; ५ वर्षांपर्यंत लपवलं सत्य, अतनु चक्रवर्तींच्या राजीनाम्याशी संबंध?
20
'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, ट्रम्पवर कडी करा...
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri ZP Election: रत्नागिरीत जिल्हा परिषदेसाठी ११, पंचायत समितींसाठी १६ अर्ज दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 13:51 IST

शिंदेसेनेने आतापर्यंत दोन याद्या जाहीर केल्या

रत्नागिरी : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आता दोनच दिवस शिल्लक असली तरी जागावाटप आणि उमेदवार निश्चिती झाली नसल्याने सर्व वातावरण ‘ठंडा ठंडा कूल कूल’ असेच आहे. तीन दिवसांत जिल्हा परिषदेच्या ५६ जागांसाठी ११ आणि पंचायत समित्यांमधील ११२ जागांसाठी फक्त १६ अर्ज दाखल झाले आहेत.उमेदवारी अर्ज भरण्यास शुक्रवारपासून सुरुवात झाली. मात्र तीन दिवसांत २७ अर्जच दाखल झाले आहेत. त्यातील १६ अर्ज केवळ खेड तालुक्यातीलच आहेत. जिल्हा परिषदेसाठी आतपर्यंत ११ आणि पंचायत समित्यांसाठी १६ अर्ज दाखल झाले आहेत.शिंदेसेना आणि भाजपची युती निश्चित झाली असली तरी अजूनही जागावाटपावरून अंतर्गत कुरबुरी आहेत. भाजपला जागा कमी मिळाल्या असल्याचा सूर काढला जात आहे. तरीही आतापर्यंत दोन याद्या शिंदेसेनेने जाहीर केल्या आहेत. भाजपने यादी जाहीर करण्याची तसदी न घेता शिंदेसेनेकडून पदरात पडलेल्या जागांवर उमेदवार उभे करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत दाखल झालेल्या अर्जांमध्ये शिंदेसेना, भाजप आणि अपक्षांचेच अर्ज आहेत.उद्धवसेना, दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्याकडून अजून एकही अर्ज दाखल झालेला नाही.जिल्ह्यात महाविकास आघाडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे उद्धवसेनेचे सचिव विनायक राऊत यांनी सोमवारी जाहीर केले. मात्र आता अर्ज भरण्यासाठी दोनच दिवसांची मुदत आहे. त्यामुळे आघाडीचा निर्णय कधी होणार, याकडे कार्यकर्ते डोळे लावून बसले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Few Applications Filed for Ratnagiri ZP, Panchayat Samiti Elections.

Web Summary : Ratnagiri ZP and Panchayat Samiti elections see slow start. Seat sharing delays continue between Shinde Sena, BJP. Mahavikas Aghadi decision awaited.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६Ratnagiriरत्नागिरीZP Electionमहाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२५panchayat samitiपंचायत समितीMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी