आठवड्याचे राशीभविष्य - 7 एप्रिल ते 13 एप्रिल 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2019 10:16 IST2019-04-07T10:15:02+5:302019-04-07T10:16:21+5:30

कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या...

weekly horoscopes 7 April to 13 April 2019 | आठवड्याचे राशीभविष्य - 7 एप्रिल ते 13 एप्रिल 2019

आठवड्याचे राशीभविष्य - 7 एप्रिल ते 13 एप्रिल 2019

मेष

 

आठवडयाच्या सुरुवातीस आपण बौद्धिक कार्यात व चर्चेत व्यस्त राहाल. आपल्या कल्पनाशक्तीस व सर्जनात्मकशक्तीस उत्तम रीत्या खुलवू शकाल. सुरुवातीस व्यापारातील भागीदारी पासून लाभ होऊ शकेल. कोणत्याही कार्याची सुरुवात करण्यापूर्वी श्रीगणेश व इष्टदेवतेचे पूजन व स्मरण अवश्य करावे. नोकरीत आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. विरोधक व प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल... आणखी वाचा 

वृषभ

आठवडयाच्या सुरुवातीस रागाच्या भरात आपण स्वतः चेच नुकसान करून बसाल व त्यामुळे खर्चात वाढ होईल. विशेषतः अचानकपणे खर्च उदभवण्याची शक्यता असल्याने वाचवून ठेवलेला पैसा खर्च करावा लागण्याची शक्यता आहे. शक्य असल्यास कर्ज घेण्याचा किंवा उधारी करण्याचा विचार करू नका, अन्यथा त्याची परतफेड करणे डोईजड होईल. वरिष्ठांची नाराजी ओढवल्याने रागाच्या भरात कारकीर्द पणाला लावू नका... आणखी वाचा

मिथुन 

आठवडयाच्या सुरुवातीस आपणास ताजेपणा व स्फूर्ती जाणवेल. आर्थिक लाभ व नियोजनासाठी हा आठवडा अनुकूल आहे. प्राप्तीच्याच बरोबरीने काही अनपेक्षित खर्च उभे राहतील तेव्हा हात थोडा आखडता ठेवावा. नकारात्मक विचार बाजूला ठेवल्यास मानसिक स्थैर्य टिकून राहील. आठवडयाच्या मध्यास कार्यात यश मिळण्यात विलंब झाला तरी हताश न होता आपले प्रयत्न चालूच ठेवावेत... आणखी वाचा

कर्क 

आठवडयात आपण व्यापार - व्यवसाय किंवा नोकरीत प्रगती दर्शक सुरुवात करू शकाल. कौटुंबिक व्यवसायात असणाऱ्यांना विशेष लाभ होण्याची शक्यता आहे. अशा आनंदमयी वातावरणात आपल्या जुन्या मित्रांच्या किंवा प्रिय व्यक्तीच्या भेटीने आपला आनंद द्विगुणित होईल. दि.११ व १२ दरम्यान व्यावसायिक आघाडीवर विरोधाची शक्यता वाढेल... आणखी वाचा

सिंह 

कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्याचा सारासार विचार करावा. आपण नवीन काम करण्यास प्रेरित व्हाल व अशा कामाची सुरवात सुद्धा करू शकाल. विचारातील अस्थिरतेमुळे आपली द्विधा मनःस्थिती होऊ शकेल. एखाद्या विशेष हेतूसाठी कार्य करण्यास प्रेरित व्हाल. कामाच्या निमित्ताने किंवा व्यक्तिगत कारणास्तव एखादा छोटा प्रवास संभवतो... आणखी वाचा

कन्या

आठवडा संपूर्णपणे आपणास अनुकूल नसल्याने आप्तस्वकीय सुद्धा आपल्याशी असहकार्य करत आहेत असे आपणास वाटेल. संतती संबंधी जी चिंता आपणास होती ती दूर होईल. कौटुंबिक जिव्हाळा वाढेल. कुटुंबीय एकमेकांना सहकार्य करतील. कुटुंबात आपला मान व वर्चस्व वाढेल. मात्र, एखादी जवाबदारी अंगावर घेण्यास सुद्धा तयार राहावे लागेल... आणखी वाचा

तूळ 

आठवडयाच्या सुरुवातीस आपल्या भावना उफाळून येतील. मित्र, स्वकीय व नातेवाईकांच्या भेटीने आपले मन प्रसन्न होईल.पहिल्या दोन दिवसात भागीदारीच्या कामात आपण प्रगती कराल. नवीन करार सुद्धा होऊ शकतील. त्या नंतर मात्र, महत्वाचे निर्णय घेणे टाळावे. आठवडयाच्या मध्यास आपण नकारात्मक विचार करू नये, असा सल्ला आपणास देण्यात येत आहे... आणखी वाचा

वृश्चिक

आठवडयाच्या प्रारंभी सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील. व्यापार - व्यवसायात भागीदारांशी उत्तम संबंध प्रस्थापित होतील व त्यांच्यामुळे आपल्या प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. दि. ११ व १२ दरम्यान नवीन कामास सुरवात न करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. कोणाच्याही भांडणात वस्तुस्थिती जाणून न घेता मध्यस्थी केलीत तर अडचणीत येऊ शकता. डोके शांत ठेवा... आणखी वाचा

धनु

आठवडयाच्या सुरुवातीस आपण उत्साहीत व आनंदी राहाल. सुरवातीच्या दोन दिवसात आपला व्यापार किंवा आपली नोकरी सामान्यच राहील, मात्र त्यानंतर खूप मोठा फायदा होईल. घरापेक्षा व्यवसायाकडे आपले अधिक लक्ष राहील. मात्र, आपल्या प्राप्तीत वाढ झाल्याने कुटुंबियांना त्यात तक्रार करण्यास वाव राहणार नाही. नोकरी करणार्यांना बोनस किंवा बक्षिसाच्या स्वरूपात लाभ होऊ शकतो... आणखी वाचा

मकर

आठवडयाच्या सुरुवातीस आपल्या घरातील वातावरण आनंदी राहील. आपण कुटुंबियांसह आनंदात दिवस घालवू शकाल. कार्यालयात सहकाऱ्यांची आपणास मदत होईल. नोकरीत विरोधकांवर मात करू शकाल. सध्या शेअर्स बाजार किंवा सट्टाकीय प्रवृत्तीत सहभागी असणाऱ्यांनी शक्यतो व्यवहार करणे टाळावेत किंवा थोडा धीर धरावा. आपण संबंधांच्या बाबतीत खूप उत्साहित व्हाल परंतु अती उत्साहामुळे दोघात क्षुल्लक गोष्टींवरून भांडण होण्याची शक्यता आहे... आणखी वाचा

कुंभ

आठवडयाच्या सुरुवातीस कौटुंबिक वातावरण सौख्यदायी राहिल्याने आपण मनाने प्रसन्न व्हाल. सौख्यदायी घटना घडतील. नोकरीत सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. नवीन धाडस करण्यास किंवा व्यावसायिक कारणांसाठी प्रवास करण्यास आठवडयाचे पहिले दोन दिवस अनुकूल आहेत. सध्या आर्थिक लाभ होण्यास दिवस अनुकूल असल्याने आपण जे काही काम कराल त्यात फायदा होईल... आणखी वाचा

मीन

आठवडयाच्या सुरुवातीस आपणास व्यापार - व्यवसायाच्या विस्ताराची संधी मिळेल. कार्यक्षेत्री नवीन काही करण्याची ईच्छा होईल. वाणीच्या प्रभावाने गिऱ्हाईकांच्या संख्येत वाढ होईल. सहकाऱ्यांचे व वरिष्ठांचे सहकार्य मिळवू शकाल. व्यापाऱ्यांना वसुलीतून पैसा मिळेल. आठवडयाच्या मध्यास कामा निमित्त प्रवास घडण्याची शक्यता आहे. सध्या मौजमजा व मनोरंजनात अधिक खर्च होण्याची शक्यता आहे. नवीन वस्त्र व दागिन्यांची खरेदी करू शकाल... आणखी वाचा

 

Web Title: weekly horoscopes 7 April to 13 April 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.