आठवड्याचे राशीभविष्य 3 मार्च ते 9 मार्च 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2019 12:19 IST2019-03-03T12:07:12+5:302019-03-03T12:19:08+5:30
कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या...

आठवड्याचे राशीभविष्य 3 मार्च ते 9 मार्च 2019
मेष
सुरुवातीस आपण ऊर्जा व उत्साहाचा अनुभव घ्याल. आपले शारीरिक व मानसिक स्वास्थ्य टिकून राहील. कौटुंबिक वातावरण आनंदमय राहील. मित्र व स्नेहीजनांची भेट घडेल. भविष्यासाठी उत्तम आर्थिक नियोजन करू शकाल. लक्ष्मीदेवीच्या कृपेने आर्थिक प्राप्तीत वाढ होईल. व्यावसायिक आघाडीवर आपल्या मनात सतत परिवर्तनाचे विचार येतील... आणखी वाचा
वृषभ
आठवडयाच्या सुरुवातीस नवीन कार्याचे नियोजन किंवा प्रारंभ करू शकाल, परंतु तसे करताना सावध राहण्याची गरज आहे. एखाद्या धार्मिक स्थळाच्या भेटीने आपले मन भक्तिमय होऊ शकेल. दूरवरच्या प्रवासात अडचणी येण्याची शक्यता आहे. दूरवर राहणारे स्नेही, मित्र यांच्या संबंधी काहीशी चिंता उदभवेल... आणखी वाचा
मिथुन
आठवडयाच्या सुरुवातीस आपणास मानसिक त्रास व बेचैनी जाणवण्याची शक्यता आहे. कदाचित आपणास आपल्या वैवाहिक जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी वाटण्याची सुद्धा शक्यता आहे. कोणत्याही प्रकारच्या वाद - विवादा पासून किंवा बौद्धिक चर्चे पासून दूर राहावे. पोटाशी संबंधित विकार होण्याची शक्यता आहे... आणखी वाचा
कर्क
आपली या आठवडयाची सुरुवात चांगली होईल. संतती संबंधी एखादी समस्या निर्माण होईल. संततीच्या अभ्यासासाठी किंवा शाळा - कॉलेजच्या फी संबंधी नियोजन करण्यात काहीसा त्रास होण्याची शक्यता आहे. हा आठवडा आपण आपल्या प्रियव्यक्तीसह आनंदात घालवू शकाल. आपले जुने देणे फेडू शकाल... आणखी वाचा
सिंह
समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींशी संपर्क होऊ शकेल. अनेकदा उगाचच काही कौटुंबिक चिंता सतावतील. प्रणय प्रसंगात अडकण्याची शक्यता असल्याने विवाहबाह्य किंवा अनैतिक संबंधां पासून दूर राहावे. कारकीर्द व भविष्याचे नियोजन करू शकाल. आत्मबल व मनोबल वाढेल. कामात यश प्राप्ती होणे कठीण होईल... आणखी वाचा
कन्या
हे दिवस आपल्यासाठी भाग्याचे असतील. वारसागत मिळकती पासून लाभ होईल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. आपली प्रतिमा उज्ज्वल करण्यासाठी अनुकूलता लाभेल. घर - वाहन ह्यासाठी अनुकूल दिवस आहेत. आपले कार्य धीम्या परंतु स्थिर गतीने यशस्वीपणे पूर्ण होईल. आपल्यासाठी हे दिवस आरामदायी ठरतील... आणखी वाचा
तूळ
आठवडयाच्या सुरुवातीस आपण शारीरिक व मानसिक दृष्टया स्वस्थ राहून आपली सर्व कामे पूर्णत्वास नेऊ शकाल. आठवडयाच्या मध्यास संतती संबंधी चांगली बातमी मिळू शकेल. तसेच त्या दरम्यान प्रणय प्रसंगासाठी सुद्धा अनुकूलता लाभेल. नोकरीत सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. कामात यश प्राप्ती होईल... आणखी वाचा
वृश्चिक
आठवडयाची सुरुवात आपल्यासाठी लाभदायी ठरेल. नोकरी - व्यवसायात आपणास लाभ प्राप्ती होऊ शकेल. मित्रांशी भेट घडून सहलीस जाण्याचा बेत आखू शकाल. विवाहेच्छुकांना मित्रवर्तुळ किंवा परिचितां पैकीच योग्य जोडीदार मिळू शकेल. पुत्र व पत्नी द्वारा लाभ प्राप्ती होईल... आणखी वाचा
धनु
हा आठवडा आपल्यासाठी भेट वस्तूंचा वर्षाव करणारा आहे. आपल्या प्रकृतीच्या तक्रारी दूर होतील. स्फूर्ती अनुभवता येईल. मात्र कफ - सर्दीचा त्रास संभवतो. रक्तदाब, मधुमेह किंवा पित्त प्रकोप सारख्या सामान्यपणे मानसिक त्रास देणाऱ्या समस्यां पासून आराम वाटू लागेल. आपल्या वैवाहिक जोडीदाराशी संबंधातील माधुर्य दृढ होईल... आणखी वाचा
मकर
आठवडयात आपणास शारीरिक व मानसिक समस्यांची काळजी घ्यावी लागेल. डोक्याचा व्याप वाढल्याने आपल्या रागाचा पारा चढला तरी त्यावर आपणास नियंत्रण ठेवावे लागेल. रागाच्या भरात एखादा नकारात्मक किंवा चुकीचा निर्णय घेऊ नये, अन्यथा त्याचे परिणाम भोगावे लागतील. शारीरिक त्रास होत असल्याचे सुद्धा दिसून येईल... आणखी वाचा
कुंभ
आठवडयाची सुरुवात आपल्यासाठी मानसिक अस्वस्थता व बेचैनीने होणार आहे. सुरवातीच्या दोन दिवसात कोणालाही जामीन राहू नका तसेच कोणतीही आर्थिक देवाण घेवाण करू नका अन्यथा मदतीस जाताना स्वतः अडकून बसाल. खर्चाचे प्रमाण वाढल्याने आपणास आर्थिक चणचण जाणवेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य मिळू शकणार नाही... आणखी वाचा
मीन
आठवडयाच्या सुरुवातीस एकीकडे आपण भिन्नलिंगी व्यक्तीसह प्रेम संबंधात अडकाल तर दुसरीकडे आपल्या मनात संबंध तुटण्याची भीती निर्माण होईल. विवाहा संबंधी निर्णय घेणे टाळावे, कारण सध्याची स्थिती आपली दिशाभूल करणारी आहे. आपण मानसिक शांतता मिळविण्यासाठी धार्मिक व आध्यात्मिक प्रवृतींकडे वळू शकाल... आणखी वाचा