आठवड्याचे राशीभविष्य 17 फेब्रुवारी 2019 ते 23 फेब्रुवारी 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2019 08:48 IST2019-02-18T08:48:17+5:302019-02-18T08:48:46+5:30
कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या...

आठवड्याचे राशीभविष्य 17 फेब्रुवारी 2019 ते 23 फेब्रुवारी 2019
मेष
प्रणयी जीवनासाठी हा आठवडा एकंदरीत चांगला असल्याचे दिसत आहे. विवाहेच्छुकांना सुद्धा एखाद्या सामाजिक कार्यक्रमात योग्य जोडीदार मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपल्यात उत्साह ओसंडून वाहू लागेल, त्यामुळे त्याचा सकारात्मक प्रभाव आपल्या कामावर होईल. मात्र, अति उत्साहाच्या भरात आपल्या क्रोधावर नियंत्रण राहण्यासाठी आपण नित्य नेमाने आध्यात्मिक साधना करावी. अधिक वाचा
वृषभ
ह्या आठवडयात संबंधांची सुरवात काहीशी नकारात्मक असल्याचे दिसत आहे. विशेषतः भिन्नलिंगी व्यक्तीशी असलेल्या मैत्रीमुळे अडचणीत सापडावे लागण्याची शक्यता आहे. विवाहितांना वैवाहिक सौख्य जरी चांगले मिळणार असले तरीही जोडीदारा संबंधी काही ना काही चिंता सतत भेडसावत राहील. अधिक वाचा
मिथुन
हा आठवडा आपल्यासाठी सुखदायी आहे. आपल्या जोडीदाराचे सहकार्य आपणास लाभू शकेल. प्रकृतीची कोणतीही तक्रार उरणार नाही. व्यावसायिक आघाडीवर नवीन निर्णय घेता येतील. भागीदारी व्यवसायात व्यवसाय विस्तरण करताना काहीसा त्रास झाला तरी त्याचे निराकरण होऊ शकेल. अधिक वाचा
कर्क
ह्या आठवड्याची सुरवातच मनातील इच्छापूर्तीने होईल. आपल्या प्रिय व्यक्तीशी किंवा वैवाहिक जोडीदाराशी आपले शारीरिक संबंध येऊन आपसातील संबंधात माधुर्य निर्माण होईल. एकमेकांचे सहकार्य प्राप्त होईल. ह्या आठवडयात प्रकृती काहीशी नरम गरम राहील. मानसिक चिंता वाढतील. तणावाचे प्रसंग उदभवतील. शरीरास थोडा आराम द्या. अधिक वाचा
सिंह
विद्यार्थ्यांना पसंतीच्या कॉलेजात किंवा क्लास मध्ये प्रवेश मिळू शकेल. आपणास आता अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल. आपल्या कार्यक्षेत्रात आपला प्रभाव, सन्मान व धाडस ह्यात वाढ होत असल्याचे दिसून येईल. आपल्या विरोधकांना सुद्धा आपल्या कार्याची प्रशंसा करावी लागेल. घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींच्या प्रकृतीमुळे आपणास रुग्णालयात फेर फटका मारावा लागेल. उसने दिलेले किंवा अडकलेले पैसे हाती येतील. अधिक वाचा
कन्या
ह्या आठवडयात आपण आगत - स्वागत करण्यात व्यस्त राहाल. लेखन - वाचन ह्यात आपली गोडी वाढेल. कष्टाच्या मानाने कमी फळ मिळाले तरी सुद्धा आपण कार्यरतच राहाल. आपल्या हातून एखादी मोठी चूक होऊ शकते. आपली एखादी फसवणूक संभवते. कोणताही निर्णय विचारपूर्वकच घ्यावा. रोजंदारी व काम ह्याकडे गंभीरतेने लक्ष द्याल. अधिक वाचा
तूळ
ह्या आठवडयात आपला बहुतांश वेळ आपण व्यावसायिक बाबींसाठी द्याल. काही अन्य ताणामुळे आपल्या संबंधांवर त्याचा प्रभाव पडेल. प्रणयी व वैवाहिक जीवनात सध्या सतत वाद होण्याची शक्यता आहे. आपला अहंकार सतत दुखावला जाण्याची शक्यता असल्याने सावध राहा. आर्थिक बाबतीत सुरवात चांगली होईल. आजवर केलेल्या मेहनतीचे फळ मिळाल्याने आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. अधिक वाचा
वृश्चिक
व्यापक प्रमाणात विचार केल्यास आपल्या प्रणयी जीवना सहित कोणत्याही संबंधात विशेष असा त्रास संभवत नाही. परंतु, ह्या आठवडयातील आपला बहुतांश वेळ व्यावसायिक कार्यात जाईल तेव्हा शक्य असल्यास आपल्या प्रिय व्यक्तीसाठी व कुटुंबियांसाठी थोडा वेळ काढण्याचा प्रयत्न करावा. ज्यांना वैवाहिक जीवनाची सुरवात करावयाची आहे किंवा जे योग्य जोडीदाराच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी दि.२१ च्या मध्यान्हा पासून ते दि.२३ च्या मध्यान्हा पर्यंतचे दिवस अनुकूल आहेत. अधिक वाचा
धनु
ग्रहांच्या भ्रमणानुसार आपणास हा आठवडा मिश्र फलदायी असल्याचे दिसत आहे. आपल्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. कुटुंबात एखाद्या मंगल प्रसंगाचे आयोजन होईल. नवीन व्यक्तीचे आगमन संभवते. पैतृक संपत्तीच्या वादामुळे बिघडलेल्या संबंधात सुधारणा होईल. अचानक आर्थिक लाभ संभवतो. नोकरीत काही मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे. सहकाऱ्यांशी मिळते जुळते घ्या. अधिक वाचा
मकर
हा आठवडा आपल्यासाठी आशास्पद असल्याचे दिसत आहे. नोकरीत सहकाऱ्यांशी संबंध सुधारतील. मातुलाची भेट घडेल. मातुला कडील एखाद्या आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होताना दिसून येईल. एखादि हरवलेली व्यक्ती अचानकपणे सापडेल. आपल्या पाळीव प्राण्याच्या प्रकृतीत सुधारणा होताना दिसून येईल. आपल्या पोटा संबंधी असलेल्या विकाराचे अचूक निदान होईल. अधिक वाचा
कुंभ
सुरुवातीस प्रकृतीची काळजी घेण्याची आवश्यकता भासेल. काळजी घेतली व पथ्य पाळलेत तर औषध घेण्याची गरज भासणार नाही. यश, पद व धन प्राप्ती होईल. परदेशाशी संबंधित कामात उत्तम होऊ शकतील. विझा मिळण्यास अनुकूलता आहे. तसेच आपल्या स्वजनाना भेटण्याची संधी लाभेल. अधिक वाचा
मीन
मातेच्या प्रकृतीची काळजी संपुष्टात येईल, मात्र पित्याच्या प्रकृतीची चिंता वाटेल. कौटुंबिक प्रश्नात अधिकाधिक गुंता निर्माण होईल. ह्या बाबतीत लवकर काही समाधान होऊ शकणार नाही. प्रॉपर्टी संबंधित प्रश्नात सुद्धा लवकर समाधान होत नसल्याचे जाणवेल. व्यापारातील प्रगती धीम्या गतीने होताना दिसून येईल. अधिक वाचा