आठवड्याचे राशीभविष्य - 14 एप्रिल ते 20 एप्रिल 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 09:13 IST2019-04-15T09:12:52+5:302019-04-15T09:13:25+5:30
कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या...

आठवड्याचे राशीभविष्य - 14 एप्रिल ते 20 एप्रिल 2019
मेष
आठवडा आपल्यासाठी एकंदरीत कौटुंबिक व व्यावसायिक जीवनात समतोलपणा साधणारा आहे. विवाहित व्यक्ती आपल्या जोडीदारासह आनंदात दिवस घालवू शकतील तसेच त्यांच्या गरजा भागविण्यासाठी नोकरी - व्यवसायाकडे सुद्धा अधिक लक्ष देतील. आठवडयाच्या मध्यास नोकरीत आपले कौशल्य दाखविण्याची उत्तम संधी लाभेल... आणखी वाचा
वृषभ
आपल्यात शक्ती व स्फूर्ती उत्तम असल्याने काम करण्यात आपण कोठेही कमी पडणार नाहीत. अशा परिस्थितीत व्यावसायिक आघाडीवर व कुटुंबातील व्यक्ती आणी मित्र ह्यांची चांगली साथ लाभल्याने आपण चांगली प्रगती करू शकाल. त्यामुळे चांगली प्राप्ती होण्याची शक्यता सुद्धा आहे. आपल्या वागणुकीमुळे व प्रभावामुळे लोक आपल्याकडे आकर्षित होतील... आणखी वाचा
मिथुन
आठवडयाच्या सुरुवातीस व्यक्तिगत व व्यावसायिक आघाडीवर शांततेचा अनुभव येईल. भावंडांमुळे आपणास लाभ होईल. पूर्वार्धात मित्र व स्वकीयांची भेट होईल, तसेच व्यावसायिक कारणांसाठी त्यांच्यासह छोटे प्रवास होऊ शकतील. व्यावसायिक आघाडीत उच्च पदस्थ व वरिष्ठयांच्याशी संबंध उत्तम राहतील. कुटुंबात एखाद्या वडिलधार्या व्यक्तीकडून आर्थिक लाभ होण्याची अपेक्षा बाळगू शकता... आणखी वाचा
कर्क
आठवडयाच्या पहिल्या दिवशी आपण मानसिक दृष्टया प्रफ्फुलीत राहिल्याने चेहऱ्यावर तेज वाढेल. आपल्यात आत्मविश्वास असल्याचे सुद्धा जाणवेल. व्यावसायिक आघाडीवर चांगली सुरवात होऊन संपूर्ण आठवडाच चांगला जाईल. कोणत्याही प्रकारे धनप्राप्ती व विविध लाभ मिळण्याची दाट शक्यता असल्याने काळजीचे काहीच कारण नाही... आणखी वाचा
सिंह
आठवडयाच्या सुरुवातीसच आवेश व भावना संयमात ठेवून शांतपणे आपले म्हणणे मांडावे. रागामुळे नोकरी - व्यवसायात किंवा घरात एखाद्याशी कटुता निर्माण होण्याची शक्यता आहे. खर्च वाढतील. यश मिळविण्यासाठी इतर मार्गांचा वापर करताना फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. जमीन-जुमल्याचे दस्तावेज करण्यात फसवणूक होण्याची शक्यता अधिक असल्याने सतर्क राहावे... आणखी वाचा
कन्या
आपली मानखंडना होईल अशा कामांपासून दूर राहावे. तसेच प्राप्ती वाढ होण्यासाठी आडमार्ग अवलंबू नये. मधुमेह, अपचनामुळे होणारे पोटाचे विकार, हृदय विकार ह्यापासून जपून राहावे. खोटया कल्पनेमुळे आपली लाचारी वाढेल. संततीच्या आरोग्याची काळजी घ्यावी. घरातील एखाद्या व्यक्तीचे आरोग्य आपल्या काळजीस कारणीभूत ठरेल... आणखी वाचा
तूळ
आठवडयाच्या प्रारंभी आपल्या व्यापार - व्यवसायात भरभराट होत असल्याचे दिसून येईल. नोकरीतील उल्लेखनीय कामगिरीची सुद्धा नोंद घेतली जाईल. प्राप्तीच्या साधनात वाढ झाल्याने आपली आर्थिक चिंता दूर होईल. लोक काय म्हणतील ह्याकडे दुर्लक्ष करून आपण एखाद्या नवीन पद्धतीची सुरुवात कराल. आठवडयाच्या उत्तरार्धात आपल्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतील... आणखी वाचा
वृश्चिक
आठवडयाच्या सुरुवातीस धार्मिक कार्य, देव दर्शन व धार्मिक स्थळाच्या भेटीने आपणास आनंद होईल. परोपकार व निःस्वार्थ सेवा भावनेने प्रेरित होऊन या कार्यांसाठी आपण पैसा खर्च कराल व स्वतः सुद्धा सेवा कार्यात सहभागी व्हाल. राष्ट्रीय स्तरावरील कार्ये, बहुराष्ट्रीय संस्थेतील नोकरी, परदेशातील नोकरी किंवा व्यापाराचे प्रयत्न, दूरवरच्या ठिकाणी व्यापार विस्तार किंवा व्यावसायिक हेतूने प्रवास करण्यास आठवडयाचा पहिला दिवस अनुकूल आहे... आणखी वाचा
धनु
आठवडयाच्या सुरुवातीस काहीशी प्रतिकूलता जाणवेल. आजारपणामुळे वैद्यकीय खर्च करावे लागतील. हा खर्च अचानकपणे उदभवणारा सुद्धा असू शकतो. आठवडयाच्या सुरुवातीस आपण धार्मिक प्रवृत्तीत गुंतलेले असाल. एखाद्या धार्मिक स्थळी जाणे सुद्धा संभवते. ध्येय प्राप्तीसाठी प्रयत्नशील राहाल. आपली वृत्ती न्यायप्रिय राहील. व्यावसायिक आघाडीवर आठवडयाची सुरुवात काहीशी नाजूक राहील... आणखी वाचा
मकर
आठवडयाच्या प्रारंभी आपण व्यापार - व्यवसायाच्या विकासासाठी उत्तम असे नियोजन करू शकाल. आर्थिक देवाण - घेवाण सुरळीत होईल. नोकरीत सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. आपल्या कामाची प्रशंसा करून वरिष्ठ आपला विशेष सन्मान करतील. बोलण्यात संयम न बाळगल्यास जाणता - अजाणता कोणाचे मन दुखावू शकेल... आणखी वाचा
कुंभ
प्रकृती वगळता इतर बाबींसाठी हा आठवडा अनुकूल आहे. कार्यस्थळी व सार्वजनिक स्थळी आपल्या मान - प्रतिष्ठेत वाढ होईल. भागीदारांशी संबंधात सौहार्द टिकून राहील. भागीदारीत पुढील वाटचाल करण्यास सुद्धा अनुकूल संधी लाभू शकेल. शेअर्स बाजार किंवा कोणत्याही प्रकारच्या सट्टाकीय प्रवृत्तीशी संबंधित असलेल्यांनी सध्या नवीन धाडस करू नये... आणखी वाचा
मीन
आठवडयात आपण सर्वांगी प्रगती व प्रत्येक प्रकारच्या संबंधातील सौख्य उपभोगू शकाल. त्याच बरोबर भक्ती व विरक्ती यांच्या भावनेने आपल्या जीवनातील समतोलपणा टिकवू शकाल. व्यावसायिक आघाडीवर आपण प्रगती साधू शकाल. सध्या नवीन काही करण्या ऐवजी हाती जे काही आहे त्यात स्थैर्य राखण्यावर आपले लक्ष केंद्रित राहील... आणखी वाचा