आठवड्याचे राशीभविष्य - 9 डिसेंबर ते 15 डिसेंबर 2018
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2018 10:59 IST2018-12-09T10:57:49+5:302018-12-09T10:59:07+5:30
कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या

आठवड्याचे राशीभविष्य - 9 डिसेंबर ते 15 डिसेंबर 2018
मेष
दि.९ व १० च्या दुपार पर्यंतचे दिवस सामान्यच आहेत. आपणास संतती संबंधी काही चांगली बातमी मिळेल. आपल्यासाठी दिवस कष्टमय असतील. दि.११ व १२ दरम्यान घरी पाहुण्यांची ये - जा राहील. आपण केलेल्या कामाची प्रशंसा होईल... आणखी वाचा
वृषभ
दि.९ व १० च्या दुपार पर्यंत कोणताही महत्वाचा निर्णय घेण्याचे टाळा. मातेशी वाद - विवाद संभवतो. आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी. आहाराकडे विशेष लक्ष द्यावे. पोटाचे विकार संभवतात. अपघात व अस्थिभंग होण्याची शक्यता असल्याने वाहन जपून चालवावे... आणखी वाचा
मिथुन
दि.९ रोजी वैवाहिक जोडीदाराशी मतभेद होतील. कोर्ट - कचेरीची सुद्धा शक्यता आहे. सरकारी कामात त्रास संभवतो. कौटुंबिक वाद - विवाद होतील. आजारी व्यक्तींना हॉस्पिटलायझेशन किंवा शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे... आणखी वाचा
कर्क
दि.९ रोजी आपली आर्थिक समस्या दूर होत असल्याचे जाणवेल. आपण नवीन मैत्री कराल. आपली कामे व्यवस्थितपणे पूर्ण होतील. हा दिवस आनंदात घालवू शकाल. घरी पाहुणे येण्याची शक्यता असून आपण त्यांचे स्वागत करण्यात व्यस्त राहाल... आणखी वाचा
सिंह
आठवड्याची सुरुवात आपण आनंदाने व उत्साहाने कराल. कुटुंबियांसाठी सुद्धा वेळ काढू शकाल. दि.९ हा दिवस आपल्यासाठी खुशीचा आहे. प्रणय संबंधात आपण यशस्वी व्हाल. थोडे नाजूक असे रुसवे फुगवे होतील, परंतु त्याने जवळीक वाढेल... आणखी वाचा
कन्या
आठवड्याच्या सुरुवातीस आपल्या जीवनात पैशांचा ओघ वाढेल, परंतु त्याच बरोबर आपणास प्रकृती विषयक त्रास होत असल्याने आपल्या आनंदावर विरजण पडेल. सुरवातीस आपण कुटुंबियांसह वेळ घालविण्यास पसंती द्याल... आणखी वाचा
तूळ
दि.९ व १० च्या दुपार पर्यंत आपल्या कार्यकौशल्यात वाढ होईल. आर्थिक दृष्टया दिवस चांगले आहेत. नोकरीत व आपल्या कार्यक्षेत्रात परिस्थिती आपणास अनुकूल राहील. नोकरीत आपणास एखाद्या महत्वाच्या कामाची जवाबदारी घ्यावी लागेल... आणखी वाचा
वृश्चिक
दि.९ व १० च्या दुपार पर्यंत आपल्या माणसांसह खुशीत वेळ घालवू शकाल. वैवाहिक जीवनात अनुकूलतेचा अनुभव घेऊ शकाल. आपणास संगीत, साहित्य व कला ह्याची गोडी लागेल. अनेक दिवसांपासून त्रास देत असलेल्या समस्येचे निराकरण होईल... आणखी वाचा
धनु
दि.९ व १० दरम्यान आपल्या आशा वाढतील. कारकिर्दीत अपेक्षित प्रगतीसाठी अधिक श्रम करण्यात आपण कोठेही कमी पडणार नाहीत. आपल्या श्रमाचे चांगले फळ मिळेल. तसेच जीवनात सुख शांती नांदेल... आणखी वाचा
मकर
दि.९ रोजी आपली आर्थिक अडचण दूर होत असल्याचे जाणवेल. आपण नवीन मित्र बनवाल. आपली कामे व्यवस्थितपणे पूर्ण होतील. दिवस आनंदात जाईल. घरी पाहुण्यांचे आगमन होण्याची शक्यता आहे... आणखी वाचा
कुंभ
आठवड्याच्या सुरुवातीस मित्र व नातेवाईक ह्यांच्या भेटीने आनंद होईल. स्त्री मित्रां पासून फायदा होईल. परदेशी जाण्याची इच्छा असणाऱ्यांना अनुकूलता लाभेल. परदेशातून स्नेहीजनांची बातमी मिळाल्याने आनंद होईल... आणखी वाचा
मीन
आठवड्याच्या सुरवातीस ऑफिसात सहकार्याचे वातावरण राहील. व्यावसायिक बाबींकडे आपण अधिक लक्ष द्याल. आपली कार्ये संथ परंतु एका विशिष्ट गतीने पुढे जातील. त्यामुळे आपल्या स्थितीत आपण स्थैर्य व मजबुती आणू शकाल... आणखी वाचा