आठवड्याचे राशीभविष्य - 4 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2019 08:44 IST2019-08-05T08:43:14+5:302019-08-05T08:44:21+5:30

कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या...

weekly horoscope 4 August to 10 August 2019 | आठवड्याचे राशीभविष्य - 4 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट 2019

आठवड्याचे राशीभविष्य - 4 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट 2019

मेष

 

हा आठवडा आपणास अनुकूलतेचा आहे. आपली सर्व कामे शांतपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. प्रलंबित कामे ह्या आठवड्यात पूर्ण होतील. नोकरीत सहकाऱ्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. कुटुंबासाठी एखादे वाहन खरेदी करू शकाल. नवीन वस्त्र व आभूषण ह्यावर सुद्धा खर्च होईल. ह्या आठवड्यात कोणत्याही प्रकारचे नवीन काम हाती घेणे टाळावे. सरकारी कामे पूर्ण करताना वाद होण्याची शक्यता आहे. मात्र, आपले काम उद्यावर ढकलण्याची वृत्ती आपणास सोडावी लागेल... आणखी वाचा

वृषभ 

आठवडा आपल्यासाठी चांगला असला तरी जमीन - जुमल्याशी संबंधित कामात आपणास सावध राहावे लागेल. माते कडून काही लाभ होण्याची शक्यता आहे. स्त्रिया स्वतःसाठी नवीन आभूषण व वस्त्र ह्यांची खरेदी करू शकतील. एखादी हौस - मौज पूर्ण करण्यासाठी व खरेदी करण्यासाठी पैसे खर्च कराल. आठवड्याच्या दुसऱ्या पर्वात द्विधा मनःस्थितीमुळे आपणास निर्णय घेण्यात त्रास होईल. कोणतेच काम पूर्ण न झाल्याने आपले मन काहीसे उदास होईल. एखाद्या अनावश्यक कामात खर्च होण्याची शक्यता आहे... आणखी वाचा

मिथुन

आठवडा आपणास अनुकूलतेचा आहे. नोकरीत सहकाऱ्यांचे अपेक्षित सहकार्य मिळू शकेल. आठवड्याच्या दुसऱ्या पर्वात पदोन्नतीची शक्यता आहे. एखादे विशिष्ट उद्दिष्ट साध्य झाल्याने वरिष्ठ आपल्यावर खुश होतील. आपणास व्यापार - व्यवसाय वृद्धीचा विचार सुद्धा करता येईल. विरोधकांवर मात करू शकाल. आठवड्याच्या मध्यास अचानकपणे खर्च होण्याची शक्यता आहे. मात्र, त्या दरम्यान आपण कामात मग्न असाल. परदेश गमन संभवते. विद्यार्थी ह्या आठवड्यात यशस्वी होऊ शकतील... आणखी वाचा

कर्क

आठवड्याची सुरुवात जरी चांगली झाली तरी दुसऱ्या पर्वात काही त्रास होण्याची शक्यता आहे. प्रत्येक काम नियोजनबद्ध केल्यास आपण तणावमुक्त राहू शकाल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आपल्या कामगिरीने संतुष्ट होतील. कोर्ट - कचेरीच्या कामात सुद्धा यश प्राप्ती होईल. व्यावसायिक क्षेत्रात प्रगतीसाठी प्रयत्नशील राहाल. भागीदारीत सावध राहण्याचा सल्ला आपणास देण्यात येत आहे. आठवड्याच्या उत्तरार्धात द्विधा मनःस्थितीमुळे आपण योग्य निर्णय घेऊ शकणार नाही... आणखी वाचा

सिंह

आठवड्याची सुरुवात काहीशी निराशजनक होईल. नैराश्य येईल, मात्र उत्तरार्धात ते दूर होऊन अपेक्षित परिणाम मिळतील. मनास काळजी वाटत राहिल्याने कामात लक्ष लागू शकणार नाही. कामात यशस्वी होण्यासाठी प्रयत्न वाढवावे लागतील. व्यावसायिक किंवा व्यक्तिगत कामा निमित्त एखादा छोटासा प्रवास करावा लागेल. आठवड्याच्या उत्तरार्धात आपणास अनुकूलता लाभेल. कार्यक्षेत्रात आपली जवाबदारी पार पाडण्यासाठी आपण अधिक परिश्रम कराल... आणखी वाचा

कन्या

आठवडा अपेक्षापूर्तीचा आहे. मात्र, नोकरी करणाऱ्यांचे कामात मन रमणार नाही. परिस्थिती गंभीर झाल्याने आपले मन विचलित होण्याची शक्यता आहे. अनावश्यक कामात खर्च होण्याची शक्यता सुद्धा आहे. ह्या आठवड्यात परदेश गमनासाठी केलेल्या प्रयत्नात यशस्वी होता येईल. आठवड्याच्या दुसऱ्या पर्वात आपली सर्व कामे सहजपणे पूर्ण होतील. एखाद्या नवीन कामाची सुरवात करण्यास अनुकूलता लाभेल. प्राप्तीत वाढ होईल, मात्र आर्थिक देवाण - घेवाण व जमिनी संबंधी कामात सावध राहावे लागेल... आणखी वाचा

तूळ 

आठवड्याच्या सुरुवातीला त्रास झाला तरी उत्तरार्ध अनुकूल आहे. भागीदारीत यशस्वी व्हाल. पूर्ण आत्मविश्वासाने केलेल्या कामात यशस्वी व्हाल. आठवड्याच्या मध्यास नोकरी करणाऱ्यांना काही त्रास होण्याची शक्यता आहे. गुप्त शत्रूंच्या कारवाया वाढतील. आठवड्याचा उत्तरार्ध आपणास अनुकूल असेल. वरिष्ठ आपल्या कामगिरीने खुश होतील. दरम्यान आपण व्यापार वृद्धीचा सुद्धा विचार करू शकता. विद्यार्थ्यांना अभ्यासावर अधिक लक्ष द्यावे लागेल... आणखी वाचा

वृश्चिक 

आठवडा आपणास अनुकूलतेचा आहे. मात्र, नोकरी करणाऱ्यांना सावध राहावे लागेल. आपल्या कामगिरीने वरिष्ठ नाराज होतील. लांब पल्ल्याच्या प्रवासास जाऊ शकाल. धनलाभ संभवतो. एखाद्या नवीन कामाची सुरवात करू शकाल. मित्रांद्वारा काही मोठा फायदा होऊ शकेल. आठवड्याच्या मध्यास परिस्थितीत सुधारणा होईल. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य मिळू शकेल. आठवड्यात खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला आपणास देण्यात येत आहे. एखाद्या खास व्यक्तीचा सहवास आठवड्यात होण्याची शक्यता आहे... आणखी वाचा

धनु

आठवड्याची सुरुवात जरी चांगली झाली तरी उत्तरार्धात काही त्रास होण्याची शक्यता आहे. आठवड्यात आपण व्यापार वृद्धीचा प्रयत्न कराल. आपणास अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. पित्याकडून सुद्धा लाभ होऊ शकतो. एखाद्या खास व्यक्तीचा सहवास आपणास लाभदायी ठरेल. भविष्यात सुद्धा त्याचा फायदा होईल. प्राप्तीत वाढ होईल. आठवड्याच्या मध्यास कामातील एकाग्रता कमी झाल्याने आपले मन त्यात रमणार नाही... आणखी वाचा

मकर 

काही चढ - उतारांचा अपवाद वगळल्यास हा आठवडा आपणास अनुकूल आहे. ह्या आठवड्यात नशिबाची साथ मिळू शकेल. अचानक धनलाभ संभवतो. आठवड्यात एखाद्या व्यक्तीशी उत्तम संबंध जुळून येण्याची शक्यता आहे. वाहनावर खर्च होईल. विरोधकांच्या कारवाया वाढतील. व्यवसायात अपेक्षित यश मिळू शकणार नाही. व्यापाऱ्यांना विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे. उत्तरार्धात सहकाऱ्यांशी संबंधात सुधारणा होईल... आणखी वाचा

कुंभ

आठवड्याची सुरुवात चांगली झाली नाही तरी उत्तरार्ध चांगला असेल. आपणास दैनंदिन कामात मानसिक शांतता लाभेल. ह्या आठवड्यात आपण नवीन वस्त्र व आभूषणे ह्यांची खरेदी करू शकाल. वैभवी जीवनशैलीकडे आपला कल होईल. गुप्त शत्रूंच्या कारवाया वाढतील. व्यावसायिक क्षेत्रात प्रतिस्पर्ध्यांशी वाद होण्याची शक्यता आहे. आठवड्यात लांब पल्ल्याचा प्रवास टाळणे आपल्या हिताचे होईल. उत्तरार्धात आपली कामे विना अडथळा पूर्णत्वास जातील. प्राप्तीचे नवीन मार्ग सापडून आर्थिक लाभ सुद्धा होतील... आणखी वाचा

मीन

आपण जर नकारात्मक विचारांचा त्याग केलात तर आपला हा आठवडा चांगला जाईल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. ह्या दरम्यान व्यावहारिक खर्च जरी सामान्यच झाले तरी एखादा मोठा अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे. ह्या आठवड्यात जमीन, संपत्ती, वाहन व कोर्ट - कचेरीची कामे टाळावी. एखादी नवी मैत्री होईल, जी भविष्यात लाभदायी ठरेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष देण्याची गरज आहे. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या प्रगतीमुळे आपणास आनंद होईल... आणखी वाचा

 

Web Title: weekly horoscope 4 August to 10 August 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.