आठवड्याचे राशीभविष्य - 2 डिसेंबर ते 8 डिसेंबर 2018

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2018 08:15 IST2018-12-02T08:15:33+5:302018-12-02T08:15:41+5:30

कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या...

Weekly horoscope - 2nd December 2018 to 8th December 2018 | आठवड्याचे राशीभविष्य - 2 डिसेंबर ते 8 डिसेंबर 2018

आठवड्याचे राशीभविष्य - 2 डिसेंबर ते 8 डिसेंबर 2018

मेष

दि.२ व ३ च्या दुपार पर्यंत आपण व आपल्या वैवाहिक जोडीदारा दरम्यान असलेले गैरसमज व विवाद संपुष्टात येतील. कौटुंबिक जीवन संतोषजनक राहील. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.  आणखी वाचा

वृषभ

दि.२ व ३ च्या दुपार पर्यंत उत्तम वस्त्र व भोजन प्राप्ती होईल. प्रणय प्रसंग संभवतात. आपणास वेळेचे मूल्य व महत्व समजेल. मनोरंजनात वेळ घालवू शकाल. एखाद्या ठिकाणी फिरावयास जाण्याचा कार्यक्रम ठरू शकेल. आणखी वाचा

मिथुन

दि.२ हा दिवस घर व वाहन प्राप्ती साठी चांगला आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश लाभेल. मातेशी संबंध सुधारतील. दि.३ च्या दुपार पर्यंत थकवा व तणाव जाणवेल. आजारपण येऊ शकते. प्रवासात त्रास संभवतो. आणखी वाचा

कर्क

दि.२ व ३ च्या दुपार पर्यंत धन वैभवात वृद्धी दर्शवित आहे. आपणास महत्वाची बातमी मिळेल. चोहोबाजूने यशप्राप्ती होईल. नोकरीत आपली स्थिती मजबूत होईल. दि.३ च्या दुपार नंतर व दि.४,५ दरम्यान चंद्राचे भ्रमण चतुर्थातून होत असल्याने त्रास वाढेल. आणखी वाचा

सिंह

दि.२ व ३ दरम्यान आहाराकडे विशेष लक्ष द्यावे. अपचन व ऋतूत झालेल्या अचानक बदलामुळे पोटाशी संबंधित विकार होण्याची शक्यता आहे. आपण आराम करण्याच्या मनःस्थितीत असाल. आपणास कामाचा कंटाळा येईल. आणखी वाचा

कन्या

ह्या आठवड्याच्या सुरवाती पासूनच आपले मन प्रफुल्लित राहील. निजानंदासाठी आपण खर्च कराल. हौसमौज पूर्ण कराल. नवीन वस्तूंची खरेदी होण्याची शक्यता दिसत आहे. विशेषतः कुटुंबीयांच्या आरामदायी जीवनशैलीसाठी आपण घरात इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी कराल, रंगरंगोटी किंवा नूतनीकरण करण्याचा विचार कराल. आणखी वाचा

तूळ

आठवड्याच्या सुरवातीस ग्रहमान आपणास अनुकूल नसल्याने दि.२ व ३ च्या दुपार पर्यंतचे दिवस आपल्या मानसिक चिंतेत वाढ करतील. आपल्या व्याकुळतेमुळे शारीरिक त्रास होऊन व्यावसायिक आघाडीवर आपली कामगिरी दुर्बल होईल. आणखी वाचा

वृश्चिक

आठवड्याच्या सुरुवातीस आपले मन प्रफुल्लित-आंतरिक दृष्टया आपणास पुनरुर्जित असल्याचे जाणवेल. दि.२ व ३ दरम्यानचे दिवस चांगले आहेत. चंद्र लाभस्थानी असल्याने अचानक धनप्राप्ती होऊ शकेल.दूरवरून होणाऱ्या लाभात सुद्धा वाढ होऊ शकेल. आपल्या प्राप्तीत वडिलधाऱ्यांचा व मित्रांचा महत्त्वाचा सहभाग असेल. आणखी वाचा

धनु

आठवड्याच्या सुरवातीस आपली नवीन लोकांशी भेट घडेल व कार्यपद्धती तसेच सिद्धीमुळे लोकप्रियतेच्या बाबतीत आपण अग्रस्थानी राहाल. आपल्यासाठी हे दिवस प्रसन्नतेने भरलेले असतील. आपल्या हातून एखादे चांगले कार्य होईल. आणखी वाचा

मकर

दि.२ व ३ दरम्यान एखाद्या धार्मिक किंवा मांगलिक प्रसंगात आपण सहभागी व्हाल. व्यापारा निमित्त प्रवास घडतील. आपल्यात परोपकारी वृत्ती वाढल्याने इतरांना मदतरूप होण्याचा प्रयत्न कराल. दि.३ च्या दुपार नंतर व दि.४, ५ दरम्यान आर्थिक बजेट कोलमडू शकते. आणखी वाचा

कुंभ 

अनेक आव्हानांसह थोडी फार सफलता सुद्धा प्राप्त होईल, परंतु ते आपल्या जन्मस्थ ग्रहांवर पण अवलंबून असेल हे पाहावे लागेल. स्वबळावर काहीतरी करण्याची इच्छा होणे हेच आपले वैशिष्ट्य होय.  आणखी वाचा

मीन 

आठवड्याची सुरवात आपण उत्तम वैवाहिक सुखाने कराल. व्यावसायिक बाबतीत आपण भागीदारासह महत्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्याच बरोबर नवीन करार करण्यासाठी श्रीगणेशजी हिरवा कंदील दाखवीत आहेत. आणखी वाचा

Web Title: Weekly horoscope - 2nd December 2018 to 8th December 2018

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.