आठवड्याचे राशीभविष्य - 28 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर 2018
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 11:21 IST2018-10-29T11:20:54+5:302018-10-29T11:21:57+5:30
कसा असेल तुमचा आठवडा ?, जाणून घ्या...

आठवड्याचे राशीभविष्य - 28 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर 2018
मेष
दि.२९ व ३० दरम्यान नवीन मालमत्ता खरेदी करण्यास अनुकूलता लाभेल. शुभ कार्याचे आयोजन होऊ शकेल व त्यामुळे आनंदमयी वातावरण निर्माण होईल. शेजाऱ्यांशी आपुलकी व जिव्हाळा वाढेल... आणखी वाचा
वृषभ
दि.२९ व ३० दरम्यान आपल्या आर्थिक हिशोबाचे व्यवस्थापन कराल. आर्थिक बाबतीत आपणास थोडे लक्ष घालावे लागेल, अन्यथा कालांतराने आपले नुकसान होत असल्याचे दिसून येईल. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीची प्रकृती बिघडेल... आणखी वाचा
मिथुन
दि.२९ व ३० दरम्यान दिवस अनुकूल आहेत. कार्यात यशाची अपेक्षा बाळगू शकता. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून चांगला फायदा मिळविण्याची सुवर्ण संधी लाभेल. आपण कार्यात काही परिवर्तन कराल, जे आपल्यासाठी लाभदायी ठरेल... आणखी वाचा
कर्क
दि.२९ व ३० दरम्यान एखादी अशुभ बातमी मिळेल. क्लेश व वाद - विवादा पासून दूर राहावे. कोर्ट - कचेरीत परिस्थिती आपणास प्रतिकूल असेल. आपली जिवलग व्यक्तीच आपल्या पाठीवर वार करण्याची शक्यता आहे... आणखी वाचा
सिंह
दि.२९ व ३० दरम्यान आपणास आर्थिक प्राप्ती होईल. आपल्या कार्यक्षेत्राचा विस्तार करण्यासाठी आपण काही नवीन योजना तयार कराल. हे दिवस आपली इच्छापूर्ती करण्याचे आहेत. एखाद्या मंगल कार्याचे आयोजन होऊ शकेल... आणखी वाचा
कन्या
आठवड्याच्या सुरवातीस आपण एखाद्या धार्मिक किंवा मंगल कार्यात सहभागी व्हाल किंवा घरातच अशा एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन कराल अशी शक्यता आहे. दूरवरचे संपर्क वाढतील... आणखी वाचा
तूळ
दि.२९ व ३० दरम्यान उत्साह परत मिळवाल. कुटुंबियांचे सहकार्य लाभेल. आपल्या सल्ल्याचा एखाद्या व्यक्तीस फायदा होऊ शकेल. राजकीय क्षेत्रात यश प्राप्ती होईल. शत्रू व विरोधक हतबल होतील... आणखी वाचा
वृश्चिक
दि.२९ व ३० दरम्यान प्रकृतीची काळजी घ्यावी. आळस जाणवेल. काही करण्याची इच्छा होणार नाही. धनहानी संभवते. कोर्ट - कचेरीच्या कामात विघ्न येऊ शकतात. आपल्या ध्येयावरून आपले लक्ष उडेल... आणखी वाचा
धनु
दि.२९ व ३० दरम्यान भागीदारी किंवा नवीन करार करण्यास सुद्धा दिवस चांगले आहेत. संयुक्त साहसात चांगली बातमी मिळेल. उत्तरार्धात आपल्यात अधीरता वाढेल. शेवटच्या दोन दिवसात विवाहेच्छुकांना विवाहाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल आहेत... आणखी वाचा
मकर
दि.२९ व ३० दरम्यान एखादी अशुभ बातमी मिळेल. क्लेश व वाद - विवादा पासून दूर राहावे. कोर्ट - कचेरीत परिस्थिती आपणास प्रतिकूल असेल. आपली जिवलग व्यक्तीच आपल्या पाठीवर वार करण्याची शक्यता आहे... आणखी वाचा
कुंभ
आठवडयाच्या सुरवातीस कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. गोड बोलून आपले इच्छित काम करवून घ्याल. आरोग्य चांगले राहील. मिष्टान्न मिळू शकेल. प्रवास संभवतात. उगाचच खर्च होणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी... आणखी वाचा
मीन
दि. २९ व ३० दरम्यान आपल्या प्रत्येक कार्यात अडचणी निर्माण होतील. आपण कितीही प्रयत्न केलेत तरी ह्या अडचणी आपण दूर करू शकणार नाही. ह्या दिवसात कष्ट वाढवावे लागतील... आणखी वाचा