आठवड्याचे राशीभविष्य - 28 जुलै ते 3 ऑगस्ट 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2019 08:43 IST2019-07-29T08:39:08+5:302019-07-29T08:43:45+5:30
कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या...

आठवड्याचे राशीभविष्य - 28 जुलै ते 3 ऑगस्ट 2019
मेष
आठवडा आपल्यासाठी उत्तम फलदायी आहे. आठवड्यात आपली सर्व कामे सहजपणे पूर्ण होऊ शकतील. मनात कोणत्याही प्रकारची काळजी किंवा चिंता उदभवणार नाही. कामाच्या ठिकाणी आपला प्रभाव वाढेल. आपण आपली कामे सहजपणे पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. मात्र, संपत्ती विषयक कामात आपणास सावध राहावे लागेल. सरकारी कामात विलंब झाल्याने आपणास नैराश्य येण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडथळा येण्याची शक्यता आहे... आणखी वाचा
वृषभ
आठवडा आपल्यासाठी उत्तम आहे. नोकरी करणाऱ्यांना हा आठवडा अनुकूलतेचा आहे. मान - सन्मानात वाढ होईल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. मात्र, खर्चात सुद्धा वाढ होईल. आठवड्यात जमीन - जुमल्याशी संबंधित कामात सावध राहण्याचा सल्ला आपणास देण्यात येत आहे. आपणास आपली सर्व कामे वेळेवर पूर्ण करावी लागतील. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा उत्तम आहे. त्यांचे अभ्यासावर लक्ष केंद्रित होऊ शकेल... आणखी वाचा
मिथुन
आठवडा आपल्यासाठी मिश्र फलदायी आहे. ज्याचा आपणास भविष्यात मोठा फायदा होऊ शकेल अशा एखाद्या दीर्घ कालीन प्रकल्पात आपण गुंतवणूक करू शकाल. मात्र, आठवड्यात आपणास आर्थिक देवाण - घेवाण सावधपणे करावी लागेल. आपणास आपल्या व्यवहारात पारदर्शकता ठेवावी लागेल. हा आठवडा आर्थिक दृष्ट्या लाभदायी आहे. ह्या आठवड्यात एकाग्रचित्त होण्याची शक्यता नसल्याने विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल... आणखी वाचा
कर्क
आठवडा आपल्यासाठी मिश्र फलदायी आहे. दैनंदिन कामाचा आपणास कंटाळा येईल. कष्टाचे योग्य फळ न मिळाल्याने आपण निराश व्हाल. वरिष्ठ आपल्या कामगिरीवर नाखूष होतील. त्यांच्याशी वाद टाळा. आठवड्याच्या दुसऱ्या पर्वात सहकारी आपल्या कामगिरीची ईर्षा करतील. व्यापारात भागीदारीमुळे मोठा लाभ होऊ शकेल. धन लाभ संभवतो. मात्र, नवीन कामाची सुरवात ह्या आठवड्यात करू नये. विद्यार्थ्यांची अभ्यासातील एकाग्रता कमी होईल... आणखी वाचा
सिंह
आठवडा आपल्यासाठी उत्तम फलदायी आहे. परदेशातून आपणास एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश होतील. नोकरी - व्यवसायातील परिस्थिती आपणास अनुकूल राहील. मात्र, विरोधकांशी चर्चा किंवा वाद टाळण्याचा सल्ला आपणास देण्यात येत आहे. आठवड्यात कोणत्याही प्रकारे देवाण - घेवाणी पासून दूर राहणे उचित ठरेल. आपणास एखादी भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना अपेक्षेनुसार परिणाम मिळू शकेल... आणखी वाचा
कन्या
आठवडा आपल्यासाठी अंशतः चांगला राहील. आठवड्यात आपले विचार काहीसे नकारात्मक असल्याने काही समस्या निर्माण होतील. एखाद्या खास मित्रासह केलेल्या कामात आपणास लाभ होईल. आर्थिक लाभासाठी एखाद्या दीर्घ कालीन प्रकल्पात आपण गुंतवणूक करू शकाल. महिला सौंदर्य प्रसाधने व नवीन वस्त्र खरेदी करू शकतील. मन साशंक झाल्याने कोणत्याही कामात मन रमणार नाही. एखादा लहानसा प्रवास करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही... आणखी वाचा
तूळ
आठवडा एकंदरीत आपणास अनुकूल आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा उत्तम आहे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. आर्थिक लाभ होतील. जमीन - जुमला व वाहन ह्या संबंधित कामात सावध राहावे लागेल. मनातील एखादी चिंता आपल्या दुःखास कारणीभूत ठरेल. आठवड्याच्या अखेरीस एखादे काम पूर्ण झाल्याने आपण आनंदित व्हाल. विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा आठवडा उत्तम आहे. वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगू शकाल... आणखी वाचा
वृश्चिक
आठवडा आपणास मिश्र फले देणारा आहे. ह्या आठवड्यात खर्चात वाढ होईल, मात्र त्यात कंजूषपणा केल्यास आपलेच नुकसान होईल. दरम्यान दीर्घ मुदतीची गुंतवणूक न करणे आपल्यासाठी हितावह राहील. एखाद्या अनोळखी व्यक्तीवर पैशांच्या बाबतीत भरवसा करणे आपणास महागात पडू शकेल. दरम्यान भागीदारी कामावर नजर ठेवणे सुद्धा उचित ठरेल. मनोरंजन, सहल किंवा मेजवानी ह्यावर आपणास खर्च करावा लागेल. आठवड्यात गुप्त शत्रूंच्या कारवाया वाढतील... आणखी वाचा
धनु
आठवडा आपणास अनुकूलतेचा आहे. नोकरी - व्यवसायात लाभ होतील. आपल्यात सर्व कामे सहजपणे पूर्ण करण्याचा आत्मविश्वास असेल. मात्र, विरोधकांच्या कारवाया वाढतील. उत्तरार्धात वरिष्ठांशी वाद संभवतात. आपले काम पूर्ण करण्याचा सल्ला आपणास देण्यात येत आहे. इतकेच नव्हे तर पहिले काम पूर्ण झाल्याशिवाय दुसरे काम हाती घेऊ नये. विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा आठवडा अनुकूल आहे. त्यांचे अभ्यासात एकाग्रचित्त होऊ शकेल. कुटुंबात शांतता नांदेल... आणखी वाचा
मकर
आठवडा आपणास अनुकूल फले मिळवून देणारा आहे. नोकरी करणाऱ्यांच्या स्थितीत सुधारणा होईल. सरकारी कामात लाभ होऊ शकेल. एखादे खास काम झाल्याने आपण आनंदित व्हाल. नोकरी - व्यवसायात लाभ होतील. मित्रांकडून एखादा व्यवहार पूर्ण केला जाईल. नवीन मित्रांकडून आपणास लाभ होऊ शकतो. अचानक धनलाभ संभवतो. आपली कामे योजनेनुसार होतील. नवीन कामाची सुरवात करू शकाल. मात्र, कोर्ट - कचेरीच्या कामात आपणास सावध राहावे लागेल... आणखी वाचा
कुंभ
आठवडा आपणास अनुकूल आहे. आठवड्यात आपण चिंतामुक्त व्हाल. आर्थिक क्षेत्राकडे आपण अधिक लक्ष देऊ शकाल. आपण आत्मविश्वासाने कामात प्रगती साधू शकाल. विरोधकांवर मात करू शकाल. वडिलांकडून सुद्धा काही लाभ प्राप्त होईल. मात्र, जमीन - जुमल्याच्या कामात सावध राहावे लागेल. आठवड्याच्या मध्यास अनावश्यक कामासाठी खर्च होईल. कोर्ट - कचेरीशी संबंधित कामे विचारपूर्वक करावी लागतील... आणखी वाचा
मीन
आठवडा आपल्यासाठी अनुकूलतेचा आहे. नोकरी - व्यवसायात लाभ होईल. दैनंदिन कामे आपण आरामात करू शकाल. बाजारहाट व चित्रपट आपण पैसे खर्च कराल. मात्र, हौस - मौज करताना आपणास बचतीकडे सुद्धा लक्ष द्यावे लागेल. सरकार विरोधी प्रवृतीं पासून दूर राहावे. वरिष्ठांशी कटुता निर्माण होणार नाही ह्याची काळजी घ्यावी. उत्तरार्धात मनात चिंता निर्माण झाल्याने आपल्या कामांचा वेग मंदावेल. विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल. कुटुंबात शांतता निर्माण झाल्याने आपण आनंदित व्हाल... आणखी वाचा