आठवड्याचं राशीभविष्य- 22 ते 28 डिसेंबर 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2019 09:30 AM2019-12-22T09:30:02+5:302019-12-22T09:31:20+5:30

जाणून घ्या कसा असेल तुमचा आठवडा

weekly horoscope 22nd December to 28th 2019 | आठवड्याचं राशीभविष्य- 22 ते 28 डिसेंबर 2019

आठवड्याचं राशीभविष्य- 22 ते 28 डिसेंबर 2019

Next

मेष
ह्या आठवड्यात संततीकडे आपण अधिक लक्ष द्याल. विशेषतः त्यांचा अभ्यास व कारकीर्द ह्याचा आपण गंभीरतेने विचार कराल. आठवड्याच्या मध्यास काहीशी बेचैनी जाणवेल. त्यावर उपाय म्हणजे नामस्मरण व आध्यात्मिक वाचन किंवा प्रवृत्ती करणे हे होय. डोके शांत ठेवावे. आणखी वाचा

वृषभ
कोणत्याही कामात घाई गडबडीत किंवा अविचाराने मार्गक्रमण करणे टाळावे. सुरवातीस आपणास संबंधात प्रतिकूलता जाणवेल, मात्र व्यावसायिक आघाडीवर तशी प्रतिकूलता नसेल. सुरवातीच्या दोन दिवसात शारीरिक व मानसिक आरोग्य दुर्बल असेल. स्वकियांशी कटुता निर्माण होईल. आणखी वाचा

मिथुन
व्यापार - व्यवसायात लाभ, नोकरीत बढती व प्राप्तीच्या साधनातील वृद्धी झाल्याने आपण आनंदित व्हाल. विवाहितांना उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. आपणास भावंडांकडून लाभ व आनंद प्राप्त होईल. मित्रांच्या मैफिलीच्या व स्वकीयांच्या सहवासाचा भरपूर आनंद उपभोगू शकाल. आणखी वाचा

कर्क
आठवड्याच्या सुरवातीस मानसिक आरोग्य उत्तम असल्याचे दिसून येईल. आपण मित्र, स्नेहीजन व कुटुंबीय ह्यांच्या सहवासात आठवडा आनंदात घालवू शकाल. आप्तेष्टांशी आपली जवळीक वाढेल. जवळच्या प्रवासाचे आयोजन होण्याची शक्यता आहे. शारीरिक आरोग्य सुद्धा उत्तम राहील. आणखी वाचा

सिंह
नोकरी करणाऱ्यांचे कामात मन रमेल व नवीन विचारसरणी किंवा कार्यशैलीमुळे ते प्रगती पथावर राहू शकतील. बक्षीस किंवा इतर स्वरूपात लाभ होऊ शकेल. मित्रांच्या भेटीने व सहवासाने आनंदित व्हाल तसेच हा सहवास लाभदायी ठरेल. विवाहेच्छुकांनी जोडीदार निवडताना घाई न करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. आणखी वाचा

कन्या
आर्थिक नियोजन व नव्या कार्याची सुरवात करण्यास आठवड्याचा पूर्वार्ध उत्तम आहे. व्यापार - व्यवसायात लाभ, नोकरीत बढती व प्राप्तीच्या साधनात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल. मित्र, पत्नी, पुत्र इत्यादींकडून चांगली बातमी मिळेल. घरात मंगल कार्याचे आयोजन होईल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. प्रणयी जीवन बहरून उठेल. आणखी वाचा

तूळ
आपल्या सभोवतालच्या लोकांना आपण उल्लेखनीय प्रगती करून दाखविली आहे. त्यामुळे आपणास मान - प्रतिष्ठा, सामर्थ्य, धन इत्यादींची प्राप्ती झाली आहे. कार्यक्षेत्रात व व्यावसायिक क्षेत्रात विस्तार करण्याची आपली इच्छा आहे. आपले लक्ष दीर्घकालीन आर्थिक सुबत्ता मिळविण्याकडे आहे. आणखी वाचा

वृश्चिक
आठवड्याचा पहिला दिवस वगळता बहुतांश आठवडा आपण कुटुंबीय, मित्र व स्नेहीजनांच्या सहवासात आनंदात घालवाल. मित्रांसह मेजवानीस किंवा बाहेर फिरावयास सुद्धा जाऊ शकाल. भावंडांशी अधिक दृढ संबंध होतील. मात्र, आठवड्याच्या उत्तरार्धात व्यावसायिक आघाडीवर किंवा कौटुंबिक आघाडीवर आपणास वाणी व वर्तन संयमित ठेवावे लागेल. आणखी वाचा

धनु
मित्र मंडळ व त्यातही विशेषतः स्त्री मित्रांकडून आपणास काही लाभ होईल. कोर्ट - कचेरीच्या प्रश्नात सावध राहावे. भावनेच्या भरात हातून एखादी चूक होणार नाही ह्याची काळजी घ्यावी. परदेशातून चांगली बातमी मिळू शकेल. कायदेशीर बाबतीत काही समस्या निर्माण होणार नसली तरी कोणताही निर्णय विचारपूर्वकच घ्यावा लागेल. आणखी वाचा

मकर
नोकरी - व्यवसायात उच्च पद मिळून प्राप्तीत सुद्धा वाढ होऊ शकेल. वैवाहिक जोडीदाराशी जवळीक वाढेल. आपणास कुटुंब - समाज, मित्र वर्तुळ व नोकरी - व्यवसायात आनंददायी व लाभदायी बातमी मिळेल. धनलाभ होण्याची बातमी मिळेल, मात्र द्विधा मनःस्थितीमुळे आपण लाभ मिळवण्याची संधी गमावून बसण्याची शक्यता आहे. आणखी वाचा

कुंभ
आठवड्याच्या सुरवातीस एखाद्या धार्मिक स्थळाची भेट घडण्याची शक्यता आहे. मनातील इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. व्यवसायात दूरवरच्या कामात सुरवातीस चालना मिळू शकेल. ज्यांना व्यापारासाठी परदेशात जाण्याची इच्छा आहे त्यांची सुद्धा ह्या दिशेने कामे पुढे सरकतील. संपूर्ण आठवडाभर आपण व्यावसायिक कार्यात व्यस्त राहाल व त्यामुळे कुटुंबीय किंवा प्रियव्यक्तीस वेळ कमी देऊ शकाल. आणखी वाचा

मीन
आठवड्याच्या सुरवातीस मनात नकारात्मक विचार थैमान घालतील, त्यामुळे आपण चुकीच्या मार्गावर जाणार नाही ह्याची काळजी घ्यावी. उपचारांसाठी पैसे खर्च होण्याची शक्यता आहे. नाम स्मरण व आध्यात्मिक विचार मनातील उद्विग्नता दूर करू शकतील. प्रकृती काहीशी नरम - गरम राहील. दुसऱ्या दिवसाच्या दुपारनंतर स्थितीत सुधारणा होऊ लागेल. आणखी वाचा

 

Web Title: weekly horoscope 22nd December to 28th 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.