आठवड्याचे राशीभविष्य - 20 जानेवारी ते 26 जानेवारी 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2019 10:54 IST2019-01-20T10:54:32+5:302019-01-20T10:54:42+5:30
कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या...

आठवड्याचे राशीभविष्य - 20 जानेवारी ते 26 जानेवारी 2019
मेष
ह्या आठवड्याच्या सुरवातीस मानसिक त्रास जाणवेल. त्यामुळे चुकीचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. कोणत्याही बाबतीत वैचारिक गैरसमज होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा
वृषभ
ह्या आठवड्याच्या सुरवातीस मानसिक अशांतता जाणवेल. पैसा येईल परंतु त्याचा उपभोग आपण घेऊ शकणार नाही. कुटुंबात कलह होतील, तेव्हा सावध राहावे. आणखी वाचा
मिथुन
हा आठवडा आपल्या प्रकृतीच्या दृष्टीने चांगला आहे. अनेक दिवसांपासून आपणास जर काही शारीरिक त्रास होत असला तर तो दूर होऊ शकेल. ह्या आठवड्यात विदेशात जाण्यासाठी एखादी परीक्षा द्यावयाची असल्यास त्यात यश प्राप्ती होऊ शकेल. आणखी वाचा
कर्क
हा आठवडा आपल्यासाठी शुभ फलदायी आहे. ह्या आठवड्यात आपल्या इच्छा पूर्ण होत असल्याचे दिसून येईल. आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. कोणास उसने पैसे दिले असल्यास ते अचानकपणे परत मिळू शकतील. आणखी वाचा
सिंह
आठवड्याचा प्रथम दिवस आपण शांततेत घालवाल. मात्र, त्या नंतरच्या दोन दिवसात आपल्या स्वभावात क्रोध व जिद्दीपणा वाढत जाईल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य दुर्बल राहील. तसेच कष्टाच्या मानाने अपेक्षित फळ न मिळाल्याने नैराश्य येईल.आणखी वाचा
कन्या
ह्या आठवड्यात वैवाहिक जीवनात किंवा प्रणयी जीवनात आपणास क्रोधावर नियंत्रण ठेवावे लागेल. सुरवातीस व्यावसायिक बाबतीत आपण अधिक व्यस्त राहाल. ज्यामुळे आठवड्याच्या मध्यास थकवा, बेचैनी व कंटाळ्यामुळे आपणास कोणतेही काम करण्याची इच्छा होणार नाही. आणखी वाचा
तूळ
आठवड्याचा प्रथम दिवस कार्य सफलतेचा आहे. नवीन कामाची सुरवात सुद्धा करू शकाल. व्यापारीवर्ग आपल्या व्यापाराचे आयोजन व विस्तार उत्तम प्रकारे करू शकतील. नोकरीत आपले वरिष्ठ आपणास बढती देण्याचा विचार करू लागतील. आणखी वाचा
वृश्चिक
आठवड्याचा प्रथम दिवस आपणास मध्यम फलदायी ठरणारा आहे. वैवाहिक जीवनात पती - पत्नी दरम्यान काहीशी कटुता निर्माण होईल. व्यवसायात भागीदारा पासून सावध राहावे. त्यांच्याशी अधिक वाद - विवाद किंवा चर्चा करणे टाळावे. आणखी वाचा
धनु
हा आठवडा आपल्यासाठी एकंदरीत शुभ सुरवातीने होईल. ह्या आठवड्यात आपली शारीरिक व मानसिक स्थिती संतोषजनक राहील. शारीरिक त्रास होणार नाही. कामे करण्याची इच्छा होईल. आपला आत्मविश्वास वाढेल व मनोबल सुद्धा दृढ होईल. आणखी वाचा
मकर
हा आठवडा आपल्यासाठी सुखद असल्याचे ग्रहांच्या भ्रमणा वरून दिसत आहे. ह्या आठवड्यात आपल्या मानसिक समस्यांचे समाधान होऊ शकेल. सुखाची निद्रा घेऊ शकाल. नोकरीत चांगली बातमी मिळू शकेल. आणखी वाचा
कुंभ
ह्या आठवड्याच्या सुरवातीस नोकरीत चिंतेचे वातावरण निर्माण होईल. मात्र जस जसा आठवडा पुढे सरकेल तस तशा ह्या चिंता कमी होऊ लागतील. नोकरीच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांना नोकरी मिळू शकेल. आणखी वाचा
मीन
ह्या आठवड्यात व्यापार - व्यवसाय उत्तम राहील. व्यापार वृद्धी होईल. मात्र शारीरिक कष्ट करावे लागतील. कष्टाचे फळ मिळाल्याने आनंदित व्हाल. आर्थिक स्थैर्य लाभेल. खर्चात वाढ झाल्याने बचत दिसू शकणार नाही. आणखी वाचा