आठवड्याचे राशीभविष्य - 18 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर 2018
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2018 10:48 IST2018-11-18T10:48:04+5:302018-11-18T10:48:10+5:30
कसा असेल तुमचा आठवडा?, जाणून घ्या...

आठवड्याचे राशीभविष्य - 18 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर 2018
मेष
दि.१८, १९ व २० च्या दुपार पर्यंत आपणास बेचैनी जाणवेल. आपला विश्वासघात होऊ शकतो. आपल्या कामात विलंब होऊ शकतो. प्राप्तीपेक्षा खर्चाचे प्रमाण अधिक होऊ शकते. आपल्या बोलण्यावर व क्रोधावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे, अन्यथा पालकांशी संबंधात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा
वृषभ
दि.१८, १९ व २० दरम्यान मुलांची इच्छापूर्ती कराल. आपणास खऱ्या - खोट्यातील अंतर समजेल. आपल्यासाठी प्रियजनांपेक्षा कामास अधिक प्राधान्य असेल. आपण उच्च ध्येय गाठण्याचा प्रयत्न कराल. आणखी वाचा
मिथुन
आठवड्याच्या सुरवातीस सार्वजनिक जीवनात आपण कार्यरत राहाल व आपल्या मान - सन्मानात वाढ होईल असे दिसते. आपण दीर्घकालीन आर्थिक सुरक्षा मिळविण्यासाठी प्रयत्नशील राहाल. आणखी वाचा
कर्क
दि.१८ रोजी विवाहेच्छुकांच्या विवाहा संबंधी कामात विघ्न किंवा विलंब होऊन शेवटी सफलता मिळेल. दि.१९ व २० दरम्यान व्यावसायिक क्षेत्रात दिवस अनुकूल राहतील. जुने मित्र व नातेवाईकांची भेट होईल. आणखी वाचा
सिंह
विवाहेच्छुकांच्या बाबतीत कोठे बोलणी होत असल्यास ह्या आठवडयाच्या प्रथम दिवशी त्यात पुढे जाऊ नये, अन्यथा काही ना काही कारणाने त्यात अडथळे येण्याची किंवा बोलणी फिसकटण्याची शक्यता आहे. आणखी वाचा
कन्या
आठवड्याची सुरवात प्रकृतीच्या दृष्टिकोनातून ठीक असल्याचे दिसत आहे. एखाद्या जवळच्या नातेवाईकाच्या प्रकृतीच्या चिंतेने आपणास मानसिक त्रास होऊ शकतो. मात्र हि परिस्थिती काही काळच असेल. आणखी वाचा
तूळ
आठवडयाच्या सुरवातीस आपण कारकिर्दीत प्रगती साधण्यास तसेच व्यवसायात नवीन साहस करण्यास धडपड कराल. दि.१८, १९ व २० दरम्यान आपण व्यावसायिक प्रवास कराल, जे आपल्यासाठी लाभदायी ठरतील. आणखी वाचा
वृश्चिक
दि.१८, १९ व २० दरम्यान एखाद्या नातेवाइकाकडून किंवा कुटुंबीयाकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबियांसह बाहेर फिरावयास जाण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन होऊ शकेल, व त्यात आपण व्यस्त राहाल. जुने व विस्मरणात गेलेले संबंध अचानकपणे ताजे होतील. आणखी वाचा
धनु
दि.१८, १९ व २० दरम्यान दिवस शांततेत घालवू शकाल. आपल्या वैवाहिक जोडीदाराप्रती आत्मीयता वाढेल. कुटुंबियां बरोबर आपली वागणूक भावनाशील राहील. नोकरीत वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश होतील, तसेच कामात त्यांचे उत्तम मार्गदर्शन व पाठिंबा लाभेल. आणखी वाचा
मकर
दि.१८ रोजी विवाहेच्छुकांच्या विवाहा संबंधी कामात विघ्न किंवा विलंब होऊन शेवटी सफलता मिळेल. दि.१९ व २० दरम्यान व्यावसायिक क्षेत्रात दिवस अनुकूल राहतील. जुने मित्र व नातेवाईकांची भेट होईल. चिंता व काळजी दूर होऊ लागेल. आणखी वाचा
कुंभ
आठवडयाच्या सुरवातीस आपण वैवाहिक जीवनातील सुखद क्षणांचा आनंद घेऊ शकाल. आपल्यात जोश व उत्साहाचे प्रमाण अधिक राहील. आपल्यात शक्तीचा संचार होत असल्याचा अनुभव सुद्धा आपणास होईल. आणखी वाचा
मीन
आठवडयाच्या सुरवातीस आपण स्वतःसाठी वेळ काढाल. व्यक्तिमत्व विकासाशी संबंधित प्रवृत्तीत सहभागी व्हाल. मौजमजेसाठी खर्च कराल. तसेच सौंदर्याप्रती जागरूक होऊन आपण सौंदर्योपचार घेण्याची शक्यता सुद्धा आहे. आणखी वाचा