Weekly Horoscope 18 to 24 october 2020 | आठवड्याचे राशीभविष्य - 18 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर 2020, "या" राशीची समाजात प्रतिष्ठा वाढणार, नोकरीत प्रगती होणार

आठवड्याचे राशीभविष्य - 18 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर 2020, "या" राशीची समाजात प्रतिष्ठा वाढणार, नोकरीत प्रगती होणार

मेष 

 

व्यावसायिक आघाडीवर आपली सुरुवात चांगली होऊन कामाच्या फलश्रुतीच्या रूपात आर्थिक लाभ होऊ शकेल. आठवड्याच्या मध्यास आपण लेखी किंवा मौखिक बाबतीत सतर्क न राहिल्यास वरिष्ठांचा आपल्या बद्धल गैरसमज होण्याची शक्यता सुद्धा आहे. हा आठवडा कारकिर्दीच्या बाबतीत अनुकूल असल्याचे दिसत आहे. आठवड्याच्या मध्यास नवीन कामाची सुरवात न करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. ह्या व्यतिरिक्त आठवड्याच्या मध्यास खर्च करण्याची तयारी सुद्धा ठेवावी. विशेषतः स्त्री सहकाऱ्यांशी विनाकारण वाद घालणे किंवा चर्चा करणे टाळावे. आठवड्याच्या उत्तरार्धात भविष्याचा कल तसेच तार्किक नमुना समजून घेण्याच्या आपल्या क्षमतेमुळे कामाच्या ठिकाणी अतिशय अवघड जवाबदारी सुद्धा आपण समर्थपणे पेलू शकाल. उच्च शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आठवड्याचे सुरवातीचे व अखेरचे दिवस अनुकूल आहेत. मधल्या दिवसात सामान्य अभ्यास सोडून पराविज्ञान शिकण्याकडे आपला अधिक कल होईल. आपल्या सामाजिक व कौटुंबिक वातावरणाचा आपल्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडेल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील. समाजातील उच्च वर्गातील लोकांचा सहवास लाभू शकेल. आपल्या संबंधांना आपण चांगल्या पद्धतीने ओळखू शकाल. आठवड्याच्या मध्यास सांधेदुखी, ज्ञानतंतू, रक्तदाब व पोटाशी संबंधित समस्या असणाऱ्यांचे दुखणे वाढून त्यांची कार्यक्षमता कमी होण्याची शक्यता आहे.

वृषभ 

आठवड्याच्या सुरुवातीस व्यावसायिक आघाडीवर आपली वृत्ती आशावादी असल्याने आपल्या समस्या व सभोवतालच्या गैरसोयींप्रती आपण कमी चिंतीत असाल. आपले अंतर्मन आपणास व्यूहात्मक पाऊल उचलण्यास योग्य मार्गदर्शन करेल. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांच्या कृपेने मार्गदर्शन मिळू शकेल. तसेच बौद्धिक बाबतीत आपण प्रगती करू शकाल. उत्तरार्धात आपणास विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतील. आपली गुंतवणूक फलदायी व चांगला परतावा देणारी ठरेल. विद्यार्थ्यांना आठवड्याची सुरवात चांगली होऊन सुद्धा अभ्यासात चढ - उतार येत असल्याचे जाणवेल. उच्च शिक्षणात विघ्ने येऊ शकतात. कुटुंबीय व प्रियव्यक्तीशी संबंध सुधारतील. विवाहितांना आठवड्याच्या मध्यास एकमेकांचा उत्तम सहवास लाभेल, मात्र संबंधात आपले वर्चस्व गाजविण्याची वृत्ती सोडावी लागेल. प्रणयी जीवन, भेटीगाठी, रात्री भोजन इत्यादींसाठी आठवड्याचा अखेरचा दिवस जास्त अनुकूल आहे. आठवड्याच्या उत्तरार्धात आरामदायी जीवनशैलीचा आनंद उपभोगू शकाल. ऋतुमानातील बदलाचा आपल्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होण्याच्या शक्यतेमुळे आरोग्याच्या बाबतीत सुरवातीपासूनच थोडी काळजी घ्यावी लागेल. डोकेदुखी किंवा डोळ्यांची जळजळ होण्याची सुद्धा शक्यता आहे.

मिथुन 

आठवड्याच्या सुरुवातीस आपल्या जीवनात सकारात्मकता व आशावादाचा संचार असेल. गोचरीच्या गुरूचा प्रभाव आपल्या वैवाहिक जीवनावर किंवा प्रियव्यक्तीशी असलेल्या संबंधांवर सकारात्मकच होईल. भागीदारी कार्ये किंवा संयुक्त करार, नोकरीत सहकाऱ्यांशी असलेल्या संबंधात सुद्धा ह्यामुळे फायदा होईल. सुरवातीस आपणास कामे करण्याची चांगली संधी मिळू शकेल, परंतु अखेरच्या दोन दिवसात खर्च करण्याची सुद्धा तयारी ठेवावी लागेल. आता विद्यार्थ्यांचे अभ्यासावर लक्ष केंद्रित होऊ शकेल. तसेच आवडत्या विषयांचा खोलात शिरून अभ्यास करण्यास प्राधान्य असेल. सध्या आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यासाठी आपण काहीतरी नवीन शिकू शकाल. आठवड्याच्या उत्तरार्धात आपल्या मनातील वैचारिक गोंधळामुळे आपले कशातही मन रमणार नाही. अशा परिस्थितीत आपण एकांतात राहण्यास प्राधान्य द्याल व त्यामुळे संबंध किंवा व्यवसायाकडे आपण लक्ष देऊ शकणार नाही. आठवड्याच्या मध्यास हाडांचे विकार किंवा रोगप्रतिकारक शक्तीच्या अभावाचा त्रास सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे आपणास आधी पासूनच काळजी घ्यावी लागेल. विशेषतः उदासीनता, व्याकुळता त्रास संभवतो.

कर्क 

आठवड्याच्या सुरुवातीस आपण जर भावनांवर आवर घातला नाहीत तर त्या व्यक्तिगत जीवनावर विघटनकारी ठरू शकतील. जीवन व संबंधांवर त्याचा गंभीर परिणाम होईल. प्रेम करण्याची व मिळविण्याची इच्छा उत्कट व तीव्र होईल. आपल्या मनातील भावना वैवाहिक जोडीदारा समक्ष स्पष्टपणे व्यक्त करू शकाल. असे असले तरी सध्या आपणास संबंधात कोठे ना कोठे अनिश्चितता असल्याचे जाणवेल. कामात आपली सर्जनात्मकता वाढेल व कामगिरी सुद्धा चांगली होईल. पैतृक व्यवसायात असणाऱ्यांसाठी आठवड्याची सुरवात चांगलीच आहे. नोकरी करणाऱ्यांची कामगिरी उत्तरार्धात चांगली होऊ शकेल. कोणत्याही प्रकारच्या सट्टाकीय प्रवृतींपासून दूर राहणे हितावह होईल. आर्थिक बाबतीत विशेष त्रास होत असल्याचे दिसत नसले तरी व्यापारात अपेक्षेहून कमी नफा होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात अधिक लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. आठवड्याच्या पहिल्या दिवशी कफ, खोकला, छातीत दुखणे इत्यादींचा त्रास होऊ शकतो.

सिंह 

आठवड्यात नोकरीत किंवा किरकोळ कामात आपली कामातील प्राप्ती चालूच राहील, परंतु ती पूर्ण करण्यास अधिक परिश्रम करावे लागण्याची किंवा कामाचे तास वाढण्याची शक्यता आहे. व्यापारात काही त्रास संभवत नसला तरी स्पर्धात्मक वातावरणात आपला निभाव लागण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. सुरवातीच्या दिवसात प्रवासाची शक्यता आहे. दांपत्य जीवनातील गोडवा टिकून राहील. अचानक धनलाभ होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. संततीची त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रगती होईल. कार्यालयीन प्रतिस्पर्ध्यांपासून सावध राहावे. कुटुंबात शुभ प्रसंग घडण्याची किंवा अशा प्रसंगात सहभागी होण्याची शक्यता आहे. सध्या कौटुंबिक व व्यावसायिक अशा दोन्ही आघाडींचा समतोल साधू शकाल. विद्यार्थ्यांना हा आठवडा अनुकूल आहे. आत्ता आपण जर कारकिर्दीवर लक्ष ठेवून कष्ट केलेत तर चांगल्या फळाची आशा बाळगू शकता. शेअर्स - सट्टा किंवा दलालीच्या कार्यात हिशोबीपणा ठेवून धाडस केल्यास लाभ होऊ शकेल. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीत आपण सध्या काही बदल करण्याची शक्यता आहे.

कन्या 

आठवड्याच्या सुरुवातीस आपल्या वाक्चातुर्याने कोणत्याही व्यक्तीस प्रभावित करू शकाल. आपल्या शब्दातून सर्जनात्मकतेचा ठसा उमटेल. इतरांना आपले म्हणणे सहजपणे सांगू शकाल. प्रेम व्यक्त करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी सुद्धा हा आठवडा अनुकूल आहे. जेथे वाणीचे प्रभुत्व असेल अशी व्यावसायिक कार्ये सुद्धा आपण सहजपणे पूर्ण करू शकाल. आठवड्याच्या मध्यास आपल्या सभोवताली मित्रांचा गराडा असेल. त्यांच्या कडून काही भेटवस्तू मिळतील व आपण सुद्धा त्यांच्यासाठी पैसा खर्च कराल. भविष्यात उपयोगी पडतील अशा नवीन लोकांशी मैत्री जुळेल. अविवाहितांना योग्य जोडीदार मिळण्याची शक्यता आहे. उत्तरार्धात कुटुंबियांच्या सहवासात वेळ घालवू शकाल. तसेच त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची इच्छा जागृत होईल. आरोग्य मध्यम राहील. उत्तरार्धात सर्दी, कफ, ताप ह्यांचा त्रास संभवतो. आड मार्गाने पैसे कमविणे आपणास अडचणीत टाकेल. आंधळेपणाने कोणतेही साहस करू नये. विद्यार्थ्यांना एखाद्याशी महत्वाच्या चर्चेत सहभागी होण्याची संधी मिळेल. त्यामुळे आपली ज्ञानवृद्धी होईल.

तूळ 

आठवड्याच्या सुरुवातीस नोकरीत बक्षीस, पदोन्नती किंवा पगारवाढ होण्याची शक्यता सुद्धा आहे. मागील काही दिवसांपासून आपणास व्यवसायात कायदेशीर अडचणी किंवा शासकीय समस्यांमुळे अडथळे जाणवत असतील किंवा नोकरीत वरिष्ठांशी तणाव किंवा त्यांचे सहकार्य मिळत नसल्याचे जाणवत असेल. आता हि परिस्थिती संपुष्टात येऊन ह्या सर्व बाबतीत आपले फासे सरळ पडतील. पैतृक संपत्तीशी संबंधित कार्यात सुद्धा सकारात्मकता येऊन जुने वाद असल्यास आपल्या बाजूने निकाल लागू शकेल. व्यावसायिक आघाडीवर आपण अनेक लोकांच्या संपर्कात याल. ह्या आठवड्यात बहुतांशी संबंधांचे सौख्य उपभोगू शकाल, ज्यात सुरवात चांगली झाल्याने आपण आनंदित व्हाल. मृदुवाणी दीर्घकालीन संबंधांचे बीजारोपण करेल. रोमँटिक मनःस्थितीमुळे वैवाहिक जोडीदार किंवा प्रियव्यक्तीस खुश करण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब कराल. विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला तरी इतर प्रवृत्तीत अधिक रुची दाखवू नये. आरोग्याच्या बाबतीत आठवड्यात काळजी करण्या सारखे काही नाही.

वृश्चिक 

आठवड्याच्या सुरुवातीस आपणास काही प्रमाणात सतर्क व सावध राहून वाटचाल करावी लागेल. सर्व प्रथम पूर्वीच्या थकव्यामुळे आपणास आळस जाणवेल व त्यामुळे कामात मन रमणार नाही तसेच विचारात घुटमळत राहिल्याने निर्णय घेण्यास असमर्थ व्हाल. त्याच बरोबर संबंधात रुची राहणार नाही. आरोग्यास सुद्धा नाजूकपणा येईल. प्रथम दोन दिवसात पोटाचे विकार संभवतात. नवीन कार्याची सुरवात व प्रवास न करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. आपली प्रतिमा मलीन होईल अशा कोणत्याही कार्यापासून दूर राहावे. आठवड्याच्या मध्यास नोकरीत फायदा झाला तरी वरिष्ठांकडून खूप मोठी आशा बाळगू नये, तसेच त्यांच्याशी नम्रतेने वागावे. कार्यालयात आपल्या विरुद्ध कट - कारस्थान करणाऱ्यांवर मात करू शकाल. वैवाहिक जोडीदार किंवा स्वतःसाठी नवीन कपडे, दागिने किंवा वाहन खरेदी करू शकाल. उत्तरार्धात प्राप्तीत वाढ करण्यावर लक्ष केंद्रित कराल. वसुली किंवा संपत्तीचे सौदे झाल्याने आपल्या हाती पैसा येईल. सुरवातीस विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन कमीच लागेल.

धनु 

आठवड्याच्या पूर्वार्धात आपल्या मनातील योजना साकार होतील. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल किंवा त्यासाठी प्रवास कराल. घरात मंगल किंवा धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी आठवडा अनुकूल आहे. विदेशाशी संबंधित कामास गती येण्याची किंवा त्यासाठी प्रवास करावा लागण्याची शक्यता आहे. एखाद्या लांब पल्ल्याच्या प्रवासाचा विचार करत असल्यास त्यास सकारात्मक गती येईल. व्यापाऱ्यांची वसुली होऊ शकेल. नोकरी - व्यवसायात लाभदायी परिणाम मिळेल. नोकरी करणाऱ्यांना कार्यालयात सहकाऱ्यांचे व वरिष्ठांचे सहकार्य मिळू शकेल. व्यापाऱ्यांना प्रतिस्पर्ध्यांवर मात करता येईल. नवीन कार्याचा प्रारंभ करण्यासाठी हा आठवडा अनुकूल आहे. मात्र, आठवड्याच्या दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी आपले कामात लक्ष न लागल्याने प्रतिकूलता जाणवेल. ह्या दोन्ही दिवशी आरोग्य विषयक त्रास सुद्धा होऊ शकतो. पहिल्या दिवशी संबंधात आपण उत्तम प्रकारे वाटचाल करू शकाल. दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी प्रियव्यक्तीशी वाद होऊ शकतो. त्या नंतरच्या दिवसात वैवाहिक जीवनात किंवा प्रणयी जीवनात जवळीक वाढेल.

मकर 

आठवड्याच्या पहिल्या दिवशी कारकीर्दीस आपण केंद्रस्थानी ठेवाल व आपले बहुतांशी क्रियाकल्प व्यावसायिक कार्यातच केंद्रित राहतील. व्यवसायात आपल्या वाक्चातुर्याने इतरांची मने जिंकू शकाल. नियोजित कामात यश प्राप्ती झाल्याने आत्मविश्वास वृद्धिंगत होईल. व्यवसायाशी संबंधित कोणताही निर्णय आत्मविश्वासाने घेऊ शकाल. व्यापारात लाभ होईल. प्राप्तीचे नवीन मार्ग सापडतील. सुरवातीस स्नेही व स्त्री मित्रांकडून लाभ होईल. एखाद्या रम्य ठिकाणी सहलीस जाऊ शकाल. मित्रांचे सहकार्य सुद्धा मिळेल. प्रियजनांशी रोमांचित करणारी भेट होण्याचा प्रसंग उदभवेल व ह्या भेटीमुळे आपण आनंदून जाल. आठवड्याच्या मध्यास मानसिक व्याकुळता जाणवेल. अशा स्थितीत कोणतेही नवीन काम न करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. ह्या आठवड्यात धार्मिक किंवा मंगल कार्यात सहभागी व्हावे लागेल किंवा तीर्थयात्रा घडेल. अखेरच्या दोन दिवसात आपल्यात पुन्हा उत्साह संचारेल. आठवड्याच्या मध्यास विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडथळे येऊ शकतात. आठवड्याच्या मध्यास बेचैनी जाणवेल. ह्या व्यतिरिक्त कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या प्रकृती विषयक काळजीमुळे सुद्धा आपल्या प्रकृतीस त्रास होऊ शकतो.

कुंभ 

आठवड्याच्या सुरवातीस व्यावसायिक कारणांसाठी काही खर्च होण्याची शक्यता आहे. मात्र, कालांतराने त्यातून लाभ होण्याची अपेक्षा आपण बाळगू शकता. व्यापारात विकासाची संधी आल्यास जास्त विचार न करता संधीचा लाभ घ्या. आपल्या कठोर वाणी व वागणुकीमुळे प्रगतीस खीळ बसण्याच्या शक्यतेमुळे आपणास वाणी व वागणूक नियंत्रित ठेवावी लागेल. नोकरीत लाभ होईल. स्थान परिवर्तन किंवा जवाबदारीत बदल होण्याची शक्यता आहे. उत्तरार्धात एखाद्या धार्मिक किंवा मंगल कार्यात आपण सहभागी होण्याची शक्यता आहे. आपणास धनलाभ होण्याची सुद्धा शक्यता आहे. स्नेहीजनांशी हट्टीपणा सोडून समाधानी वृत्ती जर आपण बाळगलीत तर संभाव्य समस्या निर्माण होण्या पूर्वीच त्या संपुष्टात येतील. भिन्नलिंगी व्यक्तींशी जवळीक वाढेल. त्यात सुद्धा उत्तरार्धात संबंधांना आपण नवीन उंचीवर नेऊ शकाल. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुरवातीचे दिवस तर सामान्य अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आठवड्याचे मधले दिवस अनुकूल आहेत. अखेरच्या दिवशी आपणास मानसिक थकवा व शारीरिक सुस्ती जाणवेल.

मीन 

आठवड्याच्या सुरुवातीच्या दिवशी आपण व्यावसायिक बाबतीत संपूर्णपणे लक्ष केंद्रित करू शकणार नसल्याने महत्वाचे निर्णय घेणे टाळावे. पहिल्या दिवशी आपण स्वतःच्या स्थितीचे आकलन व आत्मचिंतन करू शकाल. दुसऱ्या दिवसापासून आपणास आर्थिक लाभ व सामाजिक प्रतिष्ठेसह कौटुंबिक जीवनात सुख समाधान असल्याचे जाणवेल. सध्या शासकीय किंवा न्यायालयाशी संबंधित कामात सावधपणे पाऊल टाकावे. आपण धार्मिक मार्गावर वाटचाल करून एखाद्या तीर्थयात्रेस जाण्याचे आयोजन कराल. प्रथम दिवस वगळता प्रियव्यक्ती किंवा स्नेहीजनांच्या सहवासात आनंदात वेळ घालवू शकाल. मनोरंजन, प्रवास, मित्रांची भेट, रुचकर भोजन, सुंदर वस्त्र परिधान, भिन्नलिंगी व्यक्तींची जवळीक आपणास आनंदित करेल. भागीदारी व्यवसायात लाभ होईल. अखेरच्या दिवशी संबंधांना नवीन उंचीवर घेऊन जाण्यात आपण यशस्वी व्हाल. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे अध्ययन चांगले होऊ शकेल. ह्या आठवड्यात प्राप्तीच्या साधनात वाढ झाल्याने आपला कल वैभवी जीवनशैलीकडे होण्याची शक्यता आहे. आरोग्य विषयक त्रास दिसत नसला तरी पाठदुखी, रक्तदाब, डोळ्यांची जळजळ होण्याचे विकार असणाऱ्यांनी थोडी काळजी घ्यावी.

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Weekly Horoscope 18 to 24 october 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.