आजचे राशीभविष्य 23 जुलै 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2019 08:24 IST2019-07-23T08:23:50+5:302019-07-23T08:24:49+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

आजचे राशीभविष्य 23 जुलै 2019
मेष - शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या अस्वास्थ्याचा अनुभव येईल. सर्दी, खोकला, ताप इ. चा त्रास होईल. आणखी वाचा
वृषभ - आज आपली आवक आणि व्यापार यांत वाढ होईल. व्यापारात नवीन लाभदायक संपर्क वाढतील. आणखी वाचा
मिथुन - आज आपले प्रत्येक काम सुरळितपणे पार पडेल. घर, ऑफिस आणि सार्वजनिक ठिकाणी अनुकूल वातावरण राहिल्याने प्रसन्न वाटेल. आणखी वाचा
कर्क - शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्या बरोबरच भाग्योदयाची संधी आपली प्रसन्नता वाढवेल. परदेशातून सुवार्ता येतील. आणखी वाचा
सिंह - आपल्या तब्बेतीकडे विशेष लक्ष पुरविण्याची सूचना श्रीगणेश देत आहेत. आजारपणामुळे दवाखान्याचा खर्च वाढेल. आणखी वाचा
कन्या - सामाजिक आणि सार्वजनिक क्षेत्रांत लाभाबरोबरच प्रसिद्धी पण मिळेल. स्त्री वर्गाकडून विशेष लाभ होईल. आणखी वाचा
तूळ - नोकरदारांसाठी आजचा दिवस अत्यंत लाभदायक आहे. नोकरीत यश आणि सफलता मिळेल. आणखी वाचा
वृश्चिक - आपल्या घरगुती जीवनात शांतीचे व आनंदाचे वातावरण राहील. तसेच आरोग्य चांगले राहील. आणखी वाचा
धनु - आज आपणात शारीरिक आणि मानसिक स्फूर्ती आणि उत्साह यांचा अभाव राहील. कुटुंबात क्लेश आणि कलहजन्य वातावरण राहील. आणखी वाचा
मकर - आजचा पूर्ण दिवस सुखाचा जाईल. अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याने आपण प्रत्येक काम व्यवस्थित पूर्ण करू शकाल. आणखी वाचा
कुंभ - द्विधा मनःस्थिती मुळे निर्णय शक्तीचा अभाव जाणवेल. परिणामतः उलघाल होईल. तब्बेत पण साथ देणार नाही. आणखी वाचा
मीन - आज आपणाला आनंद, उत्साह आणि प्रसन्नतेचा अनुभव येईल. नवीन कार्यारंभ लाभदायक ठरेल. आणखी वाचा