आजचे राशीभविष्य - 1 एप्रिल 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 06:50 IST2019-04-01T06:50:24+5:302019-04-01T06:50:46+5:30

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

Today's horoscopes - April 1, 2019 | आजचे राशीभविष्य - 1 एप्रिल 2019

आजचे राशीभविष्य - 1 एप्रिल 2019

मेष
आजचा दिवस आपणाला लाभदायक असल्याचे श्रीगणेश सांगतात. व्यवसाय- धंद्यात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे. आणखी वाचा

वृषभ
आज आपण व्यापार अधिक विकसित करण्याकडे अधिक लक्ष द्याल. नवीन योजना आणि नवी विचारधारा यांमुळे व्यापार प्रगतीच्या दिशेने वाढत जाईल. आणखी वाचा

मिथुन
खाण्या-पिण्याकडे विशेष लक्ष पुरविण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. नकारात्मक विचार मनातून काढून टाका.आणखी वाचा

कर्क
कोणाशी भावनात्मक संबंधाने जोडले जाल व ते आज अधिक भावनाशील बनतील असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा

सिंह
व्यापार विस्ताराच्या दृष्टीने अर्थनियोजन करण्यासाठी दिवस अनुकूल आहे असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा

कन्या
वस्त्र आणि अलंकारांची खरेदी आनंददायी राहील. कलेत विशेष गोडी वाटेल. व्यापारातील विकासामुळे मनात आनंद छटा राहील. आणखी वाचा

तूळ
आजचा दिवस मध्यम फळदायी आहे. स्थावर संपत्ती विषयक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. आणखी वाचा

वृश्चिक
व्यावसायिकांना दिवस अनुकूल आहे असे श्रीगणेश सांगतात. गृहस्थजीवनात निर्माण झालेल्या समस्या सुटतील.  आणखी वाचा

धनु
उक्ती आणि कृतीवर नियंत्रण ठेवले तर इतरांशी मतभेदाचे प्रसंग टाळू शकाल असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा

मकर
श्रीगणेश सांगतात की आज व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. आज प्रत्येक कार्य विनाविघ्न पार पडेल. आणखी वाचा

कुंभ
आज मानसिक दृष्ट्या धार्मिक भावना जास्त निर्माण होतील. धार्मिक कार्य किंवा धार्मिक यात्रा यांसाठी खर्च करावा लागेल. आणखी वाचा

मीन
शेअर- सट्टा यातून आज आर्थिक लाभ होईल असे श्रीगणेश सांगतात. विवाहोत्सुकांना योग्य जोडीदार मिळेल. आणखी वाचा

 

Web Title: Today's horoscopes - April 1, 2019