आजचे राशीभविष्य - 11 एप्रिल 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2019 08:44 IST2019-04-11T08:31:42+5:302019-04-11T08:44:47+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

आजचे राशीभविष्य - 11 एप्रिल 2019
मेष
आपणाला नवीन कार्य करण्याची प्रेरणा मिळेल. तथापि विचारात स्थिरतेचा अभाव असल्यामुळे काही बाबींत त्रास होईल. नोकरी व्यवसायात स्पर्धात्मक वातावरण असेल. जवळपासच्या यात्रेचा योग येईल... आणखी वाचा
वृषभ
मनाची दोलायमान अवस्था महत्त्वाच्या संधीपासून आपणाला दूर ठेवेल. आज नवे कार्य सुरू करणे उचित ठरणार नाही. चर्चेत आपल्या फसव्या व्यवहारामुळे संघर्ष निर्माण होईल... आणखी वाचा
मिथुन
आजचा दिवस उत्साह आणि स्फूर्तीदायक आहे. स्वादिष्ट भोजन, सुंदर वस्त्रालंकार तसेच मित्र आणि आप्तयांचा सहवास यांमुळे दिवस खूप आनंदात जाईल. दांपत्यजीवनात सुखा-समाधानाची भावना राहील... आणखी वाचा
कर्क
परिवारात मतभेदाचे प्रसंग येतील. त्यामुळे मानसिक दृष्ट्या अस्वस्थ राहाल. द्विधा मनस्थिती राहील. त्यामुळे महत्त्वाचे निर्णय लांबणीवर टाका. कोणाशी गैरसमज किंवा वादविवाद होण्याची शक्यता आहे... आणखी वाचा
सिंह
आजचा दिवस आपणासाठी लाभदायक ठरेल, पण मनाची दोलायमान अवस्था हाती आलेली संधी गमावू देणार नाही याची दक्षता घ्या. स्त्री वर्गाशी मुलाकात होईल व ती लाभदायक ठरेल. वडीलधार्यांचे आशीर्वाद मिळतील... आणखी वाचा
कन्या
नवीन कार्याची सुरुवात करण्या विषयी मनात आखलेल्या योजना साकार होतील. पित्या बद्दल आत्मीयता वाढेल. त्यांच्याकडून लाभ होईल. व्यापारी तथा नोकरदार आपल्या क्षेत्रांत पुढे जात राहतील. धन, मान- सन्मान वाढेल... आणखी वाचा
तूळ
बुद्धिवादी आणि साहित्य प्रेमी यांच्या सहवासात ज्ञानाच्या चर्चेत वेळ घालवाल. नवीन कामे हाती घ्याल. दूरचे प्रवास किंवा तीर्थस्थानाला भेट द्याल. तब्बेत यथा तथाच राहील... आणखी वाचा
वृश्चिक
उक्ती आणि कृती यांवर आज संयम ठेवा. दैनंदिन कामे वगळता इतर कामे हाती घेऊ नका. आजारी पडण्याचा संभव आहे. खाणे- पिणे सांभाळा. अचानक धनलाभ होईल... आणखी वाचा
धनु
पार्टी, पिकनिक, प्रवास, रुचकर भोजन, सुंदर वस्त्र धारणा ही आजच्या दिवसाची विशेषता आहे. मनोरंजन विश्वात रमून जाल. भिन्न लिंगीय व्यक्तीशी रोमांचक मुलाकात होईल. दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल... आणखी वाचा
मकर
आजचा दिवस व्यापार धंद्यातील प्रगती आणि आर्थिक नियोजन यासाठी अनुकूल आहे. वसुली तसेच पैशांच्या देवाण- घेवाणीत यश मिळेल. आयात- निर्यातीचा व्यापार करणार्यांना फायदा होईल... आणखी वाचा
कुंभ
मानसिक अशांतता आणि उद्विग्नता यांनी भरलेला दिवस आहे. सातत्याने विचार बदलत राहतील त्यामुळे निर्णायकता असणार नाही. ठोस निर्णय घेऊ शकणार नाही. संततीचे प्रश्न बेचैन करतील... आणखी वाचा
मीन
आजचा दिवस दक्षता बाळगण्याची सूचना आहे. आईची तब्बेत हा चिंतेचा विषय होईल. तब्बेत बिघडण्याची शक्यता आहे. मानसिक उद्वेग, धनहानी आणि मानहानी होईल... आणखी वाचा