आजचे राशीभविष्य 20 सप्टेंबर 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2019 07:02 IST2019-09-20T07:01:59+5:302019-09-20T07:02:34+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या

आजचे राशीभविष्य 20 सप्टेंबर 2019
मेष - श्रीगणेश आज आपल्याला आर्थिक बाबी आणि देणे-घेणे या मुद्दयांवर जागरूक राहायला सुचवतात. वादविवादापासून दूर राहा अन्यथा कुटुंबातील सदस्या बरोबर भांडणे होतील. खाण्यापिण्याची काळजी घ्या नाहीतर स्वास्थ्य खराब होईल. आणखी वाचा
वृषभ - श्रीगणेश कृपेने आपला आजचा दिवस फायद्याने भरलेला जाईल. शरीर व मनाने आज तुम्ही स्वस्थ राहाल. तसेच पूर्ण वेळ ताजेतवाने राहाल. आपल्यात असलेली कलात्मकता व सृजनात्मकता यांचा उपयोग कराल. आणखी वाचा
मिथुन - कौटुंबिक आणि व्यावसायिक क्षेत्रांमध्ये आजचा दिवस फार चांगला जाईल. दोन्ही ठिकाणी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होऊन निर्णयाप्रत स्थिति येईल. कामाचा व्याप वाढल्याने तब्बेतीची कुरकुर वाढेल. परंतु दुपारनंतर मात्र तब्बेतीत सुधारणा होईल. आणखी वाचा
कर्क - श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस तुम्हाला लाभदायक जाईल. नोकरी धंद्यात अनुकूल वातावरण असेल. धनलाभाची शक्यता आहे. मित्रांकडून विशेषतः स्त्रीवर्गाकडून फायदा होईल. मित्रांबरोबर प्रवासाला जाऊ शकता. आणखी वाचा
सिंह - आपल्या दृढ आत्मविश्वास व मनोबल याच्या मदतीने सगळी कामे यशस्वी कराल, असे श्रीगणेश सांगतात. व्यवसाय धंदयात आपली बौद्धिक चुणूक दिसेल. नोकरीत पदोन्नतीचे योग येऊ शकतात. वरिष्ठांना तुमच्या कामाने प्रभावित कराल. आणखी वाचा
कन्या - श्रीगणेश म्हणतात की, आजचा आपला दिवस आनंदात जाईल. आर्थिक फायदा होईल. तसेच परदेशात राहणार्या नातेवाईकांच्या वार्ता समजतील, त्यामुळे तुम्ही आनंदात असाल. धार्मिक कार्य किंवा धार्मिक सहली यासाठी खर्च होईल. आणखी वाचा
तूळ - कोणत्याही नवीन कामाचा आज आरंभ न करण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. आपले बोलणे आणि वर्तन नियंत्रणात ठेवा नाहीतर गैरसमज होऊ शकतात, ज्यामुळे नुकसान होऊ शकते. हितशत्रूपासून सावधान. तब्येतीची चांगली काळजी घ्या. गूढ विद्येकडे आकर्षण वाढेल. आणखी वाचा
वृश्चिक - श्रीगणेश सांगतात की आज आपण सगळा दिवस आनंद उल्हासात घालवाल. रोजच्या कामातून वेळ काढून स्वतःसाठी थोडा वेळ मिळवाल. मित्राबरोबर कुठे तरी प्रवासास जाल. उत्तम जेवण मिळेल व नवीन आभूषणे मिळतील ज्यामुळे तुम्ही खूप आनंदी राहाल. आणखी वाचा
धनु - श्रीगणेशांच्या आशीर्वादाने आजचा आपला दिवस शुभ जाईल. स्वास्थ्य चांगले राहील. यश, कीर्ती, आनंद यांची प्राप्ती होईल. कुटुंबिया समवेत आनंदात वेळ घालवाल. प्रतिस्पर्धी आणि शत्रूवर विजय मिळवाल. आणखी वाचा
मकर - आज आपण मनाने खूप अशांत व असमंजसपणाने राहाल. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ शकणार नाही, त्यामुळे तणावात राहाल. श्रीगणेश सल्ला देतात की कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय आज घेऊ नका. नशीब आज तुमच्याबरोबर नाही, त्यामुळे तुम्ही निराश असाल. आणखी वाचा
कुंभ - श्रीगणेश म्हणतात की अधिक संवेदनशील झाल्याने आपले मन बेचैन आणि अस्वस्थ होईल. जीद्दी बनाल. सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होणार नाही याची काळजी घ्या. स्थावर- संपत्ती किंवा वाहन यांचे कागदपत्र बनवताना सावधानी बाळगा. आणखी वाचा
मीन - श्रीगणेश म्हणतात की महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी आज शुभ दिवस आहे. विचारात दृढता राहील. कामे पूर्ण होतील. सृजनात्मक आणि कलात्मक शक्ती वाढेल. मित्र, परिवारासोबत प्रवासाला जाल. भावाबहिणी कडून फायदा होईल. आणखी वाचा