आजचे राशीभविष्य - ६ नोव्हेंबर २०२०; स्त्री व वाणीपासून दूर राहण्याचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2020 22:40 IST2020-11-05T22:35:50+5:302020-11-05T22:40:01+5:30
Todays Horoscope 6 November 2020 : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस...

आजचे राशीभविष्य - ६ नोव्हेंबर २०२०; स्त्री व वाणीपासून दूर राहण्याचा सल्ला
मेष - आज तुमचे मन चंचन राहील. त्यामुळे निर्णय घेणे कठीण जाईल. त्यामुळे महत्त्वपूर्ण काम पुरे करू शकणार नाही. प्रतिस्पर्ध्यांशी सामना करावा लागेल पण नवीन काम करण्याची प्रेरणा मिळेल. आणखी वाचा.
वृषभ - आज अगदी स्थिर होऊन काम करण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. तसे न केल्यास चांगल्या संधी हातातून निसटून जाऊ शकतात. आज हट्ट न करता समाधानी राहिलात तर चांगले होईल. आणखी वाचा.
मिथुन - आजचा आपला दिवस आर्थिक दृष्ट्या लाभदायक असल्याचे श्रीगणेश सांगतात. शारीरिक व मानसिक दृष्ट्या तुम्हाला प्रसन्नता व उत्साह यांचा अनुभव येईल. आणखी वाचा.
कर्क - श्रीगणेश सांगतात की आज आपण खिन्नता आणि भय अनुभवाल. कुटुंबात मतभेद झाल्याने कौटुंबिक वातावरण तणावपूर्ण असेल. मन द्विधा असेल त्यामुळे बेचैन असाल. आणखी वाचा.
सिंह - श्रीगणेश कृपेने आज व्यापारात लाभ व मिळकतीत वाढ होईल. उत्तम भोजन प्राप्त होईल. मित्रांबरोबर रम्य स्थळाला भेट देऊ शकता. स्त्री मित्रांचे विशेष सहाय्य मिळेल. आणखी वाचा.
कन्या - श्रीगणेश कृपेने आज आपण नव्या कामाची जी योजना बनवली आहे ती पूर्ण होईल. व्यापार व नोकरी असलेल्यांना आजचा दिवस फायद्याचा आहे. आणखी वाचा.
तूळ - आज तुम्हाला आर्थिक लाभ मिळेल. मोठ्या लोकांसोबत संबंध वाढविण्यासाठी चांगला दिवस. नोकरीसाठी प्रयत्नही लाभदायी. कौटुंबिक आयुष्यही सामान्य राहिल. संपत्तीमध्ये गुंतवणूक किंवा वाहन खरेदी होईल. कामासाठी प्रवास लाभदायक ठरेल. निर्णय घेताना भावूक होऊ नका.
वृश्चिक - आज तुम्ही स्वास्थ्याकडे जास्त लक्ष द्या असे श्रीगणेश सांगतात. कफ, श्वास, किंवा पोट यांचा त्रास होऊ शकतो. शरीराने व मनाने आज अस्वस्थ राहाल. आणखी वाचा.
धनु - श्रीगणेशांच्या आशीर्वादाने तुमचा आजचा दिवस सुखशांती व आनंदात व्यतित होईल. मित्रांबरोबर चांगला दिवस. स्वादिष्ट भोजन, नवे कपडे प्राप्त होतील. आणखी वाचा.
मकर - आज आपले स्वास्थ्य चांगले राहील. यश, कीर्ती आणि आनंद प्राप्त होतील. कुटुंबीयांसमवेत आनंदात दिवस जाईल. आणखी वाचा.
कुंभ - श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस हा आपला दिवस नाही. वैचारिक दृष्ट्या गर्क राहिल्याने कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय न घेणे हेच बरे. आणखी वाचा.
मीन - श्रीगणेश म्हणतात की आजच्या दिवसात उत्साह आणि स्फूर्ती यांचा अभाव राहील. आईची तब्येत खराब होऊ शकते. आणखी वाचा.