Today's Horoscope - March 13, 2020 vrd | आजचे राशीभविष्य - 13 मार्च 2020

आजचे राशीभविष्य - 13 मार्च 2020

मेष -
आज सामाजिक आणि सार्वजनिक क्षेत्रांत आपण प्रशंसेस पात्र ठराल असे श्रीगणेश सांगतात. धनलाभाचे योग आहेत. आणखी वाचा

वृषभ -
दिवस खूप आनंदात जाईल असे गणेश सांगतात. मानसिक स्वास्थ्य लाभेल. आपले काम निर्धारित वेळेत नियोजनानुसार पूर्ण होईल. आणखी वाचा

मिथुन -
जीवनसाथी आणि संतती यांच्या आरोग्याविषयी विशेष लक्ष पुरविण्याची पूर्वसूचना श्रीगणेश देत आहेत. वाद-विवाद आणि बौद्धिक चर्चेपासून दूर राहा. आणखी वाचा

कर्क -
ग्लानीमुळे आज आपले मन दुःखी राहील असे श्रीगणेश सांगतात. प्रफुल्लता, स्फूर्ती आणि आनंद यांचा अभाव राहील. कुटुंबीयांशी तक्रारी वाढतील. आणखी वाचा

सिंह -
श्रीगणेशकृपेने आजचा दिवस सुखासमाधानात जाईल. भावंडाबरोबरच्या संबंधात जवळीक निर्माण होईल. त्यांचे सहकार्य पण आपणास मिळेल. आणखी वाचा

कन्या -
आज कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील असे श्रीगणेश सांगतात. गोड बोलण्याने आपण आपले निर्धारित काम पूर्ण करू शकाल. तब्बेत चांगली राहील. आणखी वाचा

तूळ -
श्रीगणेश सांगतात की आज आपण आर्थिक नियोजन व्यवस्थित कराल. सृजनशीलता वाढेल. शारीरिक आणि मानसिकदृष्टया स्वास्थ्य लाभेल. आणखी वाचा

वृश्चिक -
आपल्या स्वभावातील तामसवृत्ती आणि बोलणे यावर संयम ठेवण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. शारीरिक शैथिल्य आणि मानसिक चिंता यांमुळे मन ग्रासून जाईल. आणखी वाचा

धनु -  
आजचा दिवस आपणाला लाभदायी आहे असे श्रीगणेश सांगतात. आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील. आणखी वाचा

मकर -
कुटुंब आणि संतती यांच्याविषयी आपणाला आनंद आणि समाधान वाटेल. स्नेही व मित्रांच्या भेटीने मन प्रसन्न होईल. आणखी वाचा

कुंभ -
प्रतिस्पर्ध्यांशी वादविवाद न करण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. शारीरिक अस्वास्थ्य राहील. शैथिल्य आणि आळस राहील. आणखी वाचा

मीन -
आज अनैतिक कामात न पडण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. क्रोध आणि वाणीवर संयम ठेवा. आरोग्या विषयी दक्ष राहा. सरकार विरोधी कृत्यांपासून दूर राहा. आणखी वाचा

Web Title: Today's Horoscope - March 13, 2020 vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.