आजचे राशीभविष्य - 16 जून 2021 - मेषसाठी काळजीचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 07:28 AM2021-06-16T07:28:06+5:302021-06-16T07:28:46+5:30

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

Today's horoscope - June 16, 2021 | आजचे राशीभविष्य - 16 जून 2021 - मेषसाठी काळजीचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस

आजचे राशीभविष्य - 16 जून 2021 - मेषसाठी काळजीचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस

Next

मेष
आपल्या तापट स्वभावावर आज नियंत्रण ठेवण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. मानसिकदृष्टया थकवा जाणवेल. अधिक कष्ट करूहन त्यामानाने प्राप्ती कमी होईल. संतती विषयी काळजी राहील. आणखी वाचा

वृषभ
आज आपण कोणतेही कार्य खंबीर मनोबल आणि दृढ आत्मविश्वास यांच्या जोरावर पूर्ण कराल. पैतृक घराण्याकडून आपणाला लाभ होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात गोडी वाटेल. आणखी वाचा

मिथुन
आजचा दिवस नवीन कार्यारंभ करण्यास आपणाला अनुकूल आहे. सरकारी लाभ होतील. वरिष्ठ अधिकार्‍यांकडून तुमच्या कामाचे योग्य मूल्य मिळेल. भावंडे आणि शेजारी- पाजारी यांच्याशी झालेले गैरसमज दूर होतील. आणखी वाचा

कर्क
शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य आज मिळणार नाही. निराशा आणि असंतोषाची भावना मनात राहील. कुटुंबियांशी गैरसमज होणार नाहीत या विषयी लक्ष द्या. आणखी वाचा

सिंह
आज आपणामध्ये आत्मविश्वास परिपूर्ण असेल. कोणतेही काम करण्याचा निर्णय आपण झटकन ध्याल. वडील आणि वडीलधार्यांकडून लाभ होतील. सामाजिक मान- मरातब वाढेल. आणखी वाचा

कन्या
आज आपल्या अहंपणाचा दुसर्‍या व्यक्तीच्या अहंपणाशी संघर्ष होणार नाही याकडे लक्ष देण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. शारीरिक थकवा व मानसिक तणाव वाढेल. एखाद्या गोष्टीवरून मित्रांबरोबर गैरसमज होतील. आणखी वाचा

तूळ
आजचा आपला दिवस शुभफलदायी आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातून झालेल्या लाभातून आपल्याला समाधान मिळेल. मिळकतीत वृद्धी. मित्रांकडून फायदा होईल पण त्यांच्यासाठी खर्च ही होईल. एखाद्या पर्यटन स्थळाला भेट देण्याने तुम्ही रोमांचित बनाल. आणखी वाचा

वृश्चिक
आजचा दिवस आपणास शुभफलदायी आहे. नोकरी व्यवसायातील वातावरण अनुकूल असेल. वरिष्ठ अधिकारी आपल्यावर प्रसन्न असतील. प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल.  आणखी वाचा

धनु
आज आपली तब्येत नरमच असेल. आळस व अशक्तपणा जाणवेल. मनाला चिंता लागून राहील. व्यावसायिक दृष्टया अडथळे येतील. संकटाविषयीच्या विचारापासून दूर राहा.  आणखी वाचा

मकर
आज अचानक पैसा खर्च होण्याचे योग आहेत. हा खर्च आजारपणावर, व्यावहारिक किंवा सामाजिक कामासाठी बाहेर जावे लागल्यामुळे होऊ शकतो. खाण्यापिण्याकडे लक्ष द्या. क्रोध तसेच नकारात्मक विचारांवर संयम ठेवा. आणखी वाचा

कुंभ
प्रणयासाठी आज अनुकूल दिवस आहे. प्रत्येक काम आपण आत्मविश्वापूर्वक कराल. प्रवास, सहलींची शक्यता आहे. स्वादिष्ट भोजन व नवीन वस्त्रपरिधान करण्याचे आज योग आहेत.  आणखी वाचा

मीन
आपले मनोबल आणि आत्मविश्वास दृढ बनेल. शारीरिक स्वास्थ्य चांगले राहील. घरात सुखशांती नांदेल. स्वभावातील तापटपणामुळे संयम ठेवण्याचा प्रयत्न करा.  आणखी वाच

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Today's horoscope - June 16, 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app