Today's horoscope - January 20, 2020 | आजचे राशीभविष्य - 20 जानेवारी 2020

आजचे राशीभविष्य - 20 जानेवारी 2020

मेष - श्रीगणेश सांगतात की आज सांसारिक बाबी विसरून आध्यात्मिक गोष्टींत संपर्क साधाल. गूढ, रहस्यमय विद्या आणि गाढ चिंतनशक्ती आपला मानसिक भार हलका करील.  आणखी वाचा

वृषभ - श्रीगणेश कृपेने आपल्या जीवनसाथीच्या जवळीकीचे सुख प्राप्त होईल. कुटुंबीयांसमवेत सामाजिक समारंभासाठी बाहेर फिरणे किंवा सहलीला जाणे घडेल. त्यामुळे वेळ आनंदात जाईल. आणखी वाचा

मिथुन - अपूर्ण कामे पूर्णत्वास जाण्याच्या दृष्टीने आजचा दिवस शुभ आहे, असे श्रीगणेश सांगतात. कुटुंबात हर्षोल्हासाचे वातावरण राहील. स्वास्थ्य राहील. आणखी वाचा

कर्क -  शांतपणाने दिवस घालवा असे श्रीगणेश सांगतात. कारण शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या उद्विग्नता राहील. पोटदुखीचे विकार बळावतील. अचानक पैसा खर्च होईल. आणखी वाचा

सिंह - श्रीगणेश सांगतात की मानसिक अस्वस्थता राहील. कुटुंबीयांशी मतभेद होतील. जमीन, घर अथवा वाहनाची खरेदी किंवा खरेदीपत्र करायला दिवस योग्य नाही. आणखी वाचा

कन्या - विचार न करता साहस करण्यापासून सावधानतेचा इशारा श्रीगणेश देतात. भावनात्मक संबंध प्रस्थापित होतील. भाऊ- बहिणींशी ताळमेळ जुळेल. मित्र आणि स्नेह्यांशी संवाद घडतील. आणखी वाचा

तूळ - आज मानसिकता नकारात्मक राहील. रागाच्या भरात वाणीवर संयम राहणार नाही. त्यामुळे कुटुंबीयांशी मतभेद होतील. नाहक खर्च होईल. तब्बेत बिघडेल. आणखी वाचा

वृश्चिक - श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस शुभ आहे. शारीरिक आणि मानसिक प्रसन्नता वाटेल. कुटुंबातील व्यक्तींशी वागण्यात दिवस आनंदात जाईल. आणखी वाचा 

धनु - आज रागामुळे कुटुंबातील व्यक्ती आणि इतर लोकांशी संबंध दुरावतील. आपले बोलणे व वागणे भांडणाचे कारण ठरेल. दुर्घटनेपासून जपा. आजारावर खर्च होईल. आणखी वाचा

मकर - श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस प्रत्येक गोष्टीत लाभदायक आहे. मित्रांची भेट होईल. प्रिय व्यक्तींशी मुलाखत रोमांचक बनेल. विवाहोत्सुक व्यक्तींच्या समस्या किरकोळ प्रयत्नांनी सुटतील आणखी वाचा 

कुंभ - प्रत्येक काम सरळपणे होईल आणि त्यात यश मिळेल. नोकरी- व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. सरकारी कामे निर्विघ्नपणे पूर्ण होतील. वरिष्ठ अधिकारी सहकार्य करतील. आणखी वाचा

मीन - भीती आणि उद्विग्नता यातून दिवसाची सुरुवात होईल. शरीरात आळस आणि थकवा जाणवेल. कोणतेच काम पूर्ण न झाल्याने निराशा पैदा होईल. नशिबाची साथ नाही असे वाटेल. आणखी वाचा

Web Title: Today's horoscope - January 20, 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.