शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य, ११ फेब्रुवारी २०२२, नोकरीत अनुकूल परिस्थिती, कामानिमित्त प्रवास घडेल, अनेकांचे सहकार्य मिळेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 07:51 IST

Today's Horoscope : कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची रास

मेष - काहींचे प्रवासाचे बेत ठरतील. भावंडांच्या भेटीगाठी होतील. व्यवसायात तेजी राहील. गुंतवणूक करताना जाणकारांचा सल्ला घ्या. तब्येतीत सुधारणा होईल. कामात उत्साह राहील. विविध कामे मार्गी लागतील. त्यामुळे आनंद होईल.  

वृषभ - ताण-तणाव हळुहळू कमी होऊ लागतील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. आर्थिक आवक चांगली राहील. मनासारखे भोजन मिळेल. जमिनीचे व्यवहार आटोक्यात येतील. प्रवासात काळजी घेणे योग्य ठरेल. आवडत्या विषयावरील पुस्तक वाचून काढा.

मिथुन - खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. महत्त्वाचे काम पुढे ढकलणे योग्य राहील. काहींना प्रवास करावा लागेल. जीवनसाथी तुमच्या मर्जीनुसार वागेल. प्रेमात यश मिळेल. एखाद्या घटनेमुळे मनावर थोडा ताण येईल. मात्र सकारात्मक दृष्टीकोन ठेवून कामे करा.  

कर्क - महत्त्वाचे काम सूर्यास्ताच्या आत पूर्ण करा. आर्थिक आवक चांगली राहील. मात्र अनावश्यक खर्चाला आवर घातला पाहिजे. नातेवाईक स्नेहीजन यांची मोलाची मदत आणि सल्ला मिळेल.प्रवासात दगदग होईल. एखाद्या व्यक्तीच्या प्रभावाखाली याल. 

सिंह - नोकरीमध्ये संयमाने वागणे आवश्यक आहे. आर्थिक आवक चांगली राहील. भेटवस्तू मिळतील. योग्य सल्ला मिळेल. महिलांना खरेदीची संधी मिळेल. उंची वस्रे,दागिने, सौंदर्य प्रसाधने खरेदी कराल. महत्त्वाच्या कामात यश मिळेल.

कन्या - भाग्याचे पाठबळ मिळेल. प्रवासात दगदग होईल. प्रवासाचे बेत थोडे पुढे ढकलले तर ठीक राहील. नोकरीमध्ये अनुकूल परिस्थिती राहील. नवीन जबाबदारीबाबत विचारणा होईल. सुखसोई मिळतील. घरी पाहुणे येतील. महत्त्वाचे निरोप येतील. 

तूळ - महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. मात्र थोडा संयम ठेवा. संध्याकाळनंतर अनुकूल परिस्थिती राहील.कामे मार्गी लागतील. भाग्याची साथ मिळेल. प्रवास कार्यसाधक ठरतील. प्रसिद्धी मिळेल. मानसन्मान मिळेल. मित्रांच्या संगतीत अनावश्यक खर्च करू नका. 

वृश्चिक - महत्त्वाचे काम संध्याकाळच्या आत उरकून घ्या. प्रवास शक्यतो टाळा. प्रवासात दगदग होईल. वाहने जपून चालवा. आरोग्याची काळजी घ्या.जीवनसाथी तुमची काळजी घेईल. जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल. एखादी व्यक्ती अपेक्षाभंग करेल.  

धनू - जीवनसाथी तुमच्या मर्जीनुसार वागेल. प्रेमात यश मिळेल. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. मात्र सूर्यास्तानंतर महत्त्वाचे काम मार्गी लागेल. पूजापाठ करण्यासाठी वेळ द्याल. आरोग्याची काळजी घ्या. मनासारखे भोजन मिळेल.

मकर - खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक, चैनीच्या वस्तू खरेदी कराल. त्यामुळे बजेट कोलमडेल. मुलांच्या अडचणी समजून घ्या. त्यांना योग्य मार्गदर्शन करा. महत्त्वाचे काम पुढे ढकलणे योग्य राहील. नोकरीत दगदगीची कामे टाळा.  

कुंभ - ग्रहमानाची अनुकूलता आपल्या बाजूने राहील. आर्थिक आवक उत्तम राहील. नोकरीत थोडा तणाव राहील. कामात बदल होतील. मात्र संयम सोडू नका. मुलांना यश मिळेल. अनेकांचे सहकार्य मिळेल.  

मीन - व्यवसायात धाडसी निर्णय घेऊ नका. मोठी गुंतवणूक करताना जाणकारांचा सल्ला घ्या. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. काहींना कामानिमित्त प्रवास घडून येतील. घरी पाहुणे येतील. सरकारी कामे पूर्ण होतील. अनेकांचे सहकार्य मिळेल. 

टॅग्स :Zodiac Signराशी भविष्यAstrologyफलज्योतिष