शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
3
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
4
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
5
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
6
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
7
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
8
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
9
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
10
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
11
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
12
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
13
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
14
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
15
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
16
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
17
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
18
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
19
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
20
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर

Horoscope: आजचे राशीभविष्य, १० फेब्रुवारी २०२२, वाहन जपून चालवा, कागदपत्रे, मूल्यवान वस्तू जपून ठेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 07:50 IST

Today's Horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची रास, जाणून घ्या

मेष - भावंडांशी गैरसमज होतील. थोडे वाद होण्याची शक्यता आहे. वाहन जपून चालवा. कागदपत्रे आणि मूल्यवान वस्तू जपून ठेवा. आर्थिक आवक चांगली राहील. आरोग्याची काळजी घ्या. नोकरीत सहकाऱ्यांना सांभाळून घ्या. विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळेल. 

वृषभ - अडून राहिलेली कामे जोर धरतील. मनात आनंदी विचार राहतील. विरोधकांच्या कारवाया चालू राहतील. मात्र त्यांच्याशी वाद वाढवणे योग्य ठरणार नाही. व्यवसायात भरभराट होईल. महत्त्वाचे निर्णय घेताना जाणकारांचा सल्ला घ्या.  

मिथुन - नवीन नोकरीच्या शोधात असाल तर संधी मिळेल. विरोधकांच्या कारवाया सुरू राहतील. त्यांच्याकडे फार लक्ष देऊ नका. व्यवसायात विक्री चांगली राहील. फायदे होतील. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. वाहन जपून चालवा. धार्मिक कार्यात भाग घ्याल.  कर्क - हातून चांगली कामे होतील. तुमच्या कार्यपद्धतीची प्रशंसा होईल. व्यवसायात लाभ होईल. चोरी, नुकसान होणार नाही, याची काळजी घ्या. कुणाचे मन दुखावू नका. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. मित्र, जवळचे लोक भेटतील. घरी पाहुणे येतील. मुलांची प्रगती होईल.  

सिंह - व्यवसायात सामान्य स्थिती राहील. एखाद्या कामात अडथळा येऊ शकतो. जीवनसाथीशी मतभेद होऊ शकतात. आर्थिक आवक चांगली राहील. विरोधकांच्या कारवाया सुरू राहतील. गुंतवणूक करताना काळजी घ्या.

कन्या -   भाग्याची चांगली साथ राहील. मनात आनंदी विचार राहतील. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. आवडत्या छंदासाठी वेळ देता येईल. सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. नावलौकिक वाढवणाऱ्या घटना घडतील. 

 तूळ - हातून चांगली कामे घडतील. चैनीवर खर्च करण्याकडे कल राहील. नातेवाईकांच्या भेटी होतील. त्यांच्याशी चांगला संवाद राहील. विरोधकांचा आपोआप बंदोबस्त होईल. महत्त्वाच्या बातम्या कानावर पडतील. घऱात मंगलकार्य ठरण्याची शक्यता आहे.

वृश्चिक - नवीन नोकरी मिळेल. चांगल्या बातम्या कळतील. जोडीदार चांगली साथ देईल. प्रवासकार्य साधक ठरेल. मनात आनंदी विचार राहतील. ग्रहमान अनुकूल असल्याने त्याचा फायदा घ्या. थोरामोठ्यांचे सहकार्य मिळेल. काही अनपेक्षित लाभ होतील.

धनू - महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. आवक सामान्य राहील. नोकरीत कामाचा ताण राहील. सहकाऱ्यांशी जुळवून घेतलेले बरे राहील. प्रवासात सतर्क राहा. आरोग्याची काळजी घ्या. खर्चावर नियंत्रण ठेवा. दगदग होईल, अशी कामे करू नका.

मकर - व्यवसायात आवक चांगली राहील. कायद्याचे पालन करा. एखादी अडचण येईल. संयम सोडू नका. त्यातून मार्ग नक्की निघेल. जुनी येणी वसूल होतील. प्रवासकार्य साधक ठरेल. नोकरीत कामाचा ताण कमी राहील. अधिकारात वाढ होईल. चांगल्या बातम्या कळतील.  

कुंभ -   नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. तुमचे वर्चस्व राहील. आर्थिक आवक चांगली राहील. आरोग्याची काळजी घ्या. पथ्यपाण्याची काळजी घ्या. मनात सकारात्मक विचार राहतील. तुमचे महत्त्व वाढेल. चैनीवर खर्च कराल.  

मीन -  अचानक धनलाभ होऊ शकतो. एखादे लॉटरीचे तिकीट घेऊन पाहण्यास हरकत नाही. व्यवसायात भरभराट होईल, नवीन संधी मिळेल. अधिकारी वर्गाचे सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यासाठी वेळ द्याल.  

टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य