शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

आजचे राशीभविष्य - 1 डिसेंबर 2021; धनाबरोबरच मान-सन्मान वाढीस लागेल, पित्याकडून लाभ होतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 07:36 IST

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

मेष -  व्यावसायिकांसाठी आजचा दिवस लाभदायक असल्याचे श्रीगणेश सांगतात. कुटुंबातील आनंददायी वातावरण पण आपल्या मनाला प्रफुल्लित ठेवण्यात मदत करेल. घरात सुखदायक प्रसंग घडतील. शारीरिक स्वास्थ्य वाढेल. सहकार्‍यांचे चांगले सहकार्य मिळेल. जीवनसाथीदाराबरोबरच्या संबंधात जवळीक वाढेल.आणखी वाचा

वृषभ - आज बौद्धिक चर्चेपासून दूर राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. विद्यार्थ्यांसाठी खडतर काळ आहे. मनाला काळजी लागून राहील. पोटाच्या तक्रारीमुळे मन अस्वस्थ राहील. दुपारनंतर या तक्रारीपासून मुक्तता मिळेल. मानसिक दृष्ट्या पण तणाव दूर झाल्याचा अनुभव येईल. आणखी वाचा

मिथुन -  आज उत्साहाचा अभाव राहील. कुटुंबातील व्यक्तींशी वादावादी होण्याची शक्यता. स्थावर संपत्ती, संबंधित व्यक्तींपासून सावध राहा. अचानक धन खर्च करावे लागेल. आणखी वाचा

कर्क - अविचाराने कोणतेही कार्य न करण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. आप्तस्वकीयांच्या भेटीने आनंद वाटेल. त्यांच्याशी प्रेमपूर्ण संबंधामुळे आपला आनंद वृद्धिंगत होईल. मनोबल चांगले असल्याने प्रतिस्पर्ध्यासमोर टिकून राहाल. दुपारनंतर थोडी प्रतिकूलता जाणवेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष द्यावे. आणखी वाचा 

सिंह - आज बौद्धिक क्षमतेत वाढ झाल्याने चर्चेत सहभागी होऊ शकता पण वादविवाद टाळा असे श्रीगणेश सुचवितात. घरातील सदस्यांबरोबर वेळ चांगला जाईल. आर्थिक लाभाची शक्यता. दुपारनंतर मात्र सांभाळून राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. आणखी वाचा

कन्या - आपल्या वाणीच्या प्रभावाने आज आपणाला लाभ होईल, असे श्रीगणेश सांगतात. इतर लोकांशी असणार्‍या संबंधात प्रेमवृद्धी होईल. प्रवास आनंददायी होईल. व्यावसायिक क्षेत्रातही लाभ होईल. घरगुती वातावरण आनंदी राहील. आर्थिक लाभ होईल. विदेशातील व्यापारात यश मिळेल आणि लाभ होईल. आणखी वाचा

तूळ - संतापाला आवर घालून स्वभाव मृदू व कोमल ठेवण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. बोलण्यावर संयम ठेवल्यामुळे वातावरण शांत करण्यात सफल व्हाल. कायद्याशी संबंधित बाबी आणि निर्णय विचारपूर्वक ठरवा. गैरसमज दूर करा. खर्चाचे प्रमाण वाढेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडू शकते. आणखी वाचा

वृश्चिक - जीवनसाथी गवसण्याच्या दृष्टीने आजचा दिवस शुभ असल्याचे श्रीगणेश सांगतात. उत्पन्न आणि व्यापारात वाढ होण्याचे योग आहेत. मित्रांसमवेत प्रवासाला, फिरायला जाल. तेथे आपला वेळ आनंदात जाईल. दुपारनंतर मात्र स्वभावात संताप आणि उग्रपणा वाढेल असे श्रीगणेश सांगतात. सबब कोणाशीही उग्रतापूर्ण व्यवहार करू नका. आणखी वाचा

धनु - श्रीगणेश कृपेने आज आपली कामाची योजना व्यवस्थित पूर्ण होईल. व्यवसायिक यश प्राप्ती होईल. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील. श्रमाच्या अपेक्षानुरूप वरचे पद मिळेल. कुटुंबात आनंद उल्हासाचे वातावरण असेल. मित्रांच्या भेटीने मन प्रफुल्लित राहील. प्रवास, पर्यटनाचा योग आहे. आणखी वाचा

मकर - परदेशगमनाची अपेक्षा करणार्‍यांना यशाची शक्यता आहे, असे श्रीगणेश सांगतात. धार्मिक यात्रेमुळे आज धर्मप्रवणतेचा अनुभव येईल. कुटुंबीयांमध्ये आनंद उत्हासाचे वातावरण राहील. व्यावसायिक क्षेत्रात पदोन्नती मिळेल. वरिष्ठ अधिकार्‍यांना पण आपल्या कामामुळे आनंद वाटेल. धना बरोबरच मान- सन्मान वाढीस लागेल. पित्याकडून लाभ होतील. आणखी वाचा

कुंभ - नव्या कामाची सुरुवात आज करू नका असे श्रीगणेश सांगतात. आरोग्य संवर्धनाच्या हेतूने खाण्यापिण्याकडे लक्ष द्या. वाणीवर संयम ठेवलात तरच कोणाशी उग्र चर्चा अथवा मतभेद टाळू शकाल. दुपारनंतर प्रसन्नता वाढेल तब्बेतीतही सुधारणा जाणवेल. धार्मिक कार्य किंवा धार्मिक प्रवासाचे नियोजन कराल. आणखी वाचा

मीन - व्यापारात भागीदारीमध्ये आपणाला लाभ होईल. असे श्रीगणेश सांगतात. एखादया मनोरंजक स्थळी स्नेह्यांसोबत आनंदात वेळ घालवल्याने मन प्रफुल्लित होईल. दुपारनंतर मात्र परिस्थितीत बदल झाल्याचा अनुभव येईल. दुपारनंतर नवीन कार्याचा आरंभ करू नका. कुटुंबातील व्यक्तींशी भांडण होऊ शकते. आणखी वाचा

टॅग्स :Zodiac Signराशी भविष्यhoroscope 2021राशिभविष्य २०२१Astrologyफलज्योतिष