आजचे राशीभविष्य - 18 मे 2021; 'या' राशीच्या व्यक्तींना स्त्री वर्गाकडून विशेष लाभ, धनप्राप्तीसाठी शुभ काळ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 07:58 AM2021-05-18T07:58:21+5:302021-05-18T08:03:50+5:30

जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Tuesday 18 May 2021 | आजचे राशीभविष्य - 18 मे 2021; 'या' राशीच्या व्यक्तींना स्त्री वर्गाकडून विशेष लाभ, धनप्राप्तीसाठी शुभ काळ

आजचे राशीभविष्य - 18 मे 2021; 'या' राशीच्या व्यक्तींना स्त्री वर्गाकडून विशेष लाभ, धनप्राप्तीसाठी शुभ काळ

Next

मेष - आज आपणाला अतिशय संवेदनशीलता जाणवेल असे श्रीगणेश सांगतात. त्यामुळे कोणाकडून आपल्या भावना दुखावल्या जाण्याचे प्रसंग येतील. आज आईच्या तब्बेतीची काळजी लागेल. स्त्री आणि वाणी यांपासून जपा असे श्रीगणेश सांगतात. अभ्यासाच्या दृष्टीने मध्यम दिवस. आणखी वाचा

वृषभ -  श्रीगणेश सांगतात की आज आपण जास्त संवेदनशील आणि भावूक विचार मनात आणाल आणि त्यामुळे मन द्रवेल. आपली आणि इतरांविषयीची काळजी दूर होईल. त्यामुळे मनाला दिलासा मिळेल. अकस्मित कारणाने प्रवास करावा लागेल. पैशाविषयी दक्ष राहाल. त्यामुळे आर्थिक नियोजन करू शकाल. आणखी वाचा

मिथुन - नातलग आणि मित्रांसोबत संवाद साधल्याने आज आनंदी राहाल. असे श्रीगणेश सांगतात. आर्थिक नियोजनात काही अडचणी येतील. पण नंतर सहजपणे ते काम पार पाडाल. त्यामुळे मनःशांती अनुभवाल. नोकरी- धंदा यात वातावरण मनासारखे राहील. साथीदार सहकार्य करतील. आणखी वाचा

कर्क - श्रीगणेश सांगतात की आज आपल्या मनात प्रेम भावनेचे तरंग उमटतील. त्याच मूड मध्ये राहाल. मित्र, स्वकीय आणि संबंधितांकडून भेट वस्तू मिळतील.  प्रवास, मनपसंत भोजन आणि प्रिय व्यक्तींचा सहवास यामुळे उल्हासीत राहाल. पत्नीच्या सहवासात मन प्रसन्न राहील. आणखी वाचा 

सिंह - कोर्ट कचेरीच्या प्रश्नात सावध राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. आज मनात भावनांचा कल्लोळ उठेल. त्यामुळे हातून काही अनैतिक कृत्य घडणार नाही याची दक्षता घ्या. स्त्रियांच्या बाबतीत विशेष दक्ष राहा. कायदेशीर गोष्टींचा निर्णय विचारपूर्वक घ्या. आणखी वाचा

कन्या - श्रीगणेश सांगतात की आपणांसाठी घर, कुटुंबीय, व्यापार अशी सर्व क्षेत्रे लाभ देण्यासाठी तयार आहेत. मित्रांसोबत आनंददायी प्रवास घडेल. दांपत्यजीवनात जादा जवळीक निर्माण होईल. स्त्री वर्गाकडून विशेष लाभ होईल. धनप्राप्ती साठी शुभ काळ आहे. अविवाहितांना जीवनसाथी शोध मोहीमेत यश मिळेल. आणखी वाचा

तूळ - श्रीगणेशांना आज आपणाला नोकरीत बढतीचे योग दिसतात. वरिष्ठांची आपणावर कृपादृष्टी राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण पसरेल. मनात भावनात्मकता वाढेल. मातुल घराण्याकडून फायदा होईल. उत्तम विवाहसुख मिळेल. व्यवसायात साफल्यपूर्ण दिवस राहील. आणखी वाचा

वृश्चिक - आजचा दिवस अनुकूलता आणि प्रतिकूलतेचा संमिश्र राहील असे श्रीगणेश सांगतात. लेखन- साहित्य संबंधित काम कराल. व्यवसायात प्रतिकूल वातावरण. वरिष्ठ अधिकार्‍यांचा कल नकारात्मक राहील. पैसा खर्च होईल. आणखी वाचा

धनु - खाण्या पिण्याकडे विशेष लक्ष देण्याची सूचना श्रीगणेश देतात. कामात यश मिळायला विलंब झाल्याने निराशा वाटेल. काम वेळेवर पूर्ण होणार नाही. कामाचा व्याप वाढेल. बोलण्यावर संयम ठेवा. खर्च वाढेल. आणखी वाचा

मकर - पैशाच्या दृष्टीने आजचा दिवस फारच चांगला जाईल असे श्रीगणेश सांगतात. व्यापार वाढीचे योग आहेत. त्याखेरीज दलाली, व्याज, कमिशन अशा विविध मार्गांनी पैसा मिळून धनभांडारात वाढ होईल. सुंदर भोजन, नवी वस्त्रे आणि वाहनसुख मिळेल. आणखी वाचा

कुंभ - सांप्रत काली आपणास कार्यात यश मिळेल व प्रसिद्धी पण मिळेल. स्वभावात जास्त हळुवारपणा राहील. माहेरहून अनेक शुभवार्ता येतील. घरात उत्साहाचे वातावरण राहील. कुटुंबात सुख शांतीचे वातावरण राहील. आणखी वाचा

मीन - आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी चांगला आहे असे श्रीगणेश सांगतात. अभ्यासात यश आणि प्रगतीच्या नवीन संधी उपलब्ध होतील. कल्पनाशक्तीच्या जोरावर साहित्यक्षेत्रात लेखनाचे नवे काम कराल. आपल्या स्वभावात जास्त हळवेपणा राहील. स्त्री स्नेह्यांसाठी खर्च होईल. आणखी वाचा
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Tuesday 18 May 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app