शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
4
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
5
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
6
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
7
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
8
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
9
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
10
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
11
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
12
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
13
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
14
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
15
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
16
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
17
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
18
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
19
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
20
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई

आजचे राशीभविष्य - 28 एप्रिल 2022; महत्त्वाच्या कामात अडथळे येतील, गुप्त शत्रूंपासून सावध राहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2022 07:43 IST

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

मेष - देवदर्शनाच्या निमित्ताने प्रवास होतील, हातून दानधर्म , समाजोपयोगी कामे होतील. मौजमजेसाठी खर्च होईल. आर्थिक आवक चांगली राहील. मनात उत्साहवर्धक विचार राहतील. जीवनसाथीचे हट्ट पुरवावे लागतील. मनात सकारात्मक विचार राहतील. 

वृषभ - धनलक्ष्मीची कृपा आपल्यावर राहील प्रभावशाली लोकांच्या सहवासात याल. त्यातून तुमचा फायदा होईल प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. भेटवस्तू मिळतील. सुखसोयी वाढवून मिळतील. उत्तम प्रवास होतील. काहींना अचानक मोठे लाभ होतील.

मिथुन - उत्साहवर्धक वातावरण राहील. नोकरीत अनुकूल घटना घडतील. प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरु राहील. चांगल्या संधी मिळतील. घरी पाहुणे येतील समारंभाचे आयोजन केले जाईल, वाहन सुख मिळेल. अनेकांचे सहकार्य मिळेल धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ.

कर्क - अतिशय, अनुकूल ग्रहमान राहील पर्यटनाच्या निमित्ताने प्रवास होतील. महत्त्वाच्या कामात सफलता मिळेल. सगळ्या अडचणी दूर होतील . तुमच्या कामाची प्रशंसा होईल. नावलौकिक वाढवणाऱ्या घटना घडतील, तुमचे बोलणे, सल्ला लोकांना आवडेल. सिंह - अचानक धनलाभ होऊ शकतो. वाहन जपून चालवा. बोलण्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. कुणालाही सल्ला देताना तटस्थ भूमिका घेतली पाहिजे, फार गुंतू नका. दगदग होईल अशी कामे करू नका. मुलांशी संवाद साधा. 

कन्या - ग्रहमानाची साथ तुम्हाला मिळेल. दगदग कमी होईल . अडचणी दूर होतील. महत्त्वाच्या कामात सफलता मिळेल भागीदारी व्यवसायात यश मिळेल. जीवनसाथीशी नात्यात गोडवा राहील. तरुण वर्गाला प्रेमात प्रतिसाद मिळेल. आर्थिक आवक चांगली राहील .

तूळ - महत्त्वाच्या कामात अडथळे येतील. कागदोपत्री पूर्तता करण्यासाठी धावपळ करावी लागेल. गुप्त शत्रूंपासून सावध राहा, आपल्या योजनांचा गवगवा करू नका. आरोग्याची काळजी घ्या. पोटाची काळजी घ्या, पचेल तेवढेच खा. मसालेदार पदार्थ खाणे टाळा. 

वृश्चिक - नोकरीत तुमचे वर्चस्व राहील. जीवनसाथी आपल्याला चांगली साथ देईल. काहींना प्रवास करावा लागेल. प्रवास सुखकर होतील मुलांच्या यशामुळे आनंद वाटेल. प्रसिद्धी, मानसन्मान मिळेल, लोकांच्या प्रशंसेस पात्र ठराल, चांगल्या बातम्या कानावर पडतील. 

धनू - ग्रहांचे भ्रमण तुम्हाला फायदेशीर ठरेल. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. बढती, बदलीचे योग आहेत. सुखसोयी वाढवून मिळतील. महत्त्वाच्या कामात यश मिळेल, घरी पाहुणे येतील. खेळीमेळीचे वातावरण राहील. आर्थिक उलाढाली होतील.

मकर - अचानक प्रवास करावा लागेल. प्रवास कार्य साधक ठरतील, भावंडांच्या भेटीगाठी होतील, भेटवस्तूंची देवाण - घेवाण होईल विविध प्रकारचे लाभ होतील. धनलक्ष्मीची कृपा आपल्यावर राहील. चांगल्या घटना घडतील. मुलांची प्रगती होईल. त्यांच्याशी वाद टाळा. 

कुंभ - धनलाभाच्या दृष्टीने अनुकूल परिस्थिती राहील. मालमत्तेची कामे मार्गी लागतील. विविध प्रकारचे लाभ होतील मनासारखे भोजन मिळेल . मित्रांच्या भेटीगाठी होतील जीवनसाथीशी वाद होणार नाही याची काळजी घ्या.

मीन - मन प्रसन्न राहील महत्त्वाच्या कामात सफलता मिळेल अनेकांचे सहकार्य मिळेल. जोडीदार तुमच्या मर्जीनुसार वागेल भेटवस्तू मिळतील. खर्चावर नियंत्रण ठेवा. एखादी चिंता सतावेल; पण जास्त विचार करू नका. - विजय देशपांडे (ज्योतिषविशारद)

टॅग्स :Zodiac Signराशी भविष्यAstrologyफलज्योतिष