शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य - 28 नोव्हेंबर 2021; मित्रांकडून लाभ होईल, विवाहोत्सुकांना जीवनसाथी मिळण्याचे योग

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2021 07:33 IST

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

मेष - आपल्या उग्र स्वभावावर संयम ठेवण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. शारीरिक आणि मानसिक शैथिल्य जाणवेल. अधिक कष्ट करूनही अल्प यश मिळेल. संततीची काळजी सतावेल. कामाच्या धावपळीमुळे घरातील व्यक्तींकडे कमी लक्ष द्याल. घातक विचार, कृती आणि नियोजना पासून दूर राहा. आणखी वाचा

वृषभ - श्रीगणेशांच्या आशीर्वादाने आज कामासाठी खंबीर मनोबल आणि दृढ आत्मविश्वास लाभेल. अपेक्षेप्रमाणे कामात यश मिळेल. माहेरहून लाभदायक वार्ता येतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात गोडी वाटेल. सरकारी कामात यश मिळेल. आणखी वाचा

मिथुन - नव्या संकल्पना राबविण्याच्या दृष्टीने आज शुभ दिवस आहे असे श्रीगणेश सांगतात. सरकार कडून लाभ होण्याची शक्यता. व्यवसाय धंद्यात वरिष्ठ अधिकार्‍यांचा चांगला प्रतिसाद मिळेल. छोट्या प्रवासाचा बेत आखाल. स्नेही वा शेजार्‍यांशी न जुळणार्‍या घटना घडल्या असतील त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागतील. अचानकच वैचारिक बदल होतील. प्रतिस्पर्ध्यांवर विजय प्राप्त कराल. आणखी वाचा

कर्क - आज नकारात्मक दृष्टिकोनातून व्यवहार करू नका असे श्रीगणेश सांगतात. शारीरिक आणि मानसिक अस्वास्थ्य राहील. मनात दुःख व असंतोष राहील. डोळ्यांचा त्रास जाणवेल. अभ्यासात गोडी वाटली तरी विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळणार नाही. अनैतिक बाबींपासून दूर राहा. धन जास्त प्रमाणात खर्च होईल. आणखी वाचा 

सिंह - श्रीगणेश सांगतात की आज आपणात आत्मविश्वासाचे प्रमाण जास्त असेल. कोणतेही काम करण्या विषयी त्वरित निर्णय घ्याल. वडील आणि वडील धार्‍यांकडून लाभ होईल. समाजात मान- प्रतिष्ठा वाढेल. रागाचे प्रमाण वाढेल. तब्बेत सांभाळा. आणखी वाचा

कन्या - आपल्या अहंपणाला झटका लागणार नाही अथवा कोणाशी भांडणतंटा होणार नाही याकडे लक्ष देण्याची सूचना श्रीगणेश देतात. शारीरिक थकवा आणि मानसिक चिंता राहील. मित्र आणि स्वकीयांशी वैचारिक पातळीवर मतभेद होतील. स्वभावात उग्रपणा आणि संतापाचे प्रमाण वाढेल. धार्मिक कार्यावर खर्च होईल. आणखी वाचा

तूळ - आज आपणासाठी शुभ फलदायी दिवस राहील असे श्रीगणेश सांगतात. विविध क्षेत्रांतून लाभ मिळतील आणि आपली प्रसन्नता वाढेल. उत्पन्न वाढेल. मित्रांसाठी खर्च करावा लागेल आणि त्यांच्याकडून लाभ ही होईल. प्रवास अथवा सहलीच्या ठिकाणी जाण्यासाठी दिवस रोमहर्षक ठरेल. आणखी वाचा

वृश्चिक - आजचा दिवस शुभ फलदायी जाण्याचे संकेत श्रीगणेश देतात. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील. वरिष्ठ अधिकारी खुश राहतील. सहजगत्या कामे पूर्ण होतील. मानमरातब वाढेल. नोकरीत बढती मिळेल. संततीच्या प्रगतीमुळे संतुष्ट राहाल. आणखी वाचा

धनु - आज तब्बेत यथा तथा राहील. शारीरिक दृष्ट्या आळस आणि अशक्तपणा जाणवेल. मानसिक चिंता आणि व्याकुळता राहील. व्यवसायात विघ्ने निर्माण होतील. हानिकारक विचार दूर सारा. कोणत्याही कार्याचे नियोजन जपून करा. वरिष्ठ अधिकार्‍यांशी संघर्षाचे प्रसंग येतील. आणखी वाचा

मकर - अचानक धनखर्चाचे योग आहेत. त्यामुळे व्यावहारिक तथा सामाजिक कार्यासाठी बाहेर पडावे लागेल. क्रोधापासून सांभाळा. सकारात्मक विचारांनी नकारात्मकता दूर करा. व्यवसायात अनुकूलता जाणवेल. भागीदारांशी मतभेद होणार नाहीत. याची काळजी घ्या. आणखी वाचा

कुंभ - आज खंबीर मन आणि दृढ आत्मविश्वासाने प्रत्येक काम कराल. प्रवास- सहलीची शक्यता. स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद आणि नवी वस्त्र परिधान करण्याचे प्रसंग येतील. आणखी वाचा

मीन - श्रीगणेश आज आपणाला शुभफलदायी दिवस सांगतात. मनोबल आणि आत्मविश्वास चांगला राहील. शारीरिक स्वास्थ्य जाणवेल. घरातील वातावरण आनंदी राहील. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. स्वभावातून अतिउत्साह आणि उग्रता काढून टाका. वाचेवर नियंत्रण ठेवा. आणखी वाचा

टॅग्स :Zodiac Signराशी भविष्यhoroscope 2021राशिभविष्य २०२१Astrologyफलज्योतिष