शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य - २६ फेब्रुवारी २०२२; नोकरीत प्रगती होईल, नवीन जबाबदारी अंगावर पडेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2022 07:21 IST

Rashi Bhavishya, Today's Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी...

मेष – भाग्याची अनुकूलता तुमच्या बाजूने राहील. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. पर्यटनाच्या निमित्तानं प्रवास होईल. कामाचा ताण कमी होईल. नावलौकिक वाढेल. तुमच्या कार्यपद्धतीची प्रशंसा होईल. आर्थिक आवक चांगली राहील. भविष्याच्या योजना आखाल

वृषभ – अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. प्रवास शक्यतो टाळा. प्रवासात सावधानता बाळगा. कुणी तुम्हाला मोहाच्या जाळ्यात अडकवणार नाही. याची दक्षता घ्या. कामात अडचणी येतील. संयमाने वागणे आवश्यक आहे. नोकरीत प्रगती होईल.

मिथुन – आरोग्यात सुधारणा होईल. मनात उत्साह राहील. मनासारखी घटना घडेल. जीवनसाथीशी सूर जुळेल. तरुण वर्गाला प्रेमात योग्य प्रतिसाद मिळेल. भाग्याची चांगली साथ राहील. एखादा अकल्पित लाभ होईल. अडचणींचे आपोआप निराकारण होईल.

कर्क – मनाविरुद्ध घटना घडेल. त्यामुळे थोडी चिडचिड होईल. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. कुठल्याही परिस्थितीत मनाचा तोल ढालू देऊ नका. महत्त्वाचे काम पुढे ढकलणे ठीक राहील. नोकरीत चांगली स्थिती राहील. ईश्वरी उपासनेमुळे मन:शांती मिळेल.

सिंह – मुलांच्या प्रगतीच्या दृष्टीने चांगला काळ आहे. त्यांचे कौतुक होईल. फायदा होईल. नवीन संधी मिळेल. नोकरीत एक पाऊल पुढे पडेल. नावलौकिकात भर पडणाऱ्या घटना घडतील. जवळपासचा प्रवास होईल. प्रवासकार्य साधक ठरेल.

कन्या – नोकरीत प्रगती होईल. नवीन जबाबदारी अंगावर पडेल. त्यात आपल्याला फायदा होईल. बदलीला सामोरं जावं लागेल. घरात उत्साही वातावरण राहील. लोकांची ये-जा सुरू राहील. मनासारखे भोजन मिळेल. भावंडांच्या भेटीगाठी होतील. नवीन ओळखी होतील.

तूळ – आर्थिक आवक चांगली राहील. विविध प्रकारचा लाभ होईल. नातेवाईकांच्या भेटीगाठी होईल. जवळचा प्रवास होईल. व्यवसायात भरभराट होईल. मालमत्तेच्या कामात फायदा होईल. नोकरीत अनुकूल घटना घडेल. जीवनसाथी चांगली साथ देईल.

वृश्चिक – ग्रहमानाची अनुकूलता राहील. अचानक फायदा होईल. एखादे लॉटरीचे तिकीट घेऊन पाहण्यास हरकत नाही. मालमत्तेच्या कामांना गती मिळेल. नोकरीत तुमचे वर्चस्व राहील. काहींना पदोन्नती मिळू शकते. विविध प्रकारचा लाभ होईल.

धनू – मनात आनंदी विचार राहतील. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. आर्थिक आवक मनासारखी राहील. भेटवस्तूंची देवाण-घेवाण होईल. प्रेमात अनुकूल प्रतिसाद मिळेल. घरात एखाद्या सदस्याशी काही कारणाने थोडा वाद होण्याची शक्यता आहे.

मकर – मनावरील ताण हळूहळू कमी होईल. उत्पन्नाच्या तुलनेत खर्च जास्त कराल. मनावर थोडा संयम ठेवून खर्चाचे नियोजन करा. दूरच्या प्रवासाचा योग येईल. मुलांशी संवाद साधा. खाण्या-पिण्याची चंगळ राहील. महत्त्वाचे काम पुढे ढकलणे इष्ट ठरेल.

कुंभ – धनलक्ष्मीची कृपा आपल्यावर राहील. विविध प्रकारचा लाभ होईल. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. महागड्या, चैनीच्या वस्तू खरेदी कराल. आर्थिक आवक चांगली राहील. आवडत्या व्यक्तींना भेटण्याचा योग येईल.

मीन – नोकरीत बढती मिळेल. तुमच्या कार्यपद्धतीची प्रशंसा होईल. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. चांगल्या संधी चालून येतील. न्यायालयीन काम मार्गी लागेल. जीवनसाथीचे चांगले सहकार्य मिळेल. घरी पाहुणे येतील.

टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य