आजचे राशीभविष्य - 8 जानेवारी 2022 - भाग्याची उत्तम साथ मिळेल अन् नावलौकिकात भर पडेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2022 07:21 IST2022-01-08T07:20:49+5:302022-01-08T07:21:22+5:30
Today's horoscope : कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

आजचे राशीभविष्य - 8 जानेवारी 2022 - भाग्याची उत्तम साथ मिळेल अन् नावलौकिकात भर पडेल
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक पौष १८, १९४३. तिथी : पौष शुक्ल षष्ठी. (सकाळी १०.४४ पर्यंत), श्री शालिवाहन शके १९४३, प्लव नाम संवस्तर, नक्षत्र : दुसऱ्या दिवशी उत्तर रात्री सकाळी ७.१० पर्यंत उत्तरा भाद्रपदा, त्यानंतर रेवती. रास : मीन. आज : चांगली दिवस. राहू काळ : सकाळी ९ ते १०.३०. (राहू काळात महत्त्वाची कामे टाळा.)
मेष - आर्थिक आवक चांगली राहील. नोकरीत सामान्य स्थिती राहील. मुलांना यश मिळेल. महत्त्वाच्या कामात अडथळा येऊ शकतो. काही कारणाने प्रवास करावा लागेल. मनात थोडे काळजीचे विचार राहतील. खर्चाचे प्रमाण वाढेल. सकारात्मक विचार करण्याची गरज आहे.
वृषभ - आर्थिक आवक समाधानकारक राहील. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. भेटवस्तू मिळतील. महत्त्वाच्या कामात यश मिळेल, अनेकांचे सहकार्य मिळेल. क्रोधावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. जीवनसाथीची काळजी घ्या. गैरसमज होऊ शकतात.
मिथुन - नोकरीत चांगली स्थिती राहील. कामात योग्य बदल होतील. काहींची बदली होऊ शकते. नोकरीत गैरसमज होऊ शकतात. जीनवसाथीशी मधुर संबंध राहतील. व्यवसायात भरभराट होईल. तब्येतीची काळजी घ्या. मुलांना चांगल्या संधी मिळतील.
कर्क - भाग्याची अनुकूलता तुमच्या बाजूने राहील. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी कराल. प्रतिष्ठा, प्रसिद्धी मिळेल. तुमच्या कामाचे कौतुक होईल, पर्यटनाच्या निमित्ताने प्रवास होईल. अचानक फायदा होईल. मुलांना अनपेक्षितपणे चांगली संधी मिळेल.
सिंह - मुलांना चांगले यश मिळेल. त्यांचे कौतुक होईल. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. थोडा संयम ठेवा. कुणी तरी ओळखीचे किंवा अनोळखी लोक सहकार्य करतील. नोकरीत वादापासून दूर राहा. जोडीदाराची चांगली साथ राहील.
कन्या - ग्रहमानाची साथ तुम्हाला राहील. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू राहील. अनेकांचे सहकार्य मिळेल. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. भेटवस्तू देण्यास हरकत नाही. आर्थिक आवक चांगली राहील. खाण्यावर नियंत्रण ठेवा.
तूळ - आर्थिक आवक चांगली राहील. जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल. व्यवसायात विक्री चांगली होईल. भाऊ, बहीण यांच्या भेटी होतील. आरोग्याची काळजी घ्या. खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवा. महत्त्वाच्या कामात अडथळा येऊ शकतो. संयम ठेवण्याची गरज आहे.
वृश्चिक - भाग्याची उत्तम साथ मिळेल. नावलौकिकात भर पडेल. धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. मालमत्तेच्या व्यवहारात फायदा होईल. घरात किरकोळ कारणावरून कुरबुर होईल. जवळचा प्रवास होईल. मुलांना यश मिळेल. परिक्षेत यश मिळेल.
धनू - नोकरीत नवीन जबाबदारी घ्यावी लागेल. कामाच्या स्वरूपात बदल होऊ शकतो, घरी पाहुणे येतील. आर्थिक आवक चांगली राहील. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. व्यवसायात विक्री चांगली राहील. मात्र, कुणाला उधारीवर माल देताना काळजी घ्या.
मकर - व्यवसायात भरभराट होईल. कामानिमित्त प्रवास घडून येईल. जीवनसाथीची चांगली साथ राहील. नोकरीत कामाचा ताण राहील. खर्चाचे प्रमाण वाढते राहील. एखाद्या व्यवहारात फायदा होईल. शांतचित्ताने महत्त्वाचे निर्णय घ्याल.
कुंभ - विविध प्रकारे लाभ होईल. धनप्रात्पीचा योग आहे. भेटवस्तू मिळतील. नोकरीत अधिकारी वर्गाचे सहकार्य मिळेल. चांगले अनुभव येतील. महिलांना खरेदीची संधी मिळेल. कायद्याची बंधने पाळा खाण्या-पिण्याची चंगळ राहील.
मीन - मन प्रसन्न राहील. छोट्या-मोठ्या अडचणी दूर होतील. नोकरीत अनुकूल स्थिती राहील. प्रगतीची संधी मिळेल. घरात आनंदी वातावरण राहील. जीवनसाथी चांगली साथ देईल. वडीलधाऱ्या मंडळींचा योग्य सल्ला मिळेल.
- विजय देशपांडे (ज्योतिष विशारद)