आजचे राशीभविष्य - 7 मार्च 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 08:23 IST2019-03-07T08:23:07+5:302019-03-07T08:23:44+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

आजचे राशीभविष्य - 7 मार्च 2019
मेष
लक्ष्मीकृपेचा आज आपल्यावर वर्षाव होईल. सामाजिक पातळीवर यश आणि कीर्ती वाढेल. व्यापारात लाभ होईल. विवाहाची बोलणी करण्याच्या दृष्टीने विवाहोत्सुकांना यश मिळेल. दुपारनंतर मात्र तब्बेत बिघडू शकते... आणखी वाचा
वृषभ
आजचा दिवस शुभ फलदायी आहे. व्यवसायात अनुकूल स्थिती. आपल्या कामाचे योग्य कौतुक होईल. समाजात मान- प्रतिष्ठा वाढेल. कामे सरळ पार पडतील आणि त्यांच्यापासून लाभ होईल... आणखी वाचा
मिथुन
प्रतिस्पर्धी आणि वरिष्ठांशी वादविवाद करू नका असा सल्ला श्रीगणेश देतात. व्यवसायात वातावरण चांगले राहील. मानसिक स्वास्थ्य पण चांगले असेल दुपारनंतर शारीरिक व मानसिक दृष्ट्या अनुकूलता जाणवेल... आणखी वाचा
कर्क
अनैतिक आणि निषेधार्ह विचारांपासून दूर राहण्याची सूचना आहे. वाणीवर संयम ठेवा. कुटुंबात भांडण झाल्याने शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य सतावेल. दुपारनंतर परदेशातून वार्ता येतील... आणखी वाचा
सिंह
आरोग्याच्या दृष्टीने आज आपण प्रसन्न व आनंदित राहाल. मित्र आणि संबंधितांसोबत हिंडण्या- फिरण्याचा बेत आखून आनंददायी प्रवासही कराल. भागीदारांबरोबर सकारात्मक चर्चा होईल... आणखी वाचा
कन्या
स्वभावात जरा जास्त संवेदनशीलता राहील. कार्य सफल झाल्याने चित्तवृत्ती प्रफुल्लित राहतील. यश आणि कीर्ती वाढेल. माहेरहून चांगल्या बातम्या मिळतील. शारीरिक व मानसिक दृष्ट्या प्रसन्नता जाणवेल... आणखी वाचा
तूळ
आपण बौद्धिक शक्तीमुळे लेखन वा अन्य सृजनकार्य करण्यात आघाडीवर असाल. विचारात सातत्यपूर्ण बदल झाल्याने मानसिक स्वास्थ्य लाभणार नाही. सबब यात्रा- प्रवास टाळावा... आणखी वाचा
वृश्चिक
आजचा दिवस विद्यार्थ्यांना अनुकूल आहे. स्वभावातील हट्टीपणा सोडून वागल्याने अनेक समस्या सुटतील. नवी वस्त्रे, अलंकार व सौंदर्य प्रसाधने यांवर जास्त खर्च होण्याची शक्यता आहे... आणखी वाचा
धनु
शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. घरातील सदस्यांसह प्रवास- पर्यटन कराल. मित्र आणि स्वकीयांसोबत वेळेचा सदुपयोग आनंदपूर्वक होईल. मनोरंजनाची साधने खरेदी कराल... आणखी वाचा
मकर
अधिक वाद-विवाद न करणे आपल्या हिताचे आहे. धार्मिक कार्य आणि उपासनेसाठी पैसा खर्च होईल. कुटुंबीयांशी मतभेद होऊ नयेत यासाठी वाणीवर नियंत्रण ठेवा. दुपारनंतर मन प्रफुल्लित राहील... आणखी वाचा
कुंभ
आज प्रापंचिक बाबीं ऐवजी आध्यात्मिक विषयांकडे आपला जास्त कल राहील. मानसिक स्वास्थ्य मिळविण्याचा प्रयत्न करा. शारीरिक उत्साह आणि मानसिक प्रसन्नता दिवसभर राहील... आणखी वाचा
मीन
पैशाची देवाण- घेवाण, जुनी येणी तसेच गुंतवणूक करताना सावध राहा. इतरांच्या कामांत व्यत्यय आणू नका. कोर्ट- कचेरी प्रकरणात जपून राहा. वाणी आणि संतापावर नियंत्रण ठेवा... आणखी वाचा