आजचे राशीभविष्य 7 ऑगस्ट 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 07:02 IST2019-08-07T07:00:52+5:302019-08-07T07:02:10+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

आजचे राशीभविष्य 7 ऑगस्ट 2019
मेष - वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने आजचा दिवस फारच चांगला आहे असे श्रीगणेश सांगतात. जोडीदारासह एकत्र वेळ घालवाल आणि प्रेमसुखाचा अनुभव घ्याल. आणखी वाचा
वृषभ - श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस शुभफलदायी जाईल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. पूर्ण दिवस आनंद व उत्साहात जाईल. आणखी वाचा
मिथुन - आज शरीर आणि मन बेचैन राहील असे श्रीगणेश सांगतात. नवीन कार्य सुरू करण्याचा बेत आखाल पण काम सुरू करू नका असा सल्ला श्रीगणेश देतात. आणखी वाचा
कर्क - श्रीगणेश सांगतात की आपला आजचा दिवस अशुभ आहे. आज आनंद आणि उत्साह यांचा अभाव राहील. मन चिंतेने ग्रासलेले व अशांत राहील. आणखी वाचा
सिंह - श्रीगणेश सांगतात की आपल्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. आज आरोग्य चांगले राहील. भाऊबंदाबरोबर आनंदात वेळ जाईल. त्यांच्याकडून फायदा होईल. आणखी वाचा
कन्या - आजचा दिवस आपल्याला शुभफल देईल. आपल्या गोड बोलण्याने कोणाचेही मन जिंकू शकाल. कामे सफल होण्याची जास्त शक्यता आहे. आणखी वाचा
तूळ -श्रीगणेश सांगतात आजचा दिवस शुभ फलदायी आहे. रचनात्मक आणि कलात्मक शक्तीची चमक दिसेल. शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ्याची काळजी घ्या. आणखी वाचा
वृश्चिक -दुर्घटनेपासून सावध राहण्याचा, शस्त्रकियेचा निर्णय न घेण्याचा आणि वादात न पडण्याचा इशारा श्रीगणेश देतात. बोलण्यात कोणाचा अपसमज होऊ नये याकडे लक्ष द्या. आणखी वाचा
धनु - आजचा दिवस आपणाला लाभदायक ठरेल असे गणेश सांगतात. गृहस्थ जीवनाचा पूर्णतः आनंद घ्याल. मित्रांसमवेत रम्य ठिकाणी प्रवासाचा बेत आखाल. आणखी वाचा
मकर - श्रीगणेश म्हणात की आजचा दिवस संघर्षपूर्ण राहील. आज अग्नी, पाणी आणि वाहनांच्या दुर्घटनेपासून सावध राहा. व्यापारामुळे कार्यमग्न राहाल. आणखी वाचा
कुंभ - श्रीगणेशांच्या मते आजचा दिवस मिश्रफलप्राप्तीचा. तब्बेत यथा- तथाच राहील. तरीही मनस्वास्थ्य चांगले राहील. कामाचा उत्साह कमी होईल. आणखी वाचा
मीन - आजचा आपला दिवस मध्यम फळ देणारा जाईल असे श्रीगणेश सांगतात. मानसिक, शारीरिक कष्ट अधिक होतील. अचानक धनलाभाचे योग. व्यापारी वर्गाला जुनी येणी वसूल होतील व पैसा मिळेल. आणखी वाचा