Today's Horoscope - 7 April 2020 rkp | आजचे राशीभविष्य - 7 एप्रिल 2020

आजचे राशीभविष्य - 7 एप्रिल 2020

मेष
आजचा दिवस परोपकार आणि सद्भावना यातच जाईल. सेवा- पुण्य यांची कामे हातून घडतील. मनाने खूप कामे ठरवलेली असतील. सत्कार्य हातून झाल्यामुळे शरीर व मनाला स्फूर्ती मिळेल. आणखी वाचा

वृषभ
आज तुम्हाला विदविवादात मोठे यश मिळेल. आपले बोलणे कोणाला मोहून टाकेल. तेच आपल्याला फायदायाचे ठरेल. त्यामुळे नवीन संबंधात सद्भाव वाढेल. आणखी वाचा

मिथुन
पाणी किंवा प्रवाही पदार्थापासून घात होऊ शकतो, म्हणून त्यापासून दूर राहा. काही आजारामुळे मन द्विधा बनेल व एखादा निर्णय घेण्यात बाधा येईल. खूप विचार करण्यामुळे मानसिक थकवा येऊन झोप लागणार नाही व त्याचा स्वास्थ्यावर नकारात्मक परिणाम होईल.  आणखी वाचा

कर्क
आजचा दिवस प्रफुल्लतेने भरलेला असेल. नवीन कार्याची सुरूवातही आज करू शकता. मित्र- स्नेही भेटल्याने आनंद होईल. कामात मिळालेल्या यशामुळे आपला उत्साह वाढेल. आणखी वाचा

सिंह
आजचा दिवस आपल्याला मिश्र फल देणारा आहे. कुटुंबियांसोबत चांगला वेळ घालवाल. त्यांचे चांगले सहकार्य देखील मिळेल. आर्थिक क्षेत्रात मिळकतीपेक्षा खर्च अधिक होईल.  आणखी वाचा

कन्या
आपण वाकचातुर्याने चांगले संबंध निर्माण कराल की जे भविष्यात उपयोगी व फायदयाचे ठरतील. वैचारिक समृद्धी वाढेल. शरीर, स्वास्थ्य आणि मन प्रसन्न राहील. आणखी वाचा

तूळ
आज तब्बेत बिघडेल. मानसिक दृष्टया पण अस्वास्थ्य जाणवेल. आपली उक्ती आणि कृती या मुळे कोणालाही भ्रांती होणार नाही याची सावधानता बाळगा. आणखी वाचा

वृश्चिक
आज मित्र भेटतील. आणि त्यांच्यासह हिंडण्या- फिरण्यात व मौजमजा करण्यात पैसा खर्च होईल. नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल.  आणखी वाचा

धनु
कार्य साफल्याचा दिवस आहे. नवे काम सुरू कराल. व्यापारी आपल्या व्यवसायाचे नियोजन आणि विस्तार करू शकतील. मैत्रिणींकडून लाभ होईल. नोकरीत वरिष्ठ अधिकारी आपल्या बढतीचा विचार करतील. आणखी वाचा

मकर
बौद्धिक कार्य आणि व्यवसायात आपण नवी शैली वापराल. साहित्य व लेखन कार्याला गती मिळेल. शारीरिक अस्वास्थ्य व थकवा जाणवेल. संततीची समस्या चिंता वाढवील. आणखी वाचा

कुंभ
अनेकविध विचारांमुळे मानसिक थकवा जाणवेल. मनातील संताप आवरण्याच्या प्रयत्नात काही अनिष्ट घडणार नाही यांकडे लक्ष द्या. आणखी वाचा

मीन
आज आपणातील लेखक किंवा कलाकाराची कला व्यक्त करण्याची संधी मिळेल. व्यवसायात भागीदारी करण्यास शुभ दिवस. दैनंदिन कार्ये व्यवस्थित पार पाडल्याने दिवस आनंदात जाईल. आणखी वाचा

Web Title: Today's Horoscope - 7 April 2020 rkp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.