आजचे राशीभविष्य - 6 मार्च 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 08:41 IST2019-03-06T08:14:00+5:302019-03-06T08:41:25+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

आजचे राशीभविष्य - 6 मार्च 2019
मेष
सार्वजनिक कार्यक्रमात आप्तेष्ट आणि मित्रांसमवेत वेळ खूप आनंदात जाईल. मित्रांसाठी खर्च करावा लागेल. त्यांच्याकडून लाभ होईल. निसर्गाच्या सान्निध्यात सहलीला जाल... आणखी वाचा
वृषभ
नवीन कामाचे नियोजन करणार्यांसाठी आजचा दिवस शुभ आहे. नोकरी व्यवसायात लाभदायक परिणाम मिळतील. पदोन्नती होईल. व्यापारात नवीन दिशा स्पष्ट होतील. मानप्रतिष्ठा वाढेल... आणखी वाचा
मिथुन
प्रतिकूल घटनांचा योग आल्याने आपल्या कामास विलंब लागेल. शरीरात स्फूर्ती आणि मनात उत्साह असणार आहे. पोटाचे विकार सतावतील. नोकरीत वरिष्ठांच्या नकारात्मक दृष्टीकोनाला बळी पडाल... आणखी वाचा
कर्क
मनातील नकारात्मकता नैराश्य निर्माण करेल. बाहेर खाण्यापिण्यामुळे तब्बेत बिघडेल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. कुटुंबातील व्यक्तीशी भांडण होईल. नवे संबंध त्रासदायक ठरतील... आणखी वाचा
सिंह
पती- पत्नीत किरकोळ कारणांनी खटका उडून मतभेद होतील. जीवनसाथीच्या तब्बेतीची चिंता राहील. प्रापंचिक गोष्टींबाबत उदासीन राहाल. भागीदारांशी मतभेद होतील... आणखी वाचा
कन्या
शारीरिक, मानसिक स्वास्थ्य राहील. घरात शांती- सुखाचे वातावरण मनाला प्रसन्ना देईल. आर्थिक लाभ आणि कामात यश मिळेल. आजारातून मुक्त व्हाल. नोकरीत फायदा मिळेल... आणखी वाचा
तूळ
आज कल्पनाशक्ती आणि सृजनशक्ती यांचा चांगला उपयोग कराल. संततीची प्रगती होईल. तन आणि मन तरतरी आणि स्फूर्तीचा अनुभव घेईल. विचारांचा अतिरेक मन विचलित करेल... आणखी वाचा
वृश्चिक
शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या भीतीचा अनुभव घ्याल. कोणती ना कोणती चिंता सतावेलच. कुटुंबातील सदस्य, नातलग व संबंधित यांच्याशी पटणार नाही. आईची तब्बेत बिघडेल... आणखी वाचा
धनु
गूढ रहस्यमय विद्या आणि अध्यात्माकडे आकर्षण राहील. नवीन कार्यारंभास चांगला दिवस आहे. मित्र आणि आप्तेष्टांच्या आगमनाने घरात आनंद राहील. हाती घेतलेली कामे यशस्वी होतील... आणखी वाचा
मकर
आपली उक्ती आणि कृती यावर संयम ठेवण्याचा सल्ला देतात. कुटुंबात मतभेद होणार नाहीत याची काळजी घ्या. शेअर- सट्टा बाजार यात गुंतवणूक कराल. आर्थिक लाभ होईल... आणखी वाचा
कुंभ
शारीरिक, मानसिक दृष्टया प्रफुल्लित राहाल. नातलग, मित्र, कुटुंबीय यांच्यासह घरात उत्सवाचे वातावरण राहील. स्वादिष्ट भोजन मिळेल. पर्यटनाचा बेत आखाल. आर्थिक दृष्ट्या लाभाचा दिवस... आणखी वाचा
मीन
आर्थिक नियोजन व गुंतवणूक करताना खूप दक्ष राहा. एकाग्रता कमी असेल त्यामुळे बेचैन राहाल. धार्मिक कार्यावर खर्च होईल. मित्र- स्वकीयांशी मतभेद होतील... आणखी वाचा