आजचे राशीभविष्य - 6 जानेवारी 2022 - धनूसाठी जीवनसाथीची मोलाची मदत मिळेल, तर तूळसाठी व्यवसायात भरभराट होईल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2022 07:51 IST2022-01-06T07:49:27+5:302022-01-06T07:51:27+5:30
Today's horoscope : कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

आजचे राशीभविष्य - 6 जानेवारी 2022 - धनूसाठी जीवनसाथीची मोलाची मदत मिळेल, तर तूळसाठी व्यवसायात भरभराट होईल
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक पौष १६, १९४३. तिथी : पौष शुक्ल चतुर्थी. (दुपारी १२.३० पर्यंत), श्री शालिवाहन शके १९४३, प्लव नाम संवस्तर, नक्षत्र : दुसऱ्या दिवशी उत्तर रात्री सकाळी ६.२० पर्यंत शततारका, त्यानंतर पूर्वा भाद्रपदा. रास : कुंभ. आज : सामान्य दिवस. विनायक चतुर्थी राहू काळ : दुपारी १.३० ते ३. (राहू काळात महत्त्वाची कामे टाळा.)
मेष - धनलाभाच्या दृष्टीने अत्यंत चांगला काळ आहे. विविध प्रकारचे लाभ होतील. भेटवस्तू मिळतील. चांगल्या लोकांच्या सहवासात याल. थोरा-मोठ्यांच्या ओळखीतून फायदा होईल. महत्त्वाचे काम मार्गी लागेल. गृहसौख्य चांगले राहील. मुलांना यश मिळेल.
वृषभ - नोकरीत अनुकूल बदल होतील. बढतीसाठी आपला विचार होईल. काहींची बदली होण्याची शक्यता आहे. वादविवाद टाळा. सुखसोयी मिळतील. घरी पाहुणेरावळे येतील. मुलांना चांगले यश मिळेल. शैक्षणिक प्रगतिपुस्तक झळकत राहील.
मिथुन - भाग्याची अनुकूलता तुमच्या बाजूने राहील. दूरच्या प्रवास करावा लागेल. पर्यटन, धार्मिक यात्रा घडेल. नावलौकिक वाढेल. जीवनसाथी तुमच्या मर्जीनुसार वागेल. तरूण वर्गाला प्रेमात यश मिळेल. नोकरीत सामान्य परिस्थिती राहील. विशेष बदल होणार नाही.
कर्क - भागीदारी व्यवसायात यश मिळेल. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. मात्र, कुणी तरी मदतीला हात पुढे करील. त्यामुळे सुसह्य वाटेल. प्रवास शक्यतो टाळा. काहींना अचानक धनलाभ होईल. आरोग्याची काळजी घ्या. जीनवसाथीला नाराज करू नका.
सिंह - भागीदारी व्यवसायात फायदा होईल. मित्रमंडळींचे सहकार्य मिळेल. जीवनसाथी तुमच्या मर्जीनुसार वागेल. तरुण वर्गाला प्रेमात यश मिळेल. काहींना प्रवास करावा लागेल. घरात किरकोळ कुरबुर होईल. नोकरीत थोडा ताण राहील.
कन्या - व्यवसायात धाडसी निर्णय घ्याल. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. तुमचे महत्त्व वाढेल. पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. हितशत्रू डोकेवर काढतील. मात्र त्यांच्यावर लक्ष केंद्रित करू नका. तब्येतीची काळजी घ्या. जीवनसाथी तुमची काळजी घेईल.
तूळ - मुलांना घवघवीत यश मिळेल. त्यांच्या अडचणी समजून घ्या. मुलांशी वाद घालू नका. आर्थिक आवक चांगली राहील. व्यवसायात भरभराट होईल. भावंड्यांच्या भेटीगाठी होतील. काहींना प्रवास करावा लागेल. तुमच्या हातून एखादे महत्त्वाचे काम होईल.
वृश्चिक - धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. मनासारखे पदार्थ खाण्यास मिळतील. घरी पाहुणे येतील. एखाद्या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. नोकरीत अनुकूल घटना घडतील. कामात बदल होईल.
धनू - जीवनसाथीची मोलाची मदत मिळेल. तरूण वर्गाला प्रेमात यश मिळेल. विवाहेच्छुंकांचे विवाह ठरण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु होतील. डोळ्यांची काळजी घ्या. व्यवसायात भरभराट होईल. भावंडांच्या भेटीगाठी होतील. जवळचे प्रवास घडून येतील.
मकर - धनलाभ होईल. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. महत्ताच्या कामात यश मिळेल. काही कारणाने गैरसमज होतील. पण ते दूरही होतील. चैनीच्या वस्तू खरेदी कराल. मुलांशी संवाद साधल पाहिजे.
कुंभ - आर्थिक आवक मनासारखी राहील. नोकरीत संघर्ष करावा लागेल. सहकाऱ्यांशी मतभेद होतील. मात्र, तुमची बाजू वरचढ राहील. सर्वांचे सहकार्य मिळेल. सरकारी कामे मार्गी लागतील. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील.
मीन- नोकरीत उत्तर परिस्थिती राहील. आर्थिक फायदे मिळतील. घरात आनंदी वातावरण राहील. महत्त्वाच्या कामात थोडा अडथळा येऊ शकतो. योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन, सल्ला मिळेल. पूजापाठात मन रमेल.
- विजय देशपांडे (ज्योतिष विशारद)