Today's horoscope - 31 May 2020 rkp | आजचे राशीभविष्य - ३१ मे २०२० - वृषभसाठी चिंतेचा, मिथुनसाठी आनंदाचा दिवस

आजचे राशीभविष्य - ३१ मे २०२० - वृषभसाठी चिंतेचा, मिथुनसाठी आनंदाचा दिवस

मेष
साहित्य निर्मिती आणि कलात्मक अभिव्यक्ती वाढविण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. स्नेही भेटल्याने मन प्रसन्न राहील. दुपारनंतर घरातील वातावरण शांतिपूर्ण राहील. आणखी वाचा

वृषभ
आईच्या तब्बेतीविषयी आज चिंता राहील. स्थावर संपत्ती संबंधित कागदपत्रावर सह्या करणे टाळावे. नकारात्मक विचार सोडून द्या. दुपारनंतर शारीरिक व मानसिक स्वास्थ्य सुधारेल. आणखी वाचा

मिथुन
कार्य यशस्वी झाल्याने आपले मन आज आनंदी असेल. तुमच्याकडून प्रतिस्पर्ध्यांचा पराभव होईल. परंतु दुपारनंतर घरात मतभेद होतील. कुटुंबियांशी झालेल्या वादातून मन खिन्न बनेल. आईची प्रकृती बिघडेल. आणखी वाचा

कर्क
दीर्घकालीन योजनेच्या आयोजनासंबंधी विचार करताना मनःस्थिती द्विधा होईल. कुटुंबियांसोबतचे वातावरण तणावपूर्ण असेल. ठरवलेल्या कामात अपेक्षित यश मिळेल. दुपारनंतर आपल्यासाठी चांगली वेळ आहे. आणखी वाचा

सिंह
आज आपल्यामनात पक्का आत्मविश्वास असेल. आज आपले प्रत्येक काम दृढ निर्णयशक्तिनी पूर्ण असेल. तरीही मनात क्रोधाची भावना अधिक असेल, म्हाणून मन शांत ठेवा.  आणखी वाचा

कन्या
आज आपले मन खूप भाऊक बनेल. भावनेच्या आहारी जाऊन काही अविचारी काम आपल्या हातून होऊ नये यासाठी सावध रहा. वादविवाद टाळा. तरीसुद्धा एखाद्या बरोबर उग्र वर्तन घडू शकते. आणखी वाचा

तूळ
आजचा दिवस आपल्याला प्रवास- सहलीला जाण्याचा तसेच मित्रांकडून फायद्याचा आहे. व्यापारात लाभ होईल. मुलाबाळांबरोबर चांगले संबंध राहतील. परंतु, दुपारनंतर शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडेल. अधिक संवेदनशील होऊ नका. आणखी वाचा

वृश्चिक
मनोबल आणि आत्मविश्वासाच्या जोरावर आज प्रत्येक काम सहजपूर्ण होईल. व्यापार- धंदयात आपल्या बुद्धिमत्तेची प्रशंसा होईल. आपल्या कामामुळे वरिष्ठ आनंदित होतील व त्यामुळे पदोन्नतीची शक्यता वाढेल.  आणखी वाचा

धनु
आज आपली वृत्ती धार्मिक बनेल. एखाद्या धार्मिक किंवा मंगलकार्यात सहभागी व्हाल. न्यायप्रिय बनाल हानिकारक कामापासून दूर रहा. रागावर ताबा ठेवा. दुपारनंतर आपला दिवस खूप चांगला व यशस्वी जाईल. आणखी वाचा

मकर
आजचा दिवस सांभाळून राहा. प्रकृतीविषयी निष्काळजी राहू नका व नकारात्मक विचारांना वरचढ होऊ देऊ नका. असे केले तरच आपण हानीतून बाहेर पडाल. अचानक येणार्‍या खर्चासाठी मनाची तयारी ठेवा. आणखी वाचा

कुंभ
आज लहानसहान गोष्टींवरुन वैवाहिक जीवनात गोष्टी विकोपाला जाऊ शकतात. संसारातील प्रश्नांविषयी आज आपण उदासीन रहाल. कोर्ट-कचेरी पासून जरा जपूनच. समाजाच्या दृष्टिने अपमानीत होणार नाही याची काळजी घ्या. आणखी वाचा

मीन
आज मन चिंतामुक्त राहील. शंकाकुशंकामुळे प्रसन्नता जाणवणार नाही. कार्यांत विघ्ने आल्याने कार्य पूर्ण होण्यास वेळ लागेल. सहकार्यांकडून सहकार्य मिळणार नाही. आणखी वाचा

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Today's horoscope - 31 May 2020 rkp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.