आजचे राशीभविष्य - 31 डिसेंबर 2018
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2018 07:56 IST2018-12-31T07:25:44+5:302018-12-31T07:56:49+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या.

आजचे राशीभविष्य - 31 डिसेंबर 2018
मेष
सुखदायी दांपत्यजीवन, हिंडणे- फिरणे आणि सगळेच मनासारखे मिळण्याचे योग आहेत. आयात- निर्यात व्यापाराशी संबंधितांना लाभ आणि यश मिळेल... आणखी वाचा
वृषभ
आजचा दिवस शुभ फलदायी ठरेल. ठरवलेली कामे व्यवस्थीत पार पडतील. अपूर्ण कामे पूर्ण होतील. शारीरिक, मानसिक स्वास्थ्य लाभेल... आणखी वाचा
मिथुन
आज संतती आणि जीवनसाथी यांच्या तब्बेतीची काळजी राहील. वादविवाद, चर्चा यात खोलात जाऊ नका. आत्मसन्मान दुखावला जाईल. मैत्रिणींमुळे खर्च आणि नुकसान होण्याची शक्यता आहे... आणखी वाचा
कर्क
शारीरिक व मानसिक स्वास्थ्य मिळेल. छातीत दुखणे किंवा अन्य विकारामुळे कुटुंबात अशांतीचे वातावरण राहील. स्त्री वर्गाशी मतभेद वा भांडण होण्याची शक्यता आहे... आणखी वाचा
सिंह
कार्यात यश आणि प्रतिस्पर्ध्यांवर विजयाची धुंदी आपल्या मनावर राहील. त्यामुळे प्रसन्न वाटेल. भावा- बहिणींबरोबर घरात काही बेत ठरवाल. मित्र, स्नेही यांच्यासोबत यात्रेचे योग आहेत... आणखी वाचा
कन्या
कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. गोड वाणी आणि न्यायप्रिय व्यवहार यामुळे लोकप्रियता मिळेल. आर्थिक लाभ होतील. मिष्टान्न भोजन मिळेल... आणखी वाचा
तूळ
आपले कलाकौशल्य व्यक्त करण्यास सुवर्णसंधी आहे असे श्रीगणेश सांगतात आपली कलात्मक आणि रचनात्मक शक्ती तेजस्वी बनेल. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य राहील... आणखी वाचा
वृश्चिक
मनोरंजन, आनंद यासाठी पैसा खर्च होईल. चिंता व शारीरिक कष्ट यामुळे त्रासून जाल. अपघात व डॉक्टरी चिकित्सा यापासून सांभाळून राहा... आणखी वाचा
धनु
आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक दृष्टीने आजचा दिवस लाभदायी आहे. गृहस्थजीवनात पूर्णतः आनंद मिळेल. प्रेमाचा सुखद अनुभव येईल... आणखी वाचा
मकर
आज व्यापार धंद्यात लाभ होण्याचे संकेत आहेत. वसुली, प्रवास, मिळकत यांसाठी शुभ दिवस आहे. सरकारी कामात यश मिळेल. नोकरीत वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील... आणखी वाचा
कुंभ
शारीरिक दृष्ट्या थकवा, बेचैनी आणि उबग जाणवेल. मानसिक स्वास्थ्य लाभेल. शरीरात स्फूर्ती जाणवणार नाही त्यामुळे कामात उत्साह वाटणार नाही. कामाच्या ठिकाणी उच्चाधिकार्यांच्या नाराजीला बळी पडाल... आणखी वाचा
मीन
तब्बेतीकडे विशेष लक्ष द्या. आजारावर खर्च होईल. अचानक खर्च वाढतील. इतर कामकाजातही प्रतिकूलता जाणवेल. घरातील लोकांशी मतभेद होतील. जपून बोला... आणखी वाचा