आजचे राशीभविष्य - 3 सप्टेंबर 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2019 07:33 IST2019-09-03T07:32:00+5:302019-09-03T07:33:24+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

आजचे राशीभविष्य - 3 सप्टेंबर 2019
मेष
आज सामाजिक आणि सार्वजनिक क्षेत्रांत आपण प्रशंसेस पात्र ठराल. धनलाभाचे योग आहेत. कौटुंबिक जीवनात सुख व संतोष अनुभवाल. बौद्धिक चर्चेत सहभागी व्हाल. वाणीवर संयम राखणे आवश्यक आहे... आणखी वाचा
वृषभ
दिवस खूप आनंदात जाईल. मानसिक स्वास्थ्य लाभेल. आपले काम निर्धारित वेळेत नियोजनानुसार पूर्ण होईल. आर्थिक लाभ संभवतात. अपूर्ण कामे पूर्ण होतील. माहेरहून आनंदाच्या बातम्या येतील. तसेच लाभही होईल... आणखी वाचा
मिथुन
जीवनसाथी आणि संतती यांच्या आरोग्याविषयी विशेष लक्ष पुरविण्याची पूर्वसूचना देत आहेत. वाद-विवाद आणि बौद्धिक चर्चेपासून दूर राहा. अपमान होणार नाही याची काळजी घ्या. मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता आहे... आणखी वाचा
कर्क
ग्लानीमुळे आज आपले मन दुःखी राहील. प्रफुल्लता, स्फूर्ती आणि आनंद यांचा अभाव राहील. कुटुंबीयांशी तक्रारी वाढतील. पैसा खर्च होईल आणि कामात अपयश येईल. वेळेवर भोजन मिळणार नाही. निद्रानाश त्रास देईल... आणखी वाचा
सिंह
आजचा दिवस सुखासमाधानात जाईल. भावंडाबरोबरच्या संबंधात जवळीक निर्माण होईल. त्यांचे सहकार्य पण आपणास मिळेल. संबंधांमधील भावनांची जाणीव आपणाला होईल. एखाद्या रम्य पर्यटनस्थळी सहलीला जाण्याचे ठरवाल... आणखी वाचा
कन्या
आज कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. गोड बोलण्याने आपण आपले निर्धारित काम पूर्ण करू शकाल. तब्बेत चांगली राहील. कोणाशी बौद्धिक चर्चा करू नका असा सल्ला श्रीगणेश देतात. गोडधोड जेवणाचा आस्वाद घ्याल... आणखी वाचा
तूळ
आज आपण आर्थिक नियोजन व्यवस्थित कराल. सृजनशीलता वाढेल. शारीरिक आणि मानसिकदृष्टया स्वास्थ्य लाभेल. दृढ विचारांमुळे हाती घेतलेले काम पूर्ण कराल. आत्मविश्वास वाढेल... आणखी वाचा
वृश्चिक
आपल्या स्वभावातील तामसवृत्ती आणि बोलणे यावर संयम ठेवण्याचा सल्ला. शारीरिक शैथिल्य आणि मानसिक चिंता यांमुळे मन ग्रासून जाईल. वाहन चालवताना अपघात होणार नाही याची काळजी घ्या. शक्य असेल तर आज शस्त्रक्रिया करू नका... आणखी वाचा
धनु
आजचा दिवस आपणाला लाभदायी आहे. आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील. मित्र आणि परिवारासह पर्यटन स्थळी भटकण्याचा आनंद मिळेल. व्यापारात लाभदायी ठरणारा दिवस... आणखी वाचा
मकर
आज व्यापारविषयक कामात आपणाला लाभ होईल. जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इ. साठी दिवस चांगला आहे. सरकार, मित्र व संबंधितांकडून लाभ होईल. त्यांच्याकडून भेटवस्तू मिळाल्याने आनंद होईल... आणखी वाचा
कुंभ
आजचा दिवस संमिश्र फलदायी जाईल. शारीरिक अस्वास्थ्य जाणवेल. मानसिक स्वास्थ्य मात्र चांगले राहील. शरीरात स्फूर्ती कमी राहील त्यामुळे काम करण्यात उत्साह वाटणार नाही. वरिष्ठांची नाराजी पण आपणाला खुपेल... आणखी वाचा
मीन
ईश्वरभक्ती आणी आध्यात्मिक गोष्टींवर लक्ष देवून दिवस घालवा. आज काही प्रमाणात प्रतिकूलतेचा सामना करावा लागेल. तब्बेतीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. आजारपणावर अधिक खर्च करावा लागेल... आणखी वाचा