Today's horoscope - 3 June 2020 rkp | आजचे राशीभविष्य - ३ जून २०२० - कुंभसाठी काळजीचा, धनुसाठी आनंदाचा दिवस

आजचे राशीभविष्य - ३ जून २०२० - कुंभसाठी काळजीचा, धनुसाठी आनंदाचा दिवस

मेष
आज तुम्हाला सार्वजनिक आणि सामाजिक क्षेत्रातून प्रशंसा प्राप्त होईल. लक्ष्मीची कृपा जाणवेल. परिवार आणि दाम्पत्यजीवन यात सुख संतोष अनुभवाल. वाहन सुख मिळेल. आणखी वाचा

वृषभ
शारीरिक व मानसिक स्वास्थ्य सांभाळून ठरलेली सगळी कामे ठरल्याप्रमाणे पूर्ण करू शकाल. आजारी व्यक्तींना आज तब्येतीत सुधारणा जाणवेल. मातुल घराण्या कडून चांगली वार्ता समजेल. आणखी वाचा

मिथुन
नवीन कामाच्या आरंभाला चांगला दिवस नाही. जीवनसाथी व संतती यांच्या स्वास्थ्याची काळजी घ्या. चर्चा किंवा वादविवाद यात मानहानी होणार नाही याची काळजी घ्या. आणखी वाचा

कर्क
आज तुमच्यात आनंद आणि स्फूर्ती यांचा अभाव असेल. मन खिन्न असेल. छातीत दुखणे किंवा इतर काही कारणांनी त्रास होईल. निद्रानाश होईल.  आणखी वाचा

सिंह
आजचा दिवस आपण शरीरात चैतन्य व मनाची प्रसन्नता अनुभवाल. मित्रां बरोबर अधिक घनिष्टता अनुभवाल. मित्र किंवा स्वजन यांच्याबरोबर लहानशी सहल कराल. आर्थिक फायदा होईल.  आणखी वाचा

कन्या
कुटुंबात सुखशांती व कौटुंबिक आनंद यामुळे आजचा दिवस आनंदात जाईल. तुमच्या मधुर वाणीचा प्रभाव आज इतर लोकांना प्रभावीत करेल. प्रवासाची शक्यता आहे. मिष्टान्नासह आज आवडीचे जेवण मिळेल. आणखी वाचा

तूळ
आज तुमची रचनात्मक शक्ती प्रकट होईल. सृजनात्मकताही दिसून येईल. वैचारिक दृढता असेल त्यामुळे कामे सफल बनतील. वस्त्रालंकार, मोजमजेची साधने तसेच मनोरंजन यासाठी पैसे खर्च होतील. आणखी वाचा

वृश्चिक
आज हर्षोल्हास व मनोरंजनावर पैसे खर्च कराल. मानसिक चिंता आणि शारीरिक तगमग यांमुळे त्रासून जाल. वाणीवर व काम यांवर संयम नसल्याने भांडणतंटा होऊ शकतो.  आणखी वाचा

धनु
आजचा दिवस आपणासाठी लाभदायक आहे. संसारात सुख- शांती राहील. प्रिय व्यक्तींची भेट संस्मरणीय राहील. प्रेमाच्या सुखद क्षणांचा आनंद घ्याल. उत्पन्नाचे मार्ग वाढतील. आणखी वाचा

मकर
आज व्यापार धंद्यात लाभ होण्याचे संकेत. वसुली, प्रवास, मिळकत यांसाठी शुभ दिवस आहे. सरकारी कामात यश मिळेल. नोकरीत वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. आणखी वाचा

कुंभ
शारीरिक दृष्ट्या थकवा, बेचैनी आणि उबग जाणवेल. मानसिक स्वास्थ्य लाभेल. शरीरात स्फूर्ती जाणवणार नाही त्यामुळे कामात उत्साह वाटणार नाही. कामाच्या ठिकाणी उच्चाधिकार्‍यांच्या नाराजीला बळी पडाल. आणखी वाचा

मीन
तब्बेतीकडे विशेष लक्ष द्या. आजारावर खर्च होईल. अचानक खर्च वाढतील. इतर कामकाजातही प्रतिकूलता जाणवेल. घरातील लोकांशी मतभेद होतील. जपून बोला. आणखी वाचा

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Today's horoscope - 3 June 2020 rkp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.