Today's horoscope - 3 August 2020 | आजचे राशीभविष्य - ३ ऑगस्ट २०२० - वृश्चिकसाठी आर्थिक लाभाचा अन् मिथुनसाठी अडचणीचा दिवस

आजचे राशीभविष्य - ३ ऑगस्ट २०२० - वृश्चिकसाठी आर्थिक लाभाचा अन् मिथुनसाठी अडचणीचा दिवस

मेष
घर, कुटुंब आणि संतती यांच्या संबंधी आज आपणाला आनंद आणि संतोषाची भावना राहील. आज आप्त, इष्ट आणि मित्र आपणाला घेरून टाकतील. व्यापार- धंदयासंबंधी प्रवास होईल. आणखी वाचा

वृषभ
व्यापार्‍यांसाठी आजचा दिवस शुभ आहे. नवीन आयोजन ते हाती घेऊ शकतील. आर्थिक लाभ प्राप्त होतील. विदेशातील मित्र किंवा नातेवाईक यांच्याकडून येणार्‍या वार्ता आपणाला भावविवश बनवतील.  आणखी वाचा

मिथुन
बदनामी आणि निषेधार्ह विचारांपासून दूर राहणे हिताचे ठरेल. खर्च अधिक झाल्याने आर्थिक चणचण भासेल. कुटुंबातील व्यक्ती आणि ऑफिसातील सहकारी यांच्याशी मतभेद किंवा वादविवादाचे प्रसंगे येतील.  आणखी वाचा

कर्क
मौजमजेची साधने, उत्तम दागीने आणि वाहन खरेदी होईल. मौजमस्ती आणि मनोरंजनात वेळ खर्च होईल. तसेच भिन्न लिंगीय व्यक्तींशी रोमांचक मुलाखात तुम्हाला सुख देईल. आणखी वाचा

सिंह
उदासीन वृत्ती आणि संशयाचे काळे ढग आपल्या मनाला वेढून टाकतील. त्यामुळे मनःस्वास्थ्य लाभणार नाही. तरीही घरात शांततेचे वातावरण राहील. आणखी वाचा

कन्या
चिंता आणि उद्विग्नपूर्ण असणारा आजचा दिवस या ना त्या कारणाने काळजी वाढवेल. विशेषतः संतती आणि तब्बेती विषयक जास्त चिंता वाटेल. पोटाच्या तक्रारी राहतील. आणखी वाचा

तूळ
आज आपण खूप भावनाशील बनाल व त्यामुळे मानसिक अस्वास्थ्य राहील. आईशी मतभेद होतील किंवा तिच्या तब्बेतीची काळजी राहील. यात्रा- प्रवासासाठी काळ योग्य नाही. आणखी वाचा

वृश्चिक
कार्यात यश, आर्थिक लाभ आणि भाग्योदयासाठी दिवस शुभ आहे. नवीन कार्याचा आरंभ करू शकता. भावंडांशी अधिक सहयोगपूर्ण आणि प्रेमाचे संबंध राहतील. आणखी वाचा

धनु
द्विधा मनःस्थिती आणि घरातील बिघडलेले वातावरण यामुळे त्रास होईल. नाहक खर्च होईल. कामे पूर्ण व्हायला विलंब लागेल. महत्त्वाचे निर्णय घेणे हिताचे ठरणार नाही.  आणखी वाचा

मकर
ईश्वर नामस्मरणाने दिवसाचा शुभारंभ होईल. धार्मिक कार्य, पूजा- पाठ होईल. गृहस्थी जीवनात आनंदी वातावरण राहील. आपले प्रत्येक काम सहजगत्या पूर्ण होईल. आणखी वाचा

कुंभ
तब्बेतीकडे लक्ष द्या. कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता. कोणाशी गैरसमजाने भांडण होऊ शकेल. रागावर नियंत्रण ठेवा. आणखी वाचा

मीन
आजचा दिवस लाभदायक आहे. नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल. वडीलधारे आणि मित्रांकडून लाभ होईल. नवे मित्र मिळतील. त्यांची मैत्री भविष्यकाळात लाभदायक ठरेल. आणखी वाचा

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Today's horoscope - 3 August 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.